अभिजीत सावंत
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
अभिजीत सावंत (ऑक्टोबर ७, १९८१; मुंबई, महाराष्ट्र - हयात) हा एक मराठी, भारतीय पार्श्वगायक आहे. तो इंडियन आयडॉल ह्या गायन स्पर्धेचा (पहिला मोसम) विजेता आहे. ही मालिका सर्वप्रथम युनायटेड किंग्डम मध्ये पॉप आयडॉल ह्या नावाने सुरू झाली. अभिजीत त्याआधी क्लिनिक ऑल क्लिअर जो जीता वही सुपरस्टार' ह्या स्पर्धेचा उपविजेता देखील होता. तसेच तो एशियन आयडॉल ह्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाचा विजेता ठरला.
अभिजीत सावंत | |
---|---|
अभिजीत सावंत | |
आयुष्य | |
जन्म | ७ ऑक्टोबर, १९८१ |
जन्म स्थान | मुंबई, महाराष्ट्र, भारत |
संगीत साधना | |
गायन प्रकार | कंठसंगीत गायन, पॉप संगीत |
संगीत कारकीर्द | |
कार्यक्षेत्र | पार्श्वगायन, सुगम संगीत |
कारकिर्दीचा काळ | २००४ पासून |
गौरव | |
पुरस्कार | इंडियन आयडॉल |