नवी दिल्ली-मुंबई मुख्य रेल्वेमार्ग हा भारतामधील एक प्रमुख रेल्वेमार्ग आहे. नवी दिल्ली व मुंबई ह्या दोन मोठ्या महानगरांना जोडणारा हा १,३८६ किमी लांबीचा मार्ग दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात व महाराष्ट्र ह्या राज्यांमधून धावतो. मथुरा, कोटा, रतलाम, वडोदरा, सुरत, वापी इत्यादी भारतातील मोठी शहरे ह्याच मार्गावर आहेत.
नवी दिल्ली व मुंबई दरम्यान धावणाऱ्या मुंबई राजधानी एक्सप्रेस, ऑगस्ट क्रांती राजधानी एक्सप्रेस, तिरुवनंतपुरम राजधानी एक्सप्रेस, मुंबई नवी दिल्ली दुरंतो एक्सप्रेस, पश्चिम एक्सप्रेस इत्यादी गाड्या ह्याच मार्गाचा वापर करतात. चर्चगेट ते डहाणूदरम्यान धावणाऱ्या मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावरील लोकल हाच रेल्वेमार्ग वापरतात.