वापी (गुजराती: વાપી) हे भारताच्या गुजरात राज्यामधील एक शहर आहे.वापी हे वलसाड जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण/मुख्यालय आहे. वापी शहर गुजरातच्या दक्षिण भागात गुजरात-महाराष्ट्र राज्यांच्या सीमेजवळ राष्ट्रीय महामार्ग ८ वर वसले असूने ते राजधानी गांधीनगरपासून ३७८ किमी तर मुंबईहून १७५ किमी अंतरावर स्थित आहे. २०११ साली वापीची लोकसंख्या १.६३ इतकी होती व ते सुरत खालोखाल दक्षिण गुजरातमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर होते.

वापी
વાપી
भारतामधील शहर

Vapi stationboard 02.jpg
पश्चिम रेल्वेवरील वापी रेल्वे स्थानक
वापी is located in गुजरात
वापी
वापी
वापीचे गुजरातमधील स्थान

गुणक: 20°22′N 72°54′E / 20.367°N 72.900°E / 20.367; 72.900

देश भारत ध्वज भारत
राज्य गुजरात
जिल्हा वलसाड जिल्हा
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १,६३,६३०
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ
अधिकृत संकेतस्थळ

वापीच्या पूर्वेस दादरा आणि नगर-हवेली तर पश्चिमेस दमण हे दोन केंद्रशासित प्रदेश आहेत. दमण-वापी-सिल्वासा हे आजच्या घटकेला एक महानगर मानले जाते. वापी भागाचे मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण झाले असून येथे रासायनिक कंपन्या मोठ्या प्रमाणावर आहेत. ह्यामुळे वापी जगातील सर्वात प्रदूषित शहरांपैकी एक मानले जाते. वापी रेल्वे स्थानक हे पश्चिम रेल्वेवरील एक प्रमुख स्थानक आहे.

बाह्य दुवेसंपादन करा