क्योल्न (जर्मन: Köln; इंग्लिश वापर: Cologne; कोलोन) हे जर्मनी देशाच्या नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन राज्यातील सर्वात मोठे तर जर्मनीमधील बर्लिन, हांबुर्गम्युनिक खालोखाल चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. जर्मनीच्या पश्चिम भागातील रूर परिसरामध्ये ऱ्हाइन नदीच्या काठावर वसलेल्या क्योल्नची लोकसंख्या सुमारे १० लाख आहे. येथील क्योल्नर डोम नावाच्या कॅथेड्रलसाठी प्रसिद्ध असणारे क्योल्न ऱ्हाइनलॅंड परिसरामधील एक महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र मानले जाते.

क्योल्न
Köln
जर्मनीमधील शहर


ध्वज
चिन्ह
क्योल्न is located in जर्मनी
क्योल्न
क्योल्न
क्योल्नचे जर्मनीमधील स्थान

गुणक: 50°57′N 6°58′E / 50.950°N 6.967°E / 50.950; 6.967

देश जर्मनी ध्वज जर्मनी
राज्य नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन
स्थापना वर्ष इ.स. पूर्व ३८
क्षेत्रफळ ४०५.१ चौ. किमी (१५६.४ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १२१ फूट (३७ मी)
लोकसंख्या  (डिसेंबर २०१२)
  - शहर १०,२४,३७३
  - घनता २,५०० /चौ. किमी (६,५०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
stadt-koeln.de

अंदाजे पहिल्या शतकादरम्यान वसवल्या गेलेल्या क्योल्नवर इतिहासामध्ये अनेकदा फ्रेंचांनीब्रिटिशांनी सत्ता गाजवली. मध्य युगादरम्यान आल्प्स पर्वतरांगेच्या उत्तरेकडील सर्वात महत्त्वाच्या व्यापारी व वाहतूक केंद्रांपैकी एक असलेले क्योल्न हान्से संघामधील आघाडीचे शहर होते. दुसऱ्या महायुद्धादरम्यान दोस्त राष्ट्रांकडून केल्या गेलेल्या असंख्य बॉंबहल्ल्यांदरम्यान क्योल्नची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. युद्ध संपल्यानंतर जर्मन सरकारने येथील अनेक ऐतिहासिक वास्तू पुन्हा बांधण्याचे प्रयत्न केले.

सध्या क्योल्न जर्मनीमधील एक आघाडीचे आर्थिक, सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र आहे.

भौगोलिक रचना

संपादन

क्योल्न शहर जर्मनीच्या ऱ्हाइनलॅंड भागात ऱ्हाइन नदीच्या किनाऱ्यांवर सुमारे ४०० चौरस किमी क्षेत्रफळाच्या भूभागावर वसले आहे.

हवामान

संपादन

क्योल्न जर्मनीमधील सर्वात उबदार शहरांपैकी एक आहे. परंतु येथील हवामान वर्षामधील बराच काळ ढगाळ असते,

क्योल्न-बॉन विमानतळ साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
विक्रमी कमाल °से (°फॅ) 16.2
(61.2)
20.7
(69.3)
25.0
(77)
29.0
(84.2)
32.4
(90.3)
36.8
(98.2)
37.2
(99)
38.8
(101.8)
31.7
(89.1)
27.6
(81.7)
18.7
(65.7)
16.6
(61.9)
38.8
(101.8)
सरासरी कमाल °से (°फॅ) 5.4
(41.7)
6.7
(44.1)
10.9
(51.6)
15.1
(59.2)
19.3
(66.7)
21.9
(71.4)
24.4
(75.9)
24.0
(75.2)
19.8
(67.6)
15.1
(59.2)
9.5
(49.1)
5.9
(42.6)
14.83
(58.69)
दैनंदिन °से (°फॅ) 2.6
(36.7)
2.9
(37.2)
6.3
(43.3)
9.7
(49.5)
14.0
(57.2)
16.6
(61.9)
18.8
(65.8)
18.1
(64.6)
14.5
(58.1)
10.6
(51.1)
6.3
(43.3)
3.3
(37.9)
10.31
(50.55)
सरासरी किमान °से (°फॅ) −0.6
(30.9)
−0.7
(30.7)
2.0
(35.6)
4.2
(39.6)
8.1
(46.6)
11.0
(51.8)
13.2
(55.8)
12.6
(54.7)
9.8
(49.6)
6.7
(44.1)
3.1
(37.6)
0.4
(32.7)
5.82
(42.48)
विक्रमी किमान °से (°फॅ) −23.4
(−10.1)
−19.2
(−2.6)
−12.0
(10.4)
−8.8
(16.2)
−2.2
(28)
1.4
(34.5)
2.9
(37.2)
1.9
(35.4)
0.2
(32.4)
−6.0
(21.2)
−10.4
(13.3)
−16.0
(3.2)
−23.4
(−10.1)
सरासरी वर्षाव मिमी (इंच) 62.1
(2.445)
54.2
(2.134)
64.6
(2.543)
53.9
(2.122)
72.2
(2.843)
90.7
(3.571)
85.8
(3.378)
75.0
(2.953)
74.9
(2.949)
67.1
(2.642)
67.0
(2.638)
71.1
(2.799)
838.6
(33.017)
महिन्यामधील सूर्यप्रकाशाचे तास 43.0 74.0 101.6 151.8 184.1 177.0 184.3 179.5 134.5 103.8 53.1 40.3 १,४२७
स्रोत: Data derived from Deutscher Wetterdienst[]

अर्थव्यवस्था

संपादन

क्योल्न शहरामध्ये लुफ्तान्सा कंपनीचे मुख्यालय तसेच फोर्ड, टोयोटा इत्यादी वाहन उत्पादक कंपन्यांची युरोपीय मुख्यालये आहेत. क्योल्नमधील उद्योग बहुरंगी असून माहिती तंत्रज्ञान, विमा, मनोरंजन इत्यदी क्षेत्रांशी निगडीत अनेक कंपन्यांची कार्यालये येथे आहेत.

फुटबॉल हा क्योल्नमधील सर्वात लोकप्रिय खेळ असून १. एफ.सी. क्योल्न हा फुसबॉल-बुंडेसलीगा मध्ये खेळलेला येथील प्रमुख क्लब आहे. ऱ्हाईनएनर्जीस्टेडियोन हे २००६ फिफा विश्वचषकासाठी वापरले गेलेले स्टेडियम क्योल्नमध्ये सर्वात मोठे आहे.

प्रसिद्ध रहिवासी

संपादन

जुळी शहरे

संपादन

क्योल्नचे जगातील खालील शहरांसोबत व्यापारी व सांस्कृतिक संबंध आहेत.[]

  लिव्हरपूल
  लील
  लीज
  रॉटरडॅम
  तोरिनो
  बुर्गास
  एश-सुर-आल्झेत
  क्योतो
  ट्युनिस
  तुर्कू
  नॉयक्योल्न
  तेल अवीव
  बार्सिलोना
  बीजिंग
  कॉर्क
  थेसालोनिकी
  कोरिंतो
  इंडियानापोलिस
  वोल्गोग्राद
  ट्रेप्टो-क्योपेनिक
  कातोवित्सा
  बेथलहम
  इस्तंबूल
  क्लुज-नापोका
  बातांगास
  सास्काटून
  रियो दि जानेरो

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

संदर्भ

संपादन
  1. ^ "Ausgabe der Klimadaten: Monatswerte".
  2. ^ "Partnerstädte". 2014-03-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-06-22 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य)