इंडियानापोलिस

अमेरिकेच्या इंडियाना राज्याची राजधानी.


इंडियानापोलिस (इंग्लिश: Indianapolis) ही अमेरिकेच्या इंडियाना राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे शहर इंडियाना राज्याच्या मध्यभागात एका सपाट पठारावरील ९६३.५ वर्ग किमी जागेवर वसले आहे. २०१० साली ८.३९ लाख शहरी व १७.५६ लाख महानगरी लोकसंख्या असलेले इंडियानापोलिस मिड-वेस्ट भौगोलिक प्रदेशामधील दुसऱ्या क्रमांकाचे (शिकागोखालोखाल) तर अमेरिकेमधील बाराव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. तसेच इंडियानापोलिस महानगर अमेरिकेमधील सर्वात वेगाने वाढणाऱ्या भागंपैकी एक आहे.

इंडियानापोलिस
Indianapolis
अमेरिकेची संयुक्त संस्थानेमधील शहर


इंडियानापोलिस is located in इंडियाना
इंडियानापोलिस
इंडियानापोलिस
इंडियानापोलिसचे इंडियानामधील स्थान
इंडियानापोलिस is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
इंडियानापोलिस
इंडियानापोलिस
इंडियानापोलिसचे अमेरिकेची संयुक्त संस्थानेमधील स्थान

गुणक: 39°46′5.88″N 86°9′29.52″W / 39.7683000°N 86.1582000°W / 39.7683000; -86.1582000

देश Flag of the United States अमेरिका
राज्य इंडियाना
स्थापना वर्ष इ.स. १८२१
क्षेत्रफळ ९६३.५ चौ. किमी (३७२.० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ७१५ फूट (२१८ मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ८,३९,४८९
  - घनता ८६१ /चौ. किमी (२,२३० /चौ. मैल)
  - महानगर १७,५६,२४१
प्रमाणवेळ यूटीसी - ५:००
www.indy.gov

इंडियानापोलिसची स्थापना इ.स. १८२१मध्ये नवीन इंडियाना राज्याची राजधानी ह्या हेतूने करण्यात आली. राज्याच्या मधोमध असल्यामुळे हा भाग राजधानीसाठी निवडला गेला. स्थापनेनंतर लवकरच अत्यंत मोक्याच्या स्थानावर असल्यामुळे ह्या शहराचे एक वाहतूक केंद्र असे महत्त्व वाढू लागले. सध्या इंडियानापोलिस मिडवेस्ट भागामधील एक मोठे औद्योगिक शहर असून निवासाकरिता अमेरिकेमधील सर्वोत्तम स्थानांपैकी एक मानले गेले आहे.

इतिहास

संपादन

भूगोल

संपादन

हवामान

संपादन

अर्थव्यवस्था

संपादन

जनसांख्यिकी

संपादन

वाहतूक

संपादन

इंडियानापोलिस आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील प्रमुख विमानतळ आहे.

शिक्षण

संपादन

द अमॅच्युअर स्पोर्ट्स कॅपिटल ऑफ द वर्ल्डरेसिंग कॅपिटल ऑफ द वर्ल्ड ह्या नावांनी प्रसिद्ध असलेले इंडियानापोलिस अमेरिकेमधील एक मोठे क्रीडा केंद्र आहे. नॅशनल कॉलेजियेट अ‍ॅथलेटिक असोसिएशन (NCAA) ह्या अमेरिकेमधील कॉलेजीय खेळांचे आयोजन करणाऱ्या संस्थेचे मुख्यालय येथेच आहे. तसेच हे शहर येथील वाहन शर्यतींसाठी प्रसिद्ध आहे. इंडियानापोलिस मोटर स्पीडवे येथे १९११ सालापासून इंडियानापोलिस ५०० ही मोटार शर्यत खेळवली गेली आहे. फॉर्म्युला वन खेळामधील युनायटेड स्टेट्स ग्रांप्री ह्याच ट्रॅकवर २००० ते २००७ दरम्यान भरवली गेली. ह्या व्यतिरिक्त येथे अनेक लोकप्रिय वाहन शर्यती होतात.

खालील दोन प्रमुख व्यावसायिक संघ इंडियानापोलिसमध्ये स्थित आहेत. २०१२ सालचा सुपर बोल सामना येथील लुकास ऑईल स्टेडियममध्ये खेळवला जाईल.

संघ खेळ लीग स्थान
इंडियानापोलिस कोल्ट्स अमेरिकन फुटबॉल नॅशनल फुटबॉल लीग लुकास ऑईल स्टेडियम
इंडियाना पेसर्स बास्केटबॉल नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन कॉनेस्को फील्डहाउस

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: