कोन्राड आडेनाउअर (५ जानेवारी, इ.स. १८७६ - १९ एप्रिल, इ.स. १९७६) हा दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीच्या पराभवानंतर निर्माण झालेल्या पश्चिम जर्मनी देशाचा पहिला चान्सेलर होता. १९४९ ते १९६३ ह्या दरम्यान चान्सेलरपदावर असणाऱ्या आडेनाउअरने महायुद्धामध्ये बेचिराख झालेल्या जर्मनीला विकास व समृद्धीच्या वाटेवर आणले. त्याने फ्रान्स, अमेरिका इत्यादी पश्चिमी देशांसोबत अत्यंत सलोख्याचे संबंध निर्माण केले व युरोप व जगात पश्चिम जर्मनीला पुन्हा एकदा मान मिळवून दिला.

कोन्राड आडेनाउअर

कार्यकाळ
१५ सप्टेंबर १९४९ – १६ ऑक्टोबर १९६३
मागील पद-निर्मिती
लुट्झ ग्राफ श्वेरिन फॉन क्रोसिक
पुढील लुडविग एर्हार्ड

जन्म ५ जानेवारी, १८७६ (1876-01-05)
क्योल्न, जर्मनी
मृत्यू १९ एप्रिल, १९६७ (वय ९१)
नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन
राजकीय पक्ष ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन
सही कोन्राड आडेनाउअरयांची सही

वयाच्या ७३व्या वर्षी चान्सेलरपदावर निवडून आलेला आडेनाउअर त्याच्या मेहनती जीवनशैलीसाठी प्रसिद्ध होता.

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: