ऱ्हाईनएनर्जीस्टेडियोन

ऱ्हाईनएनर्जीस्टेडियोन (जर्मन: RheinEnergieStadion) हे जर्मनी देशाच्या क्योल्न शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. बुंडेसलीगामध्ये खेळणाऱ्या १. एफ.सी. क्योल्न ह्या क्लबचे हे यजमान मैदान आहे. ऱ्हाईनएनर्जी ह्या कंपनीने ह्या स्टेडियमचे हक्क विकत घेतल्यामुळे त्याचे नाव ऱ्हाईनएनर्जीस्टेडियोन असे ठेवण्यात आले.

ऱ्हाईनएनर्जीस्टेडियोन
मागील नावे Müngersdorfer Stadion
स्थान क्योल्न, नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन, जर्मनी
उद्घाटन १६ सप्टेंबर १९२३
पुनर्बांधणी २००१ – २००४
बांधकाम खर्च १२ कोटी युरो
आसन क्षमता ५०,०००
वापरकर्ते संघ/स्पर्धा
१. एफ.सी. क्योल्न

२००६ फिफा विश्वचषक स्पर्धेमधील साखळी व बाद फेरीचे सामने येथे खेळवले गेले आहेत.

आंतरराष्ट्रीय सामने

संपादन

२००६ फिफा विश्वचषक

संपादन

२००६ फिफा विश्वचषकामधील खालील सामने येथे खेळवले गेले:

तारीख संघ #१ निकाल संघ #२ फेरी प्रेक्षकसंख्या
११ जून २००६   अँगोला 0-1   पोर्तुगाल गट ड 45,000
१७ जून २००६   चेक प्रजासत्ताक 0-2   घाना गट इ 45,000
२० जून २००६   स्वीडन 2-2   इंग्लंड गट ब 45,000
२३ जून २००६   टोगो 0-2   फ्रान्स गट ग 45,000
२६ जून २००६   स्वित्झर्लंड 0-0 (0-3 PEN)   युक्रेन १६ संघांची फेरी 45,000


बाह्य दुवे

संपादन
स्टेडियमचे विस्तृत चित्र