कोल्हापूर

भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक शहर
(कोल्हापुर या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख कोल्हापूर शहराविषयी आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या


गुणक: 16°42′00″N 74°13′60″E / 16.7000°N 74.2333°E / 16.7000; 74.2333

  ?कोल्हापूर
महाराष्ट्र • भारत
—  नगर  —
शाहू महाराजांचा राजवाडा व वस्तुसंग्रहालय
शाहू महाराजांचा राजवाडा व वस्तुसंग्रहालय

१६° ४२′ ००″ N, ७४° १३′ ४८″ E

गुणक: 16°42′00″N 74°13′60″E / 16.7000°N 74.2333°E / 16.7000; 74.2333
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
६६.८२ चौ. किमी
• ५६९ मी
जिल्हा कोल्हापूर जिल्हा
लोकसंख्या
घनता
३८,७६,००१ (महाराष्ट्रात ९वा) (२०११)
• ५०४/किमी
महापौर सौ.शोभा पंडीतराव बोंद्रे
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४१६००१
• +०२३१
• MH-09
संकेतस्थळ: कोल्हापूर महानगरपालिका संकेतस्थळ


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


    कोल्हापूर जिल्हा व तालुके : 
       महाराष्ट्राचा अगदी दक्षिणेकडील जिल्हा. क्षेत्रफळ ८,१३५ चौ. किमी. लोकसंख्या २०,४८,०४९ (१९७१). १५० ४३’ उ. ते १७० १०’ उ. आणि ७३० ४०’ पू. ते ७४० ४२’ पू. यांदरम्यानच्या या जिल्ह्याची दक्षिणोत्तर लांबी सु. १६० किमी. व पूर्व-पश्चिम रुंदी सरासरी सु. ६० किमी. आहे. याच्या पश्चिमेस रत्नागिरी, उत्तरेस सांगली आणि पूर्व व दक्षिण बाजूंस कर्नाटक राज्यातील बेळगाव हे जिल्हे आहेत. महाराष्ट्राच्या २•६% क्षेत्रफळ व ४•०६% लोकसंख्या असलेल्या या जिल्ह्याचे बारा तालुके आहेत. शाहूवाडी, पन्हाळा, करवीर, हातकणंगले आणि शिरोळ हे तालुके उत्तरेस गगनबावडा, राधानगरी, भुदरगड व कागल मध्यभागी आणि आजरा, गडहिंग्लज व चंदगड हे तालुके दक्षिणेस आहेत. पूर्वीचे ⇨ कोल्हापूर संस्थान  विलीन झाले, तेव्हा त्याचा रायबाग विभाग हल्लीच्या कर्नाटक राज्यात व बेळगाव जिल्ह्याचा चंदगड तालुका या जिल्ह्यात समाविष्ट करून आणि इतर किरकोळ प्रादेशिक बदल करून कोल्हापूर जिल्हा निर्माण करण्यात आला.

भूवर्णन : गगनबावडा तालुक्यातील तळकोकणात मोडणारी ३९ गावे सोडली, तर हा सर्व जिल्हा दख्खन पठाराच्या पश्चिम भागात सु. ३९० ते ५५० मी. उंचीवर आहे. जास्तीत जास्त उंची ९०० मी. पर्यंत आहे. सह्याद्रीची मुख्य रांग जिल्ह्याच्या पश्चिम भागात दक्षिणोत्तर गेलेली असून तिचा एक प्रमुख फाटा उत्तर भागात पूर्वेस गेलेला आहे. इतर फाटे लहान असून नैर्ऋत्य-ईशान्य गेलेले आहेत. जिल्ह्याचा पूर्वभाग त्या मानाने सखल व सपाट आहे. या जिल्ह्यातून कोकणात उतरण्याच्या अनेक वाटा आहेत त्यांपैकी आंबा, फोंडा व आंबोली हे घाट प्रमुख आहेत. जिल्ह्यात सर्वत्र बेसाल्ट हा अग्निजन्य खडक आढळतो. चंदगड, राधानगरी वगैरे काही भागांत मात्र कुरुंदाचा दगड मिळतो. शाहूवाडी, पन्हाळा व आजरा या तालुक्यांत बॉक्साइटाचे मोठे साठे आहेत. कर्नाटक व महाराष्ट्र येथे निघणाऱ्या ॲल्युमिनियमच्या कारखान्यांस त्यांचा पुरवठा होईल. भुदरगड तालुक्यात जिप्सम सापडते.

   कृष्णा आणि तिच्या उपनद्या वारणा, पंचगंगा, दूधगंगा, हिरण्यकेशी व घटप्रभा या येथील प्रमुख नद्या होत. घटप्रभेला मिळणारी मलप्रभा व ताम्रपर्णी याही या जिल्ह्यातून वाहतात. कृष्णा ईशान्य सरहद्दीवरून ६० किमी. वाहते. वारणा उत्तर सरहद्दीवरून वाहते. कुंभी, कासारी, तुळशी व भोगावती या चार नद्या व सरस्वती ही पाचवी गुप्त नदी मिळून झालेली पंचगंगा नरसोबाच्या वाडीजवळ कृष्णेला मिळते. तिचे खोरे संपूर्णपणे या जिल्ह्यात आहे. बाकीच्या नद्यांच्या खोऱ्यांचा फक्त काही भागच या जिल्ह्यात आहे.
   कोल्हापूर जिल्ह्याचे सरासरी तपमान उन्हाळ्यात २९.०c से. आणि हिवाळ्यात २१.oc से. असते. उन्हाळ्यात जास्तीत जास्त ४१•५० oc से. पर्यंत जाते आणि हिवाळ्यात १४.०c से. पर्यंत उतरते. पावसाळ्यात ते १७.०c से.पेक्षा कमी होत नाही. गगनबावडा, आजरा, चंदगड, राधानगरी व शाहूवाडी या तालुक्यांत पाऊस २०० सेंमी. पेक्षा जास्त पडतो. गगनबावडा येथे तो ७०० सेंमी. पेक्षाही जास्त पडतो. भुदरगड व पन्हाळा या तालुक्यांत १२० सेंमी. ते २०० सेंमी. पर्यंत पडतो. गडहिंग्लज आणि करवीर तालुक्यांत ९० सेंमी. ते १२० सेंमी. तर कागल तालुक्यांत तो ६५ सेंमी. ते ९५ सेंमी. पडतो. शिरोळ व हातकणंगले तालुक्यांत मात्र ६५ सेंमी. पेक्षा कमी पाऊस पडतो.शाहूवाडी, राधानगरी, पन्हाळा व बावडा तालुक्यांत तसेच करवीर, भुदरगड व आजरा तालुक्यांच्या पश्चिम भागात तांबडी, जांभ्या  दगडाची माती आढळते. हातकणंगले, करवीर, राधानगरी, भुदरगड व आजरा यांच्या काही भागांत हलकी काळी माती आढळते शिरोळ, हातकणंगले, करवीर, कागल व गडहिंग्लज या तालुक्यांत मध्यम व भारी काळी माती आहे. नद्यांच्या खोऱ्यांत ती खोल आहे.
   जिल्ह्याचा सु. १८•८% भाग वनाच्छादित आहे. तो मुख्यत: पश्चिमेकडील डोंगराळ भागातच आहे. त्यात जांभूळ, हिरडा, फणस, आंबा, कोकम, अंजन, सावर, शिसव, किंजळ, चंदन इ. सदापर्णी साग, धावडा, ऐन, हेद, बाभूळ खैर इ. ऋतुपर्णी व कुडा, वाकेरी, भारंग, वावडिंग, बेडकी, बिब्बा, बाहवा इ. औषधी वनस्पती आहेत. साग, काजू व सावर यांच्या लागवडी मुद्दाम केल्या आहेत. इमारती व जळाऊ लाकूड, कोळसा, चंदन, मध, मेण, हिरडा, काजू, शिकेकाई, चराऊ गवत यांचे चांगले उत्पन्न होते.गवा, वाघ, चित्ता, बिबळ्या, सांबर, भेकर, अस्वल, रानडुक्कर, तरस, चितळ, ससा, लांडगा, रानकोंबडा इ. प्राणी जंगलात आढळतात. कावळा, चिमणी, पोपट, मोर, तित्तिर, घुबड वगैरे नेहमीचे पक्षी येथेही आहेत. साप, अजगर वगैरे सरपटणारे प्राणी व अनेक प्रकारचे कीटक, फुलपाखरे वगैरे आहेत. राधानगरी तालुक्यात गवा अभयारण्य स्थापन झालेले असून जंगली प्राणी नैसर्गिक अवस्थेत पाहण्याची सोय येथे केलेली आहे.


आर्थिक स्थिती :

    शेती हा जिल्ह्याचा मुख्य व्यवसाय असून एकूण कामकरी लोकांपैकी ७१•४०% लोक शेतावर काम करतात. जिल्ह्यातील एकूण जमिनीपैकी सु. ६७% जमीन शेतीसाठी उपलब्ध आहे. तीपैकी ७४•३% जमीन १९६९-७० मध्ये प्रत्यक्ष लागवडीखाली होती. प्रत्यक्ष्ा लागवडीखालील जमिनीपैकी ५२.४% अन्नधान्यांखाली, १०% उसाखाली, १३•५% भुईमुगाखाली व फक्त २१ हे. म्हणजे ०•१३% जमीन कापसाखाली होती. पिकाखालील जमिनीपैकी ७•८९% जमीन ओलीताखाली होती. ओलीताखालील एकूण जमिनीपैकी ४•८% जमिनीला कालव्याचे पाणी होते. २३•९% जमिनीला विहिरींचे व बाकीच्या जमिनीला इतर मार्गांनी पाणी मिळाले. राधानगरी येथे भोगावती नदीवर मोठे धरण बांधलेले असून तेथे सु. १•१ लक्ष किवॉ. तास वीज उत्पन्न होते. इतर लहान पाटबंधारे बरेच आहेत.
    जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तांबडमातीच्या प्रदेशातील चिंचोळ्या सखल भागात भात व ऊस आणि डोंगरउतारावर नाचणी ही पिके होतात. मध्यभागातील हलक्या काळ्या जमिनीत भात, जोंधळा, भुईमूग, भाजीपाला, ऊस ही पिके होतात. पूर्वभागातील कसदार काळ्या जमिनीत जोंधळा, भुईमूग, मिरची, हळद, तंबाखू, कापूस, भाजीपाला, ऊस इत्यादींचे उत्पादन होते. १९७२ मध्ये जिल्ह्यात २,९०,००० गाईबैल, ३,३३,००० म्हशी, २,५२,००० मेंढ्या व शेळ्या ६,००० इतर जनावरे आणि ५,५०,००० कोंबड्या व बदके होती.

उद्योगधंदे :

    कोल्हापूरातील एक कापडगिरणी व बिद्री, परिते, कुडित्रे, कोल्हापूर, शिरोळ, कोडोली आणि इचलकरंजी येथील सात साखर कारखाने हे या जिल्ह्यातील प्रमुख कारखाने होत. याशिवाय डीझेल एंजिने तयार करण्याचे ऐंशीहून अधिक छोटे कारखाने कोल्हापूरात आहेत. इचलकरंजीस पाच-सहा हजार यंत्रमाग व हातमाग चालतात. कोल्हापूर, कुरुंदवाड, रेंदाळ, वडगाव, कागल, कोडोली, नांदणी, सरुड, हलकर्णी इ. गावी हातमाग आहेत. आळते, कबनूर, वडगाव, हुपरी व कोडोली येथे लाखकामाचा आणि वडगाव, हलकर्णी, कोडोली व कोल्हापूर येथे भुईमुगाचे तेल गाळण्याचा धंदा चालतो. हुपरी येथे चांदीचा माल तयार होतो. हिरड्यापासून टॅनिन तयार करण्याचा कारखाना घाटमाथ्यावर आंबा गावाजवळ आहे. कोल्हापूर व कापशी येथील पायताणे प्रसिद्ध असून अलीकडे त्यांस परदेशांतही मागणी येऊ लागली आहे. गूळ तयार करणे हा एक महत्त्वाचा उद्योग आहे. कोल्हापूर ही गुळाची व्यापारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे. त्याशिवाय हळद, भुईमूग, मिरची यांचाही व्यापार येथे मोठा आहे. कोल्हापूरखालोखाल जयसिंगपूर व गडहिंग्लज याही व्यापारपेठा म्हणून प्रसिद्ध आहेत.
   जिल्ह्यात कापड, तंबाखू, छापखाना व प्रकाशन, धातुकाम, यंत्रे, विजेची यंत्रे, उपकरणे व साहित्य, इतर किरकोळ उद्योग यांचे लहानमोठे मिळून एकूण ३६६ कारखाने १९६९-७० मध्ये होते आणि त्या सर्वांत मिळून एकूण १६,६८८ म्हणजे एकूण कामगारांच्या सु. २४% किंवा शेतीकामगारांव्यतिरिक्त इतर कामगारांच्या सु.८३% लोक होते. महाराष्ट्रातील अग्रेसर औद्योगिक जिल्ह्यांपैकी कोल्हापूर हा एक जिल्हा आहे.

लोक व समाजजीवन :

    जिल्ह्याची लोकसंख्या १९६१ ते १९७१ या दशकात १५,९६,४९३ वरून २०,४८,०४९ वर गेली म्हणजे तिच्यात २८% वाढ झाली. २१•५% लोक शहरांत व ७८•५% लोक खेड्यांतून राहतात. जिल्ह्यात शहरे व मोठी गावे १९ आहेत, तर खेडी १,०७८ आहेत. यांपैकी ४४% गावांत वीज आलेली आहे. स्त्रियांचे पुरुषांशी प्रमाण हजारी ९६१ असून लोकवस्तीची घनता दर चौ. किमी.स. २५४ आहे. करवीर, हातकणंगले, शिरोळ या भागांत ती जास्त तर गगनबावडा, चंदगड, शाहूवाडी या भागात ती कमी आहे. साक्षरता ३५% असून पुरुषांत ती ५०% तर स्त्रियांत फक्त २०% आहे. बहुसंख्य लोकांची भाषा मराठी असून काही लोक कानडी व काही उर्दू बोलतात. १९६१ मध्ये १,११,२१० पुरुष व १७,३९६ स्त्रिया प्राथमिक शिक्षण घेतलेल्या, तर ५,१७७ पुरुष व ३४९ स्त्रिया माध्यमिक शालान्त परीक्षा पास झालेल्या किंवा त्याहून अधिक शिकलेल्या होत्या. १९६८-६९ मध्ये जिल्ह्यात पूर्वप्राथमिक शिक्षणाच्या २९ संस्थांमधून १,३८० मुले आणि १,०६३ मुली ५८ शिक्षकांच्या हाताखाली शिकत होत्या. प्राथमिक शाळा १,८०० होत्या त्यांत ९७,२३७ मुली व १,७१,७३५ मुले होती. प्रशिक्षित प्राथमिक शिक्षक ६,०१५ व अप्रशिक्षित १,३०२ होते. माध्यमिक शिक्षणाच्या संस्था २१६ होत्या त्यांत ४०,७०९ मुले, ११,१७० मुली, १,६१६ प्रशिक्षित शिक्षक व ४९४ अप्रशिक्षित शिक्षक होते. उच्च शिक्षणाच्या सोळा संस्थांमधून ८,०७२ मुले, १,४०९ मुली व शिक्षकांची संख्या सु. ४५० होती. खास शिक्षणाच्या ३७ संस्थांत २,७३७ मुले, ६५८ मुली व ३०० हून अधिक शिक्षक होते. १९६७-६८ मध्ये वर्गीकृत जातींपैकी १८,८४१ मुले व ७,२५४ मुली शिकत होत्या आणि वर्गीकृत जमातींपैकी ३०३ मुले व ५५ मुली शिक्षण घेत होत्या. मागासवर्गापैकी ३५,२७० विद्यार्थ्यांना विनाशुल्क शिक्षण मिळत होते. कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठ असून गारगोटी येथे मौनी विद्यापीठ हे ग्रामीण विद्यापीठ व त्याच्या संलग्न संस्था आहेत.
     जिल्ह्यात ७८० ग्रामपंचायती असून कोल्हापूर, इचलकरंजी, कुरुंदवाड, जयसिंगपूर, कागल, मलकापूर, पन्हाळा, वडगाव, मुरगुड व गडहिंग्लज येथे नगरपालिका आहेत. १९६९ मध्ये जिल्ह्यात ६ रुग्णालये, ८० दवाखाने आणि १६ प्रसूतिगृहे होती. प्राथमिक वैद्यकीय केंद्रे २५ असून, ८७ डॉक्टर, ३४ वैद्य, १८९ परिचारिका व रुग्णांसाठी ६८४ खाटा होत्या. कोल्हापूरच्या दक्षिणेस सु. ३ किमी. वर शेंडापार्क येथे कुष्ठधाम असून आणखी पाच-सहा ठिकाणी कुष्ठरोग निवारण केंद्रे आहेत.
 
     जिल्ह्यातील ३२ गावांतून बँकांची सोय आहे. करमणुकीसाठी २२ चित्रपटगृहे व ११ फिरते चित्रपट तंबू आहेत. कोल्हापूर हे चित्रपट निर्मितीसाठी एकेकाळी फार गाजलेले होते व अजूनही तेथे चित्रपट निर्माण केले जातात.कोल्हापूर जिल्हा सहकारी संस्थांबाबत अग्रगण्य समजला जातो. १९६९-७० मध्ये सहकारी संस्थांची संख्या २,०९९ होती. जिल्ह्यात नोंदलेल्या सावकारांची संख्या ८७५ होती व त्यांनी एकूण २ कोटी ६० लाखांहून अधिक रक्कम कर्जाऊ दिली.
     कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांची राहणी मराठमोळा पद्धतीची आहे. धोतर, कुडते, मुंडासे व वहाणा आणि खांद्यावर कांबळे हा सर्वसाधारण खेडुतांचा वेश असतो, तर लुगडे व चोळी हा स्त्रियांचा वेश असतो. अलीकडे शहरी संपर्काने यात बराच फरक पडत आहे. तथापि कोल्हापूरी फेटा, कोल्हापूरी वहाणा, कोल्हापूरी रगेल व रंगेल भाषा यांचा प्रभाव जाणवतो. येथील सर्वसामान्य स्त्रिया प्रथम पुरुषी एकवचनी क्रियापदे– गेलो, जातो– अशी वापरताना आढळतात. खेड्यांतील शहरांतील घरे महाराष्ट्राच्या इतर भागाप्रमाणेच दगडामातीची, कौलारू किंवा पत्र्याच्या छपराची, तर शहरांतून आधुनिक बांधणीची व काही भागांत केवळ गवती छपराच्या झोपड्यांच्या स्वरूपात आहेत. लोकांचे मुख्य अन्न जोंधळा व नाचणी, त्याच्या जोडीला भाजी, कांदा, आमटी, परवडेल तेव्हा भात, मांस व मासे असे परंतु झणझणीत असते. तमाशा व कुस्ती हे लोकांचे आवडते शौक आहेत. कोल्हापूर हे तर कुस्तीगीरांचे माहेरच आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या कारकीर्दीत कुस्तीला विशेषच महत्त्व आले होते. त्यांनी व छत्रपती राजाराम महाराजांनी बहुजन समाजासाठी, मागासवर्गासाठी, हरिजनांसाठी मोठेच कार्य केले. कोल्हापूरची अंबाबाई व डोंगरावरचा जोतिबा ही कोल्हापूरच्याच नव्हे, तर अवघ्या महाराष्ट्रातील लक्षावधी लोकांची कुलदैवते आहेत. तसेच एकूण महाराष्ट्राप्रमाणेच येथेही ऐतिहासिक वैभवाचा प्रभाव दिसून येतो. शेतकऱ्यांत आधुनिक अवजारे आणि पद्धती वापरण्याची, कामकऱ्यांत छोटीमोठी यंत्रे तयार करण्याची, दुकानदारांत व व्यापाऱ्यांत व्यापारउदीम वाढविण्याची, सामान्य माणसात शिक्षणाची जिद्द दिसून येते.

दळणवळण व संपर्कसाधने:

   कोल्हापूर हे जिल्ह्याचे ठिकाण तालुक्यांच्या ठिकाणांशी व शेजारील जिल्ह्यांशी सडकांनी जोडलेले आहे. पुणे–बंगलोर राष्ट्रीय हमरस्ता कोल्हापूर व कागल शहरांवरून जातो. त्याची या जिल्ह्यातील लांबी ४४ किमी. आहे. १९७० साली जिल्ह्यात राज्यरस्ते ४१९ किमी., मोठे जिल्हारस्ते ४३८ किमी., इतर जिल्हारस्ते ५७१ किमी. व खेड्यांचे रस्ते ९५६ किमी. होते. एकूण ५६ किमी. रस्ते सिमेंटकाँक्रीटचे व ३५५ किमी. डांबरी होते. पुणे, मंबई, बेळगाव, निपाणी, रत्नागिरी, सावंतवाडी या बाजूंस प्रवासी गाड्यांची व मालमोटारींची सतत वाहतूक चालू असते. कोल्हापूर ही मोठी व्यापारपेठ असल्याने साहजिकच मालवाहतुकीचे ते महत्त्वाचे केंद्र बनले आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ४४० गाड्या कोल्हापूर विभागात धावत होत्या. खाजगी ३५६ व भाड्याचे २,९८५ मालवाहू ट्रक होते. रुग्णवाहक गाड्या १५, शाळांच्या मुलांसाठी ६, ट्रेलर १,१८८, ट्रॅक्टर १,०६४ व इतर ६१ वाहने होती. कोल्हापूर जिल्ह्यातून दक्षिण रेल्वेचा ३७•६८ किमी. लोहमार्ग गेलेला असून तो आता रुंदमापी झालेला आहे. कोल्हापूर–मुंबई जाणारी महालक्ष्मी एक्सप्रेस त्यावरून नियमित जाऊ लागली आहे. जिल्ह्यात ३४६ टपालकचेऱ्या, ४३ तारकचेऱ्या, २,५०१ दूरध्वनी व ४६,०८१ रेडिओ परवानाधारक होते. १७७ छापखाने असून ८ दैनिके, २१ साप्ताहिके (हातकणंगले २, भुदरगड १, करवीर १८ ) व ११ मासिके प्रसिद्ध होतात.
 

प्रेक्षणीय स्थळे :

   कोल्हापूर शहर हे एक प्राचीन, धार्मिक व सांस्कृतिक केंद्र आहे. कोल्हापूरजवळील उत्खननात ब्रह्मगिरी येथे दुसऱ्या शतकापूर्वीचे अवशेष मिळाले आहेत. सु. दहाव्या-बाराव्या शतकांत कोल्हापूर शिलाहारांची राजधानी होती व कोल्हापूर जिल्ह्याचा प्रदेश जैनांचा बालेकिल्ला समजला जाई. आजचे महालक्ष्मीचे मंदिर आणि खिद्रापूर येथील जैन मंदिर हे त्यांचे अवशेष प्रसिद्ध आहेत. जैनांच्या ऱ्हासकालात हे हिंदू धर्माचे केंद्र व एक शक्तिपीठ बनले शंकराचार्यांचा कडाप्पाचा मठ हा जुन्यापैकी एक समजला जातो. संस्थानी राजवटीत कोल्हापूरला वेगळेच महत्त्व चढले हाेते, त्याचे आधुनिक स्वरूपही विलोभनीय आहे. देवालये , तलाव, राजवाडे, चित्रपटगृहे, शैक्षणिक व इतर संस्था, नाट्यगृहे, कुस्तीचा आखाडा, पुतळे इत्यादींमुळे ते आकर्षक झाले आहे. पन्हाळा किल्ला जवळच आहे तेथे काही जुन्या इमारती व नवीन तबक उद्यान प्रेक्षणीय आहे. तेथे प्रवाशांसाठी राहण्याची सोयही केलेली आहे. विशाळगड किल्ल्यावर महादेवाचे देऊळ आहे. रांगणा व गगनगड हे अवघड किल्ले धाडसी प्रवाशांस आव्हान देतात व चढून गेल्यावर अपूर्व समाधान देतात. पंचगंगेवरील प्रयाग, सांगवड्याचे नृसिंहमंदिर, वाडीचा नरसोबा व त्याजवळील रम्य नदीघाट, डोंगरावरील जोतिबाचे देवालय, कुंभोजचे जैन तीर्थक्षेत्र व तेथील बाहुबलीचा अतिभव्य पुतळा ही भाविकांस आवाहन करतात. कोकणात जाणाऱ्या घाटातील वनश्री निसर्गरम्य आहे.कोल्हापूर हे [महाराष्ट्र] च्या [दक्षिण] भागातील मोठे [शहर] आहे. येथील मुख्य [भाषा] [मराठी] आहे. येथील [महालक्ष्मी] अंबाबाईचे [मंदिर] हे महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. [पंचगंगा] इथली प्रमुख नदी आहे. शहराच्या आसपास [पन्हाळा], [गगनबावडा], [नृसिंहवाडी], [खिद्रापूर], [विशाळगड], [राधानगरी], [दाजीपूर अभयारण्य] इत्यादी ठिकाणे आहेत. [शाहू महाराज छत्रपती शाहूमहाराजांच्या] काळात म्हणजेच १८७४ ते १९२२ मध्ये शहराचा मोठा विकास झाला. कोल्हापूर हे प्रसिद्ध क्षेत्र आहे.

इतिहाससंपादन करा

खाद्यसंस्कृतीसंपादन करा

       कोल्हापूर हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध शहर आहे कि ज्याला एक सांस्कृतिक वारसा आहे.कोल्हापूर आपल्या रंगबेरंगी पोशाख आणि कोल्हापुरी चप्पल यासोबतच आणखीन काही गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. येथील खाण्या पिण्यापासून फिरण्यापर्यंतच्या सर्वच गोष्टी खास आहेत.येथे येणाऱ्या पर्यटकांचे येथील संस्कृतीची सुंदरता पाहून मनच भरत नाही.महाराष्ट्रातील या सुंदर शहरामध्ये अशा बरयाच गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आकर्षक वाटतील.कोल्हापूर एक प्राचीन शहर आहे कि ज्याच्यावर काही काळापूर्वी छत्रपती भोसले घराण्याचे शासन होते. स्थळ कोणतीही असो पण त्या ठिकाणची ट्रीप स्मरणात राहील अशी मजेदार होण्यासाठी त्या ठिकाणचे सर्वात प्रसिद्ध आणि रुचकर खाद्य पदार्थ खाण्यास कधीच विसरायचे नाही.आणि विषय जेव्हा कोल्हापुर चा होतो तर त्याठीकाव्ची मिसळ कोण विसरेल .महाराष्ट्रातील ही प्रसिद्ध मिसळ कोल्हापुर मध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे मिळते जसे की बावडा मिसळ, फडतरे मिसळ , चोरगे मिसळ , हॉटेल साकोलीमिसळ ,खासबाग मिसळ आणखीन अशा भरपूर आहेत. ही गोष्ट झाली शाकाहारी पदार्थांच्या खाण्यासंदर्भात आता आपण मांसाहारी खाद्य पदार्थांच्या संदर्भात पाहू तांबडा रस्सा (मटणाचे सूप ),पांढरा रस्सा (मटणाचे सूप फक्त पांढऱ्या रंगाचे ),मटणाचे लोणचे ,खिमा राईस बॉल्स कोल्हापुरात आलेली प्रत्येक व्यक्ती या पदार्थांची चव घेतल्याशिवाय राहत नाही. 
       कोल्हापूर ठिकाण तांबडा आणि पांढरा रस्सा, मिसळपाव, वडापाव या खाद्यपदार्थांसाठी अतिशय प्रसिद्ध आहे. तसेच, कोल्हापूरची 'कोल्हापूरी चप्पल' ही खुप प्रसिद्ध आहे त्याला कोल्हापुरी चप्पल असे म्हंटले जाते .आपुलकीची भावना ही इथल्या माणसांच्याकडे आहे. येथे मिसळपाव हा प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे. तसेच खाऊ गल्लीत राजाभाऊंची भेळ प्रसिद्ध आहे.तसेच बावडा मिसळ, फडतरे, चोरगे, हॉटेल साकोली अशी अनेक मिसळपावची ठिकाणे प्रसिद्ध आहेत.मिरजकर तिकटी,गंगावेस येथे दुध कट्ट्यावर उत्तम प्रकारचे ताजे दुध मिळते.कोल्हापूरची खाद्यसंस्कृती म्हटलं की डोळ्यांपुढं सर्वप्रथम येतो तो तांबडा रस्सा-पांढरा रस्सा. नंतर आठवते ती झणझणीत कोल्हापुरी मिसळ. कोल्हापुरी खाद्यजीवनाचं ठळक वैशिष्ट्य म्हणजे मांसाहार. इथल्या आहारात वेगवेगळ्या मांसाहारी पदार्थांची रेलचेल असते. याच खाद्यसंस्कृतीचा हा परिचय, काही शाकाहारी पदार्थांसह.कोल्हापूर हे महाराष्ट्राच्या दक्षिण भागातलं मोठं शहर. इथलं महालक्ष्मी अंबाबाईचं मंदिर हे देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक. पंचगंगा इथली प्रमुख नदी. शहराच्या आसपास पन्हाळा, गगनबावडा, नृसिंहवाडी, खिद्रापूर, विशाळगड, राधानगरी, दाजीपूर अभयारण्य आदी ठिकाणं आहेत.लवंगी मिरची आणि तमाशा यासाठी विख्यात असलेल्या कोल्हापुरातला तांबडा रस्सा व पांढरा रस्साही प्रसिद्ध आहे. कोल्हापूर जिल्हा (जुना) शाहूमहाराजांचा जिल्हा म्हणूनही सर्वपरिचित आहे.
    एका आख्यायिकेनुसार, प्राचीन काळी केशी राक्षसाचा मुलगा कोल्हासुर हा इथं राज्य करत होता. त्यानं सगळ्यांना त्रस्त करून सोडलं होतं म्हणून देवांच्या प्रार्थनेवरून महालक्ष्मीनं त्याच्याशी युद्ध केलं. हे युद्ध नऊ दिवस चाललं होतं.अश्विन शुद्ध पंचमीला महालक्ष्मीनं कोल्हासुराचा वध केला. कोल्हासुर महालक्ष्मीला शरण गेला आणि त्यानं तिच्याकडं, आपल्या नगराची कोल्हापूर व करवीर ही जी नावं आहेत ती तशीच पुढंही राहावीत, असा वर मागितला. त्यानुसार या नगरीला कोल्हापूर वा करवीर या नावानं ओळखलं जातं. कोल्हापूरची मिसळ आणि मटणाचा तांबडा-पांढरा रस्सा हे दोन खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहेत. पिवळाधमक गूळ आणि मसाले कुटणारे डंख हेही कोल्हापूरचं वैशिष्ट्य. सध्या भारतातल्या बहुतेक हॉटेलांत व्हेज कोल्हापुरी, कोल्हापुरी चिकन हे पदार्थ उपलब्ध असतात; पण ‘व्हेज कोल्हापुरी’ हा प्रकार कोल्हापुरातच मिळत नाही. कारण, या नावाचा प्रकारच मुळात कोल्हापुरात नाही! असो. इथली गंमत म्हणजे, तांबडा रस्सा व पांढरा रस्सा एकेक वाटी घेऊन त्याबरोबर चिकन किंवा मटण खायचं. म्हणजेच तांबडा रस्सा तिखट लागला तर त्यात पांढरा रस्सा मिसळून आपल्याला योग्य अशा चवीचा रस्सा खाता येतो. हा रस्सा बाकी रश्शांाप्रमाणे किंवा ग्रेव्हीप्रमाणे टिकाऊ नाही. तांबडा रस्सा तयार करताना कोल्हापुरी चटणी वापरावी लागते. कोल्हापूरचा अजून एक प्रकार मला आवडतो व तो म्हणजे दावणगिरी लोणी दोसा. हा दोसा ‘जनता बाजार’ इथं मिळतो. भरपूर लोणी आणि जाळीदारपणा ही त्याची खासियत. यात चुरमुऱ्याचा वापर केला जातो. कोल्हापुरी मांसाहारी, शाकाहारी स्वयंपाकाची घराघरातली पद्धत जवळपास सारखीच असते. पांढरा तांबडा रस्सा, सुकं मटण, खिमा हे प्रकार आख्ख्या कोल्हापुरात होत असतात. त्याचबरोबर तिथल्या पोळ्यांचीही (चपात्या) एक खासियत आहे. तीन पदर सुटलेली व खरपूस तेल लावून भाजलेली ही गरम गरम चपाती अप्रतिम लागते. इथली आणखी एक खासियत म्हणजे ‘पोकळा’ नावाची पालेभाजी. तव्यावर केलेली ही भाजी, भाकरी आणि खर्डा यांना तोड नाही. याबरोबरच दूधकट्ट्यावर मिळणारं आणि ग्राहकासमोरच काढण्यात येणारं म्हशीचं धारोष्ण दूध. थेट पेल्यातच धार काढायची व पेला तोंडाला लावायचा! आणखी एक अफलातून प्रकार म्हणजे, ताज्या दुधात सोडा घालून प्यायची पद्धत अशा पद्धतीने दुधाचे निर्जंतुकीकरण होत

पौराणिकसंपादन करा

कोल्हापूरचे श्री महालक्ष्मी मंदिर महाराष्ट्रातील साडेतीन शक्ती पीठांपैकी एक आहे.प्राचीन भारतातील विभिन्न पुराणांनी १०८ शक्तीपीठांची सूची तयार केली आहे कि जिथे शक्तीची देवी प्रकट झाली आहे.यामध्ये करवीर क्षेत्राची श्री महालक्ष्मी (जेथे आजचे वर्तमान कोल्हापूर शहर आहे) चे विशेष महत्त्व आहे.श्री महालक्ष्मी मंदिर कोल्हापूरच्या सहा शक्तीपैकी एक आहे कि जिथे कोणतीही इच्छा पुरी होण्याबरोबर मुक्तीही मिळू शकते.यासाठी या स्थळाला काशीच्या तुलनेत अधिक महत्त्व प्राप्त होते. ही ती जागा आहे कि जिथे विष्णू ची पत्नी श्री महालक्ष्मी ला मोक्ष मिळण्यासाठी प्रार्थना करते.

श्री महालक्ष्मी आणि श्री विष्णू दोघेही नेहमी करवीर क्षेत्रामध्ये राहतात असे म्हंटले जाते आणि ते दोघेही हे करवीर निवास महाप्रकाश्याच्या वेळेस पण सोडणार नाहीत.करवीर क्षेत्र नेहमीच धन्य आहे असे मानले जाते कारण महालक्ष्मी आपल्या उजव्या हाताने आई जगदंबेच्या रुपात प्रकट होते यासाठी हे क्षेत्र सर्वच प्रकारच्या विनाशापासून सुरक्षित आहे.भगवान विष्णू स्वतः या क्षेत्राला वैकुंठ आणि क्षीरसागर या दोन स्थानांपेक्षाही अधिक पसंत करतात.कारण इथे त्यांची पत्नी लक्ष्मी चे निवासस्थान आहे.म्हणूनच या क्षेत्राच्या महानतेने अनेक संताना व कवींना आपल्याकडे आकर्षित केले आहे. या करवीर क्षेत्राने आपल्या भक्तांवर केलेले प्रेमानी दिलेले आशीर्वाद हे अतुलनीय आहे.असेही मानले जाते कि श्री दत्तात्रेय अजून पण या ठिकाणी दान करण्यासाठी दुपारच्या वेळेस येतात.

महालक्ष्मी मंदिर वास्तुकला रचनेवर जे नक्षी कामाचे संकेत आहेत त्यावरून असे सांगण्यात येईल कि हे मंदिर चालुक्य शासन काळातील म्हणजेच ६०० ते ७०० काळातील असावे.मंदिराची बाहेरची संरचना आणि स्तंभांची कलाकृती हा कलेचा एक अद्भूत नमुना आहे. देवीची मूर्ती रात्नापासून बनवली आहे ही जवळ जवळ ५००० ते ६००० वर्षापूर्वीची असावी असे मानले जाते.महालक्ष्मी ची मूर्ती ही ४० किलो वजनाची आहे.कोल्हापूर पर्यटनामध्ये महालक्ष्मी मंदिर हे प्रमुख स्थान आहे.यासाठीच देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक भेट देतात

कोल्हापूर हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर असून प्राचीन काळापासून दक्षिण काशी या नावाने ते प्रसिद्ध आहे.महालक्ष्मी मंदिर आणि जोतिबाचे मंदिर यामुळे हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणूनही ओळखले जाते. तसेच ऐतिहासिकदृष्ट्या कोल्हापूर महत्त्वाचे शहर असून प्राचीन काळापासून ते विविध राजघराण्याचे राजधानीचे ठिकाण होते.

हिंदू धर्मशास्त्रानुसार, प्राचीन काळी केशी राक्षसाचा मुलगा कोल्हासुर हा इथे राज्य करीत होता. याने राज्यात अनाचार व सर्वाना त्रस्त करून सोडले होते. म्हणून देवांच्या प्रार्थनेवरून महालक्ष्मीने त्याच्याशी युद्ध केले. हे युद्ध नऊ दिवस चालले होते . आणि अश्विन शुद्ध पंचमीस महालक्ष्मीने कोल्हासूर या राक्षसाचा वध केला होता. त्यावेळेस कोल्हासूर महालक्ष्मीला शरण गेला आणि त्याने तिच्याकडे आपल्या नगराची कोल्हापूर व करवीर ही नावे आहेत तशीच चालू ठेवावीत असा वर मागितला. त्याप्रमाणे या नगरीला कोल्हापूर वा करवीर या नावाने ओळखले जाते. ["श्री करवीर निवासिनी"]

मध्ययुगीनसंपादन करा

इ.स.पूर्व १ ल्या शतकापासून ते इ.स.च्या ९ व्या शतकापर्यतच्या ऐतिहासिक कालखंडात कोल्हापूर येथील वसाहत आजच्या ब्रह्यपुरीच्या टेकडीवर होती. ब्रह्यपुरीच्या टेकडातील अवशेषांचे अन्वेषण व उत्खनन असे दर्शविते की, सातवाहन काळात या परिसरात समृद्ध व सुसंस्कृत लोकसमुदाय वस्ती करून रहात होता. इ.स. २२५ ते ५५०पर्यत वाकाटक, कदंब, शेद्रक व मौर्य या प्राचीन राजघराण्यांचे राज्य होते. इ.स.५५० ते ७५३ या कालखंडात बदामीच्या चालुक्य घराण्याची सत्ता येथे प्रभावी होती. इ.स.च्या १२ व्या शतकात कोल्हापुरात शिलाहारांचे राज्य होते. इ.स.१२१० मध्ये देवगिरीचा राजा सिंघणदेव याने कोल्हापुराच्या शिलाहार सम्राट भोजराजाचा पराभव केला. त्यानंतर देवगिरीच्या यादवांच्या एका प्रांताची राजधानी म्हणून कोल्हापूर अग्रेसर राहिले .१२९८ मध्ये देवगिरीच्या यादवांचा पराभव झाल्यानंतर १३०६-१३०७मध्ये कोल्हापूर शहरात मुसलमानी सत्तेचा अंमल सुरू झाला. कोल्हापूर या शहराला ऐतिहासिक राजधानी म्हणून ओळखले जाते.

मराठा साम्राज्यसंपादन करा

देवगिरीच्या यादवांचा पराभव झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा मुलुख स्वराज्यात समाविष्ट करेपर्यंत कोल्हापूर पारतंत्र्यातच होते. शिवाजी महाराजांनी अफझलखानच्या वधानंतर २८ नोव्हेंबर १६५९ रोजी पन्हाळा हा किल्ला घेतला आणि कोल्हापूर छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या राज्यात समाविष्ट झाले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी यांच्या काळातील अनेक ऐतिहासिक घटनांचे कोल्हापूर हे साक्षीदार आहेत्.


१ सिद्धी जोहरने पन्हाळ्याला वेढा देऊन शिवरायाना कोंडीत पकडले होते .
२ शिवा काशीद आणि बाजीप्रभू देशपांडे याच्या आत्मबलिदानाने ही भूमी पावन झाली आहे.
३ कोंडोजी फर्जंद आणि अण्णाजी दत्तो यांचा असामान्य पराक्रम याच भूमीत घडला.
४ दिलेरखानच्या गोटातून निसटून आलेल्या संभाजीमहाराज आणि शिवरायाच्या भावपूर्ण भेटीचा याच प्रदेशात झाली..
५ संभाजीराजास पकडणार्‍या कोल्हापूरचा ठाणेदार शेख निजामास संताजी घोरपडे यांनी याच मातीत धूळ चारली.
६ छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका पत्राने निराश होऊन रागाने बहलोलखानास पकडायला गेलेल्या सरसेनापती प्रतापराव गुर्जर आणि त्यांच्या सहा सहकार्‍यांचा भीमपराक्रम याच कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी या भूमीत घडला.
[१]

कोल्हापूर संस्थानसंपादन करा

शिवछत्रपतींच्या मराठा राज्याची इसवी सन १७०७ साली दोन तुकडे झाले . कोल्हापूर आणि सातारा या दोन गाद्या अस्तित्वात आल्या. त्या पैकी कोल्हापूर संस्थानच्या अधिपती ह्या महाराणी ताराराणी बनल्या. पुढे जरी संपूर्ण भारत देशाबरोबर कोल्हापूर संस्थान जरी ब्रिटिश अधिपत्याखाली आले असले तरी कोल्हापूर संस्थानच्या अधिकारांना धक्का लागला नाही. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताच्या स्वातंत्र्यानंतर कोल्हापूर संस्थान देखील स्वतंत्र भारतात विलीन झाले.

शाहू कालीन सिंचन व्यवस्थासंपादन करा

कोल्हापूर हे स्वतंत्र संस्थान असल्यामुळे या संस्थानयानासाठी स्वतची एक वेगळ्या प्रकारची व पर्यावरण पूर्वक सिंचन व्यवस्था वापरात होती व आज हि सिंचन व्यवस्था शहराच्या जुन्या भागात चालू असून त्याचा वापर खूप कमी प्रमाणात चालू आहे.या सिंचन व्येव्स्तेसाठी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर शहराच्या दक्षिण भागात कात्यायनी देवाच्या मंदिरात कुंड आहे तीतून नेसर्गिक पाण्याच्य झरा ला सुरवात होते तीतून ते कळंबा तलाव येथे आणले.तलावाचा व्यास मोठा असल्यामुळे तेथील पाण्याचा वापर जवळपासच्या शेतीसाठी केला जात होता व अजूनही होतो. तिथे महाराजांनी बंधारा बांधला जो जमिनीपासून पाच ते सहा फूट उंच ठेवला जेणेकरून त्या पाण्यामधे पाला पाचोळा केवा इतर काही जाऊन दुषित होऊ नये कळंब तलावातील पाणी त्या बंधाऱ्या द्वारे पाण्याचा खजिना या ठिकाणी आणले या साठी भौगोलिक परीस्थिती व गुरुत्वाकर्षण या गोष्टींचा विचार केला होता. पाण्याचा खजिना या ठिकाणी पाण्याचा साठा करून ते पूर्ण शहरात पुरवले जात होते.

भूगोलसंपादन करा

कोल्हापूर हे महाराष्ट्राच्या दक्षिणेला, पंचगंगा नदीच्या तीरावर वसलेले शहर असून ते मुंबईपासून ३७६ किमी, पुण्यापासून २३२ किमी, गोव्यापासून २२८ किमी आणि बंगलोरपासून ६६५ किमी अंतरावर आहे. कोल्हापूर सह्याद्रीच्या पश्चिम घाटमाथ्यावर असून त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ५६९ मी. (१८६७ फूट) इतकी आहे. राष्ट्रीय महामार्ग ४ इथून जातो.

 
पंचगंगा नदी कोल्हापूर

हवामानसंपादन करा

कोल्हापूरच्या हवामानात सागरी हवामान आणि जमिनीवरील हवामान यांचे मिश्रण आहे . तापमान १०°सें ते ३५° सें दरम्यान असते. शेजारील शहरांच्या तुलनेत कोल्हापूरमधील उन्हाळा तुलनेने सौम्य आहे, परंतु हवामान जास्त दमट असते. उन्हाळ्यात शहराचे कमाल तापमान हे ३८°सें असून सरासरी ३३°सें ते ३६°सें च्या दरम्यान असते.

हिवाळा साधरणतः नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान असतो . महाराष्ट्रातील इतर शहरांच्या (पुणे आणि नाशिक) मानाने कोल्हापूरचे तापमान हिवाळ्यात बरेच उबदार असते. हिवाळ्यातले येथील तापमान हे दिवसा २६°सें ते ३२°सें च्या दरम्यान असते तर रात्री ते ९°सें ते १६°सें पर्यंत खाली जाते.

Kolhapur साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
सरासरी कमाल °से (°फॅ) 31
(88)
33
(91)
36
(97)
37
(99)
33
(91)
29
(84)
27
(81)
26
(79)
28
(82)
30
(86)
29
(84)
29
(84)
30.7
(87.2)
सरासरी किमान °से (°फॅ) 15
(59)
17
(63)
20
(68)
22
(72)
22
(72)
22
(72)
22
(72)
21
(70)
21
(70)
21
(70)
17
(63)
15
(59)
19.6
(67.5)
सरासरी वर्षाव मिमी (इंच) 4.3
(0.17)
0.5
(0.02)
6.1
(0.24)
26.9
(1.06)
46.2
(1.82)
140
(5.51)
338.3
(13.32)
181.6
(7.15)
101.6
(4.00)
103.6
(4.08)
40.6
(1.60)
5.6
(0.22)
995.9
(39.21)
स्रोत: Government of Maharashtra

पाण्याची उपलब्धतासंपादन करा

कोल्हापूर हे पंचगंगा नदीच्या किनारी वसलेले शहर असून तिचा उगम पश्चिम घाटामध्ये होतो. या नदीला भोगावती, कुंभी, कासारी, तुळशी आणि धामणी अशा पाच उपनद्या असून त्या शहर आणि आसपासच्या परिसरातून वाहतात. तलाव शहर आहे असे म्हणतात. कोल्हापुरात पूर्वी फिरंगाई , वरुणतीर्थ, लक्षतीर्थ, कपिलतीर्थ, कुंभारतळे, महारतळे, पद्माळे, सिद्धाळा, रंकाळा, कोटीतीर्थ, रावणेश्वर तलाव अशी तळी होती. पण जसजसे शहर वाढू लागले तसे ती तळी बुजवून तिथे नागरी वस्ती झाली. यातील फक्त रंकाळा, आणि कोटीतीर्थ हे तलाव सध्या अस्तित्वात आहेत. १७९२ साली कात्यायनीहून नळ घालून शहरात पाणी आणून ते शहरातील निरनिराळया ठिकाणच्या ३२ विहिरीमध्ये सोडले गेले. १३० वर्षांपूर्वी कोल्हापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी कळंबा तलाव बांधण्यात आला. ओघळणारे पावसाचे पाणी कळंबा गावाजवळ दगड मातीचा बंधारा घालून अडवण्यात आले. शहरापेक्षा उंच ठिकाणी हा तलाव असल्याने त्यातील पाणी नैसर्गिक उताराच्या साहाय्याने शहरात नळावाटे आणले.

[२]

विशाल रंकाळा तलावाचे दृश्य

उपनगरेसंपादन करा

आधुनिक कोल्हापूरसंपादन करा

कोल्हापूर आता दक्षिण महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वपूर्ण शहर म्हणून ओळखले जाते.राजकिय, शैक्षणिक , सामाजिक , आर्थिक आणि सांस्कृतिक सर्वच क्षेत्रात कोल्हापूरने घेतलेली झेप कौतुकास्पद आहे. कोणतेही नव्याने होणारे बदल योग्य प्रकारे स्वीकारून आपल्या योग्य परंपरा पुढे ठेवण्याची कला कोल्हापूरला योग्य प्रकारे साधली आहे.

अर्थव्यवस्थासंपादन करा

कोल्हापूर जिल्ह्यासहित कोल्हापूर शहराची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे. ऊस हे येथील महत्त्वाचे पीक आहे साहजिकच उसावर आधारित उद्योगधंद्याना इथे महत्त्वाचे स्थान आहे. कोल्हापूर शहरात राजाराम सहकारी साखर कारखाना आहे. कोल्हापुरी गूळ अखिल भारतातला उत्कृष्ट गूळ समजला जातो.येथे गुळ संशोधन केंद्राची स्थापना ही करण्यात आली. कोल्हापूर हे येथील दुधासाठीही प्रसिद्ध असून गोकुळ, वारणा, शाहू, मयुर,स्वाभिमानी इत्यादी सहकारी दुग्धसंस्था इथे आहेत. शिवाजी उद्यमनगर, वाय.पी.पोवारनगर, पांजरपोळ या कोल्हापूर शहरात असलेल्या औद्योगिक वसाहती आहेत. फाउंड्री उद्योगात कोल्हापूरने बरीच भरारी घेतली असून लोखंडाचे सुट्टे भाग बनवणारे सुमारे ३०० कारखाने इथे आहेत.कागल फाईव स्टार एमआयडीसी आहे.

प्रशासनसंपादन करा

नागरी प्रशासनसंपादन करा

महापौर - सौ. सूरमंजिरी लाटकर

उप महापौर - श्री. भूपाल शेटे

महानगरपालिका आयुक्त - डॉ.अभिजित चौधरी महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त - श्री. नितिन ना देसाई

जिल्हा प्रशासनसंपादन करा

जिल्हाधिकारी - दौलत देसाई

अपर जिल्हाधिकारी - नंदकुमार काटकर

निवासी उपजिल्हाधिकारी -संजय शिंदे

जिल्हा पुरवठा अधिकारी - श्रीमती राणी ताटे

उप विभागीय अधिकारी करवीर-सचिन इथापे

तहसीलदार करवीर -सचिन गिरी

वाहतूक व्यवस्थासंपादन करा

 
कोल्हापूर विमानतळ

कोल्हापूर शहर रस्ते व रेल्वे मार्गांने महाराष्ट्र व देशाच्या इतर शहरांसोबत जोडले गेले आहे. मुंबई ते चेन्नई दरम्यान धावणारा राष्ट्रीय महामार्ग ४ कोल्हापूर शहरामधून जातो. संपूर्णपणे चौपदरीकरण केलेल्या ह्या महामार्गाद्वारे पुणे, मुंबई तसेच कर्नाटकातील बेळगाव, बंगळूर इत्यादी शहरांपर्यंत जलद वाहतूक शक्य होते. अनेक राज्य महामार्ग कोल्हापूराला कोकणाशी जोडतात. छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरातील प्रमुख रेल्वे स्थानक असून येथून देशाच्या अनेक मोठ्या शहरांपर्यंत रेल्वेगाड्या उपलब्ध आहेत. कोल्हापूर विमानतळ कोल्हापूर शहराच्या ९ किमी आग्नेयेस असलेल्या उजळाईवाडी या ठिकाणी आहे. सध्या येथून विमानसेवा उपलब्ध आहे.

शिक्षणसंपादन करा

कोल्हापूर शहरात खालील काही नामांकित शैक्षणिक संस्था आहेत. येथे दर्जेदार शिक्षण मिळते. त्यामध्ये सायबर(छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस एज्युकेशन आणि रीसर्च,कोल्हापूर) गेल्या ४० वर्षापासून प्रसिद्ध आहे.ही एकमेव स्वायत्त संस्था आहे ज्याला NAAC A+ मिळाले आहे आणि ह्या ठिकाणी संशोधन पण होते. पर्यावरण व्यवस्थापन या विषयामध्ये एम.बी.ए. व पर्यावरण व सुरक्षा या विषयामध्ये एम्म.एस्सी. असे नाविन्यपूर्ण पदव्युत्तर अभ्यासक्रम इथे उपलब्ध आहेत.इ.स.१९६२ मध्ये स्थापन झालेले शिवाजी विद्यापीठ हे देशातील एक अग्रगण्य विद्यापीठ म्हणून ओळखले जाते. तसेच कोल्हापूर छ. शिवाजी महाराज यांचे नावाने परिपूर्ण व सर्वसामान्यांच्या शिक्षणासाठी शिवाजी विद्यापीठाची स्थापना महाराष्ट्र शासनाने केलेली आहे जिल्ह्यातील गारगोटी येथे परिपूर्ण शिक्षणाची सोय आहे .महावीर कॉलेज . श्रीमती ताराराणी ट्रेनिंग कॉलेज. ‍‍ राजाराम कॉलेज .

लोकजीवनसंपादन करा

संस्कृतीसंपादन करा

कोल्हापूरच्या संस्कृतीत येथील मराठी चित्रपटांची निर्मिती आणि येथील पहिलवानांची कुस्ती या दोनच गोष्टी प्रामुख्याने आहेत.

चित्रपटसंपादन करा

मराठी चित्रपट सृष्टीचे माहेरघर म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. अनेक अजरामर चित्रपटांची कोल्हापूर मध्ये स्वातंत्र्यानंतरच्या काळात निर्मिती झाली.चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी प्रभात स्टुडिओ आणि कोल्हापूर चीत्रनगरी सारखी उत्तम ठिकाणे उपलब्ध आहेत.

कुस्तीसंपादन करा

  कुस्ती’ मर्दानी कुस्ती हा कोल्हापूरातील लोकप्रिय खेळ आहे. काही राजे हे स्वतः एक चांगले पैलवान आहेत. जवळजवळ प्रत्येक आठवड्याला येथे जंगी कुस्त्यांचे नियोजन केले जाते. अशावेळी खुल्या मैदानात कुस्त्या खेळवल्या जातात. येथील राजे शाहु महाराज हे एक पैलवान होते आणि त्यांनी स्वतः खासबाग मैदानाची कुस्ती खेळासाठी बांधणी केली. जेव्हा ते युरोप सहलीला गेले होते त्यावेळी त्यांनी तेथे रोम येथील प्रसिध्द ‘कॅलोशिअम’ मैदान पाहिले आणि त्यावेळी त्यांनी अशा प्रकारचे मैदान कोल्हापूरात उभारायचे ठरवले आणि त्यांनी सहलीवरून परत आल्यानंतर ‘कॅलोशिओ’ सारखे खासबाग मैदान उभारले.खासबाग हे एकमेवच भारतातील कुस्तीचे मैदान आहे. मैदानाच्या मध्यभागी असलेल्या हौद्यातील कुस्ती कोणत्याही अडथळ्याशिवाय जवळजवळ 60,000 लोक पाहू शकतात. राजकीय लोकांकरीता एक वेगळा भाग ईशान्य बाजुला ऊभारला आहे.

एकेकाळी कोल्हापुरात कुस्ती खेळणार्‍या पहिलवानांच्या सुमारे ३०० तालीमसंस्था होत्या. अन्य राज्यातील मल्ल येथे कुस्ती शिकायला येत, आजही येतात. मात्र आज या ३०० तालीमसंस्थांपैकी जेमतेम ६० तालमी शिल्लक राहिल्या आहेत. त्यांपैकी सुमारे ५२ तालमीच्या जागेचा उपयोग नाच-गाणी रस्सा-मंडळे, राजकीय बैठका, हळदी-कुंकू आदी कार्यक्रम चालतात. उरलेल्या आठ आखाड्यांमध्ये आजही कुस्ती जोशात चालते. ते आखाडे असे :-
१. कसबा बावडा कुस्ती केंद्र
२. खासबाग
३. नवी मोतीबाग तालीम
४. पंत बावडेकर आखाडा
५. मोतीबाग तालीम
६. शाहू आखाडा, चंबूखडी
७. शाहू आखाडा, मार्केट यार्ड
८. शाहूपुरी आखाडा
९. शाहू विजयी गंगावेस
10.कालाईमाम तालिम

खाद्यसंस्कृतीसंपादन करा

झणझणीत व मसालेदार जेवणासाठी कोल्हापूरची ख्याती आहे.कोल्हापूरची मिसळ, भडंग आणि मटणाचा तांबडा-पांढरा रस्‍सा हे दोन खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहेत. कोल्हापुरात मिळणारा तांबडा पांढरा रस्सा कुठेच मिळत नाही.  कोल्हापूरचा पिवळा धम्मक गूळ आणि मसाले कुटणारे डंख हेही कोल्हापूरचे वैशिष्ट्य. झणझणीत खाद्य संस्कृती कोल्हापूरमध्ये पहावयास मिळते.

अन्यसंपादन करा

कोल्हापूरची शुद्ध चामड्याची चप्पल तिच्या वैशिष्ट्यपूर्ण आकारासाठी आणि टिकाऊपणासाठी जगप्रसिद्ध आहे. ही चप्पल बनवताना खिळे वापरले जात नाहीत.हि चप्पल पूर्णपणे चामड्या पासून बनवली जाते.कोल्हापुरी चपलाला GI मानांकन मिळाले.(२०१९) कोल्हापूरी साज, चपला हार इत्यादी दागिने प्रसिध्द आहेत.

संगीत महोत्सवसंपादन करा

रंगभूमीसंपादन करा

 • कोल्हापूरमध्ये संगीतसूर्य केशवराव भोसले नावाचे नाट्यगृुह आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या इचलकरंजी  मध्ये घोरपडे नाट्यगृह देखील आहे.

धर्म- अध्यात्मसंपादन करा

 • कोल्हापूरचे महालक्ष्मीचे मंदिर देशभर प्रसिद्ध आहे. बाहेरगावचा मराठी माणूस कोल्हापूरला आला आणि मंदिरात गेला नाही असे सहसा होत नाही. मंदिरात इतके खांब आहेत की सामान्य माणूस ते मोजू शकत नाही, असा भाविकांचा समज आहे.कोल्हापूरची शान आहे, महालक्ष्मी (आंबाबाई) मंदिर.

कोल्हापूर पासून २२ किमी अंतरावर श्री क्षेत्र जोतीबा (वाडीरत्नागिरी) हे सुप्रसिद्ध देवस्थान आहे. दरवर्षी लाखो भाविक केदारनाथ श्री जोतीबाच्या दर्शनाला येतात.जोतीबा चैत्र याञेला प्रसिद्ध अशी गर्दी असते आणि मंदिरावर गुलालाचा वर्षाव असतो .


सद्य राजकीय स्थिती:

कोल्हापूर मध्ये लोकसभेचे दोन तर विधानसभेचे दहा मतदारसंघ पाहायला मिळतात.त्यापैकी लोकसभेचे कोल्हापूर आणि हातकनंगले असे दोन आहेत पैकी हातकनंगले लोकसभा मतदारसंघात सांगली जिल्ह्यातील वाळवा आणि शिराळा या दोन तालुक्यांचा समावेश झालेला आहे. सध्या या दोन्ही लोकसभा मतदारसंघांचे नेतृत्व शिवसेनेचे संजयदादा मंडलिक व शिवसेनेचे धैर्यशील माने हे करत आहेत.कोल्हापुर जिल्ह्यात २०१९ ला झालेल्या विधानसभा निवडणूक निकालाप्रमाणे दहा मतदारसंघात राष्ट्रीय कॉंग्रेस ला ५ , राष्ट्रवादी कॉंग्रेसला १ , शिवसेना १ , जनसुराज्य शक्ती पक्ष १ व अपक्ष २ असे एकूण १० विधानसभा सदस्य कोल्हापूरचे प्रतिनिधित्व करताना पहावयास मिळतात.ठाकरे सरकारच्या नवीन झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारानुसार कोल्हापूरच्या वाटयाला तीन मंत्रीपदे आलेली आहेत पैकी एक कॅबिनेट व दोन राज्यमंत्रीपदे आहेत.यामध्ये राष्ट्रवादीच्या आमदार हसन मुश्रीफ यांना कॅबिनेट तर कॉंग्रेसचे विधान परिषदेतील आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांना राज्यमंत्रीपद तर पूर्वीचे राष्ट्रवादीचे पण सध्या अपक्ष लढलेले आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या वाटयाला शिवसेनेच्या कोट्यातून राज्यमंत्रीपद आले आहे.कोल्हापूर जिल्हा परिषदेची स्थिती ही सुरवातीच्या काळात वेगळी होती आणि आता नव्याने महाराष्ट्रात अस्तित्वात आलेल्या महाआघाडीच्या माध्यमातून वेगळी पाहायला मिळते.सुरवातीच्या काळात अडीच वर्ष जिल्हा परिषद हि भाजपच्या ताब्यात होती.पहिल्या अडीच वर्षाच्या कालात भाजप माजी आमदार अमल महाडीक यांच्या पत्नी शौमिका महाडीक या जिल्हा परिषद अध्यक्षा पदावर होत्या. पण अलीकडेच महाराष्ट्रात झालेल्या सत्ता बदलाचा परिणाम म्हणून ती पुन्हा कॉंग्रेस,राष्ट्रवादी,शिवसेना आणि शेतकरी संघटना यांना मिळून महाआघाडीच्या ताब्यात गेली.सध्या कॉंग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या गटाला जिल्हा परिषद अध्यक्ष पद तर राष्ट्रवादीच्या वाटयाला उपाध्यक्ष पद आहे शिवाय शिवसेनेच्या वाटयाला तीन सभापातीपदे आली आहेत.

सध्या कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून कॉंग्रेसचे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील हे काम पाहत आहेत.तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ हे अहमदनगर चे पालकमंत्री म्हणून काम पाहत आहेत.संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाचे सत्ताकेंद्र म्हणून गोकुळ दुध संघाकडे पहीले जाते. जो गट किंवा पक्ष गोकुळच्या सत्तेत असेल त्या गटाचे/पक्ष्याचे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय सत्तेत उच्च स्थान असते.कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी जनतेला पुरक अशा दूग्ध व्यवसायाचा एक भक्कम पर्याय निर्माण व्हावा या अपेक्षेने स्थापन झालेला हा गोकुळ दुध संघ आज संपूर्ण भारत देशातील नंबर दोनचा सर्वात मोठा दुध संघ आहे.आणि सध्या हाच दुध संघ कोल्हापूर जिल्ह्याच्या सत्तेचे केंद्र स्थान आहे. कोल्हापूर जिल्हयात एकूण बारा पंचायत समिती आहेत.कोल्हापूर जिल्हयातील गोकुळ दुध संघाप्रमानेच कोल्हापूर मध्ये कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंक हि देखील कोल्हापूरच्या सत्तासमीकरणाचे केंद्रस्थान मानले जाते.

कोल्हापूर महानगरपालिका हि गेली दहा वर्षापासून कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या ताब्यात आहे.त्या अगोदर ती गटातटांच्या मदतीने अपक्षांच्या ताब्यात असायची पण अलीकडे दहा ते बारा वर्षापासून वेगळी राजकिय समीकरणे घडून आली.त्याचाच परिणाम म्हणून सध्या कोल्हापूर महानगरपालिका ही कॉंग्रेस नामदार सतेज उर्फ बंटी पाटील व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नामदार हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखालील संयुक्त आघाडी काम करत आहे.


जवळची प्रेक्षणीय स्थळेसंपादन करा

शाहू तलाव व पुरातन शिव मंदीर आणि जागृत हनुमान मंदीर (अतिग्रे) ता. हातकणंगले, जि.कोल्हापूर. श्री व्यंकटेश मंदिर, रूई,ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर

 1. रंकाळा तलाव: महालक्ष्मी मंदिराच्या पश्चिम दिशेला,रंकाळा तलाव आहे.हे सकाळी फिरण्यासाठी व करमणुकीचे लोकप्रिय ठिकाण आहे.हा तलाव राजा छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेला आहे.या तलावाच्या सभोवताली चौपाटी व बाग आहे. रंकाळ्याच्या मागील बाजूलाच शालिनी पॅलेस आहे.हे महाराष्ट्रातील तारांकित हॉटेल आहे.भूत काळातील कोल्हापूर शहर हे चित्रीकरणातील प्रसिद्द ठिकाण आहे.पुष्कळ मराठी व हिंदी चित्रपट कोल्हापुरातील चित्र गृहामध्ये प्रदर्शित झाले आहेत. रंकाळा तलावाजवळ शांतकिरणचित्र गृहामध्ये बरेचसे चित्रपट चित्रित झाले आहेत. आज,इतिहास काळातील हे दिवस आपल्याला एक सोनेरी भुतकाळ देऊन गेले आहेत.७५०-८५० नुसार काळ्या दगडांपासून बनलेल्या इतिहासातील काही घटनांची साक्ष देणारा हा तलाव आहे.महालक्ष्मी मंदिरापासून अर्धा किलोमीटर अंतरावरती असलेल्या तलावाला 'रंकाळा तलाव' असे नाव आहे. भूत काळातील सर्वात मोठे नांदी असलेले 'संध्या मठ'मंदिर बांधिले आहे.
 2. पन्हाळगड
     कोल्हापूरच्या सभोवताली पन्हाळा, विशाळगड, महिपळगड आणि कलंदिगड ह्या गडांच्या जोड्या आहेत. येथे तुम्ही तीन मोठ्या ईमारती पाहू शकता त्याला ‘अंबरखाना’ म्हणतात, हे एक धान्याचे कोठार आहे त्याची धान्य साठवुण ठेवण्याची क्षमता 50,000 पाऊंड आहे, आत्ता हे एक प्रेक्षनिय स्थळ आहे.
    पन्हाळा हे ठिकाण कोल्हापूर पासुन 20 कि.मी. अंतरावर आहे.समुद्रसपाटी पासुन 977.2 मी. ऊंचीवर असलेले, पन्हाळा हे मोहक प्रेक्षनिय स्थळ आहे जेथे आपण आपली सुट्टी घालवण्यासाठी जाऊ शकतो. पन्हाळा किल्ल्यामुळे व ईतर डोंगरामुळे करड्या किंवा पांढर्याी रंगाचा वारसा येथे जपला आहे.हा किल्ला राजा भोज यांनी 1178-1209 मध्ये बांधला आहे आणि डेक्कन किल्ल्यांमध्ये सर्वात मोठा किल्ला आहे.हा किल्ला रक्षन करणार्याठ 7 कि.मी. ऊंचीच्या भक्कम भिंतींच्या आतील भागामध्ये आहे.शिवाजी महाराजांची आठवण करूण देणारा पन्हाळा हा एक ऐतिहासीक किल्ला आहे, सिध्दी जोहारने शिवाजी महाराजांच्या पन्हाळ गडाला चार महिने वेढा दिला होता, एका पावसाळ्या रात्री ह्या वेढ्यातुन सुटुन शिवाजी महाराज विशाळगडला गेले, सिध्दी जोहारने त्यांचा पाठलाग केला तेंव्हा बाजीप्रभु देशपांडे ह्यांनी पावनखिंड येथे त्याला आढवले, त्यामुळे शिवाजी महाराज सुरक्षित विशाळगडावर पोहचु शकले, परंतु बाजीप्रभु देशपांडे येथे धारातिर्थ पडले व मरण पावले.किल्ल्या मध्ये अशाच प्रकारची आणखी एक ईमारत आहे तिला सज्जाकोटी म्हणतात, 1500 ए. डी. मध्ये ही ईमारत ईब्राहिम अदिल-शाह यांनी बांधली आहे. शिवाजी महाराज व त्यांचा पुत्र संभाजी महाराज यांना ह्या कैदेत घातले होते जे योग्य संधीचा फायदा घेऊन येथुन फरार झाले.
   येथे आजही शिवाजी महाराजांच्या अस्तित्वाची जाणीव होते. आश्चर्याची गोष्ट नाही आहे की, त्यांनी आपल्या स्वराज्याची राजधानी असलेल्या राजगड, रायगड आणि शिवनेरी जेथे त्यांनी आपल लहानपण घालवले, पन्हाळा हा असा गड आहे की, जेथे शिवाजी महाराजांनी 500 रहिवासी होते. ब्रिटीशांच्या काळात 1782 ते 1827 पर्यंत राजधानी असलेले हे एक मराठ्यांचे राज्य आहे. ह्या गडाच्या आत मध्ये संभाजी मंदीर, सोमेश्वर मंदीर, तीन दरवाजा, राज दिंडी ई. आहेत.हा किल्ला कोल्हापूर च्या ऊत्तरेला 20 कि.मी. अंतरावर आहे, हा गड सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये येतो, हा किल्ला जमीन सपाटीपासून 400 मी. ऊंचीवर येतो.युध्दकलेच्या दृष्टीने महत्त्वाचा असा पन्हाळा गड आहे, त्याच्यातील एक जो महत्त्वाची भुमिका निभावतो तो पश्चिम घाट आहे, जो मोठा व ईतिहासकालीन आहे. शिलहारा मुख्य राज्यकर्ता भोज II (1178 – 1209) यांच्या नंतर ही कारकिर्द यादवांच्याकडे सुफुर्त करण्यात आली. हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे, बिदारचे बहामनिस; महमुद गवान जे एक हुशार सेनापती होते त्यांनी छावनीपासुन दुर सैन्य ठेवुन पावसाळ्याच्या कालावधीत 1469 मध्ये ह्या गडावर हल्ला केला. पुढे जाऊन 16 व्या शतकात हा किल्ला बिजापुर ह्यांनी काबीज केला. अदिल शाहा यांनी ह्या गडाचे काही चबुतरे व दरवाजे करून घेतले.त्यानंतर 1659 मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला काबीज केला, व पुर्णपणे प्रस्थापित होईसतोपर्यंत गडाच्या दुरूस्तीचे काम थांबवले.
   1701 मध्ये औरंगजेबाने हा गड काबीज केला, आणि येथुन मग मुघल बादशाह यांच्याकडुन ईंग्रज राज्यकर्ता, सर विल्ल्यमनरिस यांच्या हाती हा गड सुफुर्त करण्यात आला. काही महिने पंत अमात्य रामचंद्र ह्यांच्या सेनांनी हा किल्ला काबीज केला, ज्यांचे स्पष्टीकरण स्वराज्य दंतपुस्तकांमध्ये आहे. 1782 मध्ये ह्याचा राज्यकारभार कोल्हापुर मुख्यालयाकडे सोपवण्यात आला. 1844 मध्ये स्थायिक राज्यकर्त्यांकडुन ब्रिटीशांनी हा किल्ला काबीज केला.गडाच्या मुख्यालया पासून 7 कि.मी. पेक्षा जास्त त्रिकोणी लांबीपर्यंत ह्या गडाची लांबी वाढवण्यात आली. ऊतरण असलेल्या मोठ्या भींती गडाच्या संरक्षणासाठी बांधण्यात आल्या, ह्या भिंतीमध्ये पाहणीकरिता काही ठिकाणी गोल रिकाम्या जागा ठेवल्या आहेत. राहिलेल्या भागामध्ये 5 – 9 मी. मोठी तटबंदी, लांबीचे मोठे गोल बुरूज बांधले. पुर्वेकडील दरवजाला चार दरवजा म्हणतात, ज्याच्या मधुन गडामध्ये येण्यास मार्ग आहे, ह्याचा नाश ब्रिटीशांनी केला.
   प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजुला टाकीसारखे हिरवे आणि पांढरे दरगे पहायला मिळतात. तीन दरवजा पर्यंत हा मार्ग पश्चिमेला सरळ 400 मी. जातो.अदिल शाही पध्दतीचे हे एक लष्कराचे कौशल्यपूर्ण ऊदाहरण आहे. प्रवेशद्वारा आतील त्रिज्या खंड गोलाकार खंड दर्शवते. नऊ खंडांच्या रिकाम्या जागांमध्ये चौकोनी खंडाच्या रेषेंची ऊपखंडे आहेत.ह्याच्या वरती गणपती व ईतर देवांच्या मुर्त्या आहेत.बाजुच्या जागेमध्ये क्लिष्टपणे कोरीव भाग एकमेकांशी दुव्याने जोडलेली मार्या ची तटावरील भिंत आहे आणि सुधारीत पाने व फांद्या असलेली नक्षी आहे. सर्वात समोरची मार्यातची तटावरील भिंत वरती दिसते. पश्चिम बाजुच्या आंगणाच्या बाहेरील बाजुला एक सुरक्षा खोली आहे जिच्यामध्ये त्रिकोणी कडा असलेले खांब आहेत. दोनभिंतीच्या मधल्या भागांमध्ये बाहेरच्या बाजुने प्रवेश द्वार आहे. इब्राहीम अदिल शहा यांची आतील त्रिकोणी जागांमध्ये इराणची कोरलेली नाणी आहेत. पश्चिमेला थोड्या अंतरावर तीन दरवजा आहे जो किल्ल्याच्या आतील भागामध्ये बांधला आहे.पन्हाळा टेकडीच्या मध्यावरती बालेकिल्ला येत नाही तोपर्यंत ऊत्तरेला जवळजवळ 1 कि.मी. पर्यंत हा मार्ग सलग्न आहे. हा किल्ला मोठमोठ्या भिंत्यांनी घेरला आहे, आत्ता जास्तीत जास्त भाग पडत आला आहे व काही पडला आहे. येथे तीन मोठ्या चौकोनी ग्यालरी आहेत,ह्यांच्या मध्ये संपुर्ण भुदलाची संरक्षण करण्याची क्षमता आहे व ते मोकळेणाने येथे ऊभा राहु शकतात. मोठ्या, काही 40m by 10m चे 16 रिकाम्या जागा आहेत ज्या छताने झाकल्या आहेत ज्याच्यामध्ये वरती 8 मी. पर्यंत चौकोनी जागा आहेत.काही पायर्यां वरून बाहेरील छतावर जाता येते.
 1. महालक्ष्मी मंदिर
 2. भवानी मंडप :छोटे वस्तुसंग्रहालय
 3. ज्योतिबा मंदिर
 4. न्यू पॅलेस : शाहू महाराजांचा राजवाडा व वस्तुसंग्रहालय
 5. टाउन हॉल : छोटे वस्तुसंग्रहालय
 6. दाजीपूर : दाजीपुर कोल्हापूरच्या वन्य जीवांची ओळख करून देणारे एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. जेंव्हा दिवसभर शहरातील प्रदूषित वातावरणात श्वास घेणे मुश्कील होते तेंव्हा या ठिकाणी येऊन आपण खुल्या वातावरणामध्ये फक्त श्वासच नाही तर येथील वन्य जीवांना जवळून पाहण्याची संधी मिळवाल.हे अभयारण्य सकाळी १०:०० ते संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत खुले असते. अभयारण्यात प्रवेश करण्यासाठी तुम्हाला प्रत्येकी ३० रुपये तिकीट आहे त्याचबरोबर आतमध्ये फिरण्यासाठी तुम्हाला जीप हवी असल्यास प्रत्येकी १०० रुपये तिकीट दर आहे.
 7. गगनबावडा :गगनबावडा हे तालुक्याचे ठिकाण आहे.गगनबावडा हे गाव कोल्हापूर जिल्ह्याच्या व रत्नागिरी जिल्ह्याच्या मध्ये येते हिरवीगार झाडी आणि एक छान धबधबा,गगनगिरी मंदिर,बावडेकर वाडा
 8. पावनखिंड आणि विशाळगड : सुप्रसिद्ध ऐैतिहासीक ठिकाणे
 9. धबधबे - राऊतवाडी, बर्की, मानोली (आंबा)
 10. भुदरगड (गारगोटी)
 11. गडहिंग्लज: सामानगड
 12. शालिनी पॅलेस
 13. शिवाजी विद्यापीठ परिसर
 14. राधानगरी धरण
रंकाळा तलाव, शालिनी महालाजवळून पाहता

साचा:विश्वकोशीय परिच्छेद हवा

मनोरंजनसंपादन करा

 • केशवराव भोसले नाट्यगृह, कोल्हापूर.

चित्रपटगृहेसंपादन करा

 • INOX* सिनेमा
 • पीव्हीआर सिनेमा
 • अयोध्या

अयोध्या चित्रपटगृहाचे पूर्वीचे नाव राजाराम.. याचे बांधकाम छत्रपती राजाराम महाराजांच्या सूचनेनुसार श्री. भोजराज दादासाहेब निंबाळकर यांनी १९३७ साली केले. त्याचे नामकरण १२ एप्रिल १९८६ साली अयोध्या असे करण्यात आले. सध्या या चित्रपटगृहाची क्षमता, बाल्कनी २५४, स्टॉल ३९४ आणि फर्स्ट १०० अशी एकूण ७४८ आहे. येथील ध्वनियंत्रणा ही अत्याधुनिक डॉल्बी तंत्रज्ञानाने युक्त अशी आहे.

 • ऊर्मिला

ऊर्मिला चित्रपटगृहाचे पूर्वीचे नाव लक्ष्मी. आणि त्याच्याच शेजारी सरस्वती हे चित्रपटगृह. कोल्हापुरातील ताराबाई रोडवर असणारी ही दोन चित्रपटगृहे. ऊर्मिला अर्थात जुन्या लक्ष्मी सिनेगृहाचे बांधकाम नाना बेरी यांनी केले. याचे पूर्वीचे मालक श्री नितीन रेड्डी. त्यांच्याकडून १९९९ साली ’अयोध्या’ चित्रपटगृहाचे मालक दादासाहेब निंबाळकर यांनी ते विकत घेतले आणि त्याचे नाव ऊर्मिला केले. ऊर्मिला आणि सरस्वती ह्या चित्रपटगृहांचा बाहेर जाण्याचा रस्ता एकच आहे.

 • सरस्वती
 • व्हीनस

६ जून १९३१ साली तय्यब अली बोहरा यांनी याचे बांधकाम केले. कोल्हापुरात बांधले गेलेले हे पहिलेच चित्रपटगृह. ह्याच तय्यब अली यांनी व्हीनसच्याच शेजारी अप्सरा हेही सिनेगृह बांधले. आजतागायत दोन्ही चित्रपटगृहांची मालकी बोहरा कुटुंबीयांकडेच आहे. व्हीनसमध्ये ७८३ प्रेक्षक आरामात चित्रपट पाहू शकतात. जिथे व्हीनस उभे आहे तिथे पूर्वी दलदलीची जागा होती. आणि आजही जेव्हा पंचगंगा नदीला जोरदार पूर येतो तेव्हा इथे जाणारा मार्ग बंद पडतो. गेले ५ वर्षे येथे केवळ दक्षिणी भारतीय भाषांतील चित्रपट प्रदर्शित केले जातात. "आर्या" हा इथे आलेला पहिला तेलुगू सिनेमा. ह्या सिनेमाने या चित्रपटगृहात सिल्व्हर ज्युबिली करण्याइतके यश मिळवले. कोल्हापुरात २५ आठवडे चाललेला हा एकमेव तेलुगू सिनेमा. कोल्हापुरात राहणार्‍या दाक्षिणात्य भारतीय लोकांना तिकडचे सिनेमे पाहण्याचे हक्काचे ठिकाण म्हणजेच व्हीनस.

 • अप्सरा

. कोल्हापुरात लक्ष्मीपुरीत शेजारी शेजारी ५ चित्रपटगृहे आहेत आणि स्टेशन रोड वर ५. त्यातीलच एक "अप्सरा".. अप्सरा आणि व्हीनस ह्या दोन्हीचे मालक एकच. श्री. तय्यब अली बोहरा. १९४८ च्या सुमारास हे चित्रपटगृह बांधले गेले. याचे पूर्वीचे नाव होते अन्वर. कारण तय्यबअलींच्या तिसर्‍या मुलाचे नाव होते अन्वर. नंतर याचे नाव झाले लिबर्टी आणि आता याचे नाव आहे अप्सरा..अप्सराची प्रेक्षकक्षमता आहे ६७३.

 • उषा

१४ जानेवारी १९४७ रोजी नगीनदास शहा यांनी हे चित्रपटगृह सुरू केले. नागीनदास यांच्या दुसर्‍या मुलीच्या नावानेच (उषा) हे चित्रपटगृह ओळखले जाते. सर्वाधिक हिट चित्रपट देणार्‍या कोल्हापुरातील काही मोजक्या चित्रपटगृहापैकी एक म्हणजे उषा. "हम आपके है कौन" इथे ६० आठवड्याहून अधिक चालला. इथे लागलेले काही सुपरहिट चित्रपट म्हणजे.. लावारीस, बर्निंग ट्रेन, शोले, लगान, सत्या, तेजाब इत्यादी. या चित्रपटगृहाची प्रेक्षकक्षमता आहे ७८६.

 • प्रभात

लक्ष्मीपुरीत असणार्‍या ५ चित्रपटगृहापैकी एक म्हणजे प्रभात. दादासाहेब रुईकर यांनी १९४० साली प्रभात बांधले. याचे प्रेक्षकक्षमता आहे ५३१. २००३ साली प्रभातचे नूतनीकरण झाले. चित्रपटगृह संपूर्णपणे वातानुकूलित करण्यात आले. पारंपरिक फर्स्ट, स्टॉल आणि बाल्कनी अशी आसनव्यवस्था बदलून फर्स्ट, स्टॉल, ड्रेस सर्कल आणि बाल्कनी अशी करण्यात आली. मराठीचे सुपरस्टार दादा कोंडके यांचे ७ सिल्वर ज्युबिली चित्रपट रुईकर यांच्या प्रभात आणि रॉयल मध्येच लागले.

 • रॉयल

दादासाहेब रुईकर यांचे आणखी एक चित्रपटगृह म्हणजे रॉयल. प्रभातच्या पाठीमागच्या बाजूला वसलेले हे चित्रपटगृह. रॉयलचा बाहेर जायचा मार्ग प्रभातमधूनच आहे. रॉयलची आसनक्षमता ५१३ आहे. याची बांधकाम १९३० चे आहे. २००५ साली या चित्रपटगृहाचे नूतनीकरण करण्यात आले.

 • शाहू

कोल्हापुरातील मराठी चित्रपटांचे माहेरघर म्हणजे शाहू. गेली कित्येक वर्षाची मराठी चित्रपट प्रदर्शित करण्याची परंपरा आजही तेवढ्याच दिमाखात सुरू आहे. १५ मे १९४७ साली या चित्रपटगृहाचे ओपनिंग झाले. शाहू महाराज व्हीनसमध्ये चित्रपट पाहायला जात असत. पण काहीतरी कारणाने खटका उडाला आणि महाराजांनी स्वतःचे एक चित्रपटगृह बांधले. आणि त्यांच्याच नावावरून याला शाहू नाव पडले.

 • पद्मा

कोल्हापूरच्या राजकुमारी पद्माराजे यांच्यावरून ह्या चित्रपटगृहाचे नाव " पद्मा" असे पडले. १९४० साली श्री. इंगळे यांनी या चित्रपटगृहाची उभारणी केली. फर्स्ट, स्टॉल, एक्झिक्युटीव आणि बाल्कनी अशी आसनव्यवस्था इथे आहे. इथे एकूण ६९६ प्रेक्षक चित्रपट पाहू शकतात. इथे सॅटेलाईट प्रोजेक्टर आहे.

 • पार्वती (मल्टिप्लेक्स) - तीन पडदे असलेले गांधीनगरातील चित्रपटगृह
 • (गणेशसह)
 • संगम

[३]

पुतळेसंपादन करा

शहरात बाबासाहेब आंबेडकर, जोतीराव फुले, शिवाजी महाराज, संभाजी, शाहू महाराज आणि अनेक नामवंत व्यक्तींचे अर्धाकृती व पूर्णाकृती पुतळे जागोजागी उभे करण्यात आले आहेत. त्यांतील काही महत्त्वाचे पुतळे :

खरेदीसंपादन करा

 
कोल्हापुरी चपला
 
कोल्हापुरी मिरची
 • कोल्हापुरी साज : कोल्हापुरी साज एक प्रकारचे महिलांनी गळ्यात घालावायचे आभूषण आहे.हा एक पारंपारिक अलंकार आहे कि ज्याची वापरण्याची सुरुवात कित्येक वर्षापासून कोल्हापुरातून झालेली आहे आणि आता तर महाराष्ट्राबाहेर अनेक राज्यांमध्येही याला खूप पसंती आहे.पारंपारिक पद्धतीने या साजामध्ये २१ गोल आकाराची पाने असतात पण कोल्हापूर मधील महिला मात्र दररोजच्या दगदगीच्या जीवनात वापरण्यासाठी १० किंवा १२ पानांचा साज बनवून घेतात.हा अलंकार खूपच सुंदर दिसतो.याचे डिज़ाईन पर्यटकांना नेहमीच आकर्षित करते म्हणून पर्यटक या डिज़ाईनमध्ये नकली नेकलेस बनवून घेतात.
 • कोल्हापुरी चपला : कोल्हापूरी चप्पल हे कोल्हापूर शहराच्या प्रमुख आकर्षणापैकी एक आहे.या चपला भारतीय व भारताबाहेरील ग्राहकांच्या पसंतीस उतरल्या आहेत.या चप्पलांची ठळक वैशिष्टे म्हणजे त्यांचा सुबक आकार,नक्षीकाम आणि त्यांचा टिकाऊपणा.चालताना येणाऱ्या करकर आवाजाने सर्वांचेलक्ष वेधून घेणारी 'कोल्हापुरी चप्पल' आता लवकरच नवा आंतरराष्ट्रीय साज लेवून बाजारपेठेत दाखल होणार आहे.महाराष्ट्र राज्य खाडी आणि ग्रामोद्योग मंडळाने त्यासाठी पुढाकार घेतला असून 'कलात्मक कोल्हापुरी' या नावाने त्याचे विपणन केले जाणार आहे.कोल्हापूर येथील स्थानिक कारागीरांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात येणार आहे.फ्रांस येथील प्रख्यात डिझायनर नेओना स्कीने कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत.कोल्हापुरी चपलेचा मुल साज आणि परंपारिकता कायम ठेऊन तिला हे नवे रूप दिले जाणार आहे.महाराष्ट्राची शान आणि रुबाबदार अशा कोल्हापुरी चपलेला आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान आणि मान मिळवून देण्याचा महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचा प्रयत्न आहे. पारंपारिक आणि मूळ सौंदर्य ही वैशिष्ट्ये जपत चपलेचा मेक ओव्हर केला जाणार आहे. खादी आणि ग्रामोद्योग मंडळाने कोल्हापूरच्या कारागिरांचा साठी खास कार्यशाळेचे आयोजन केले आहे. त्यात पॅरिसमधील डिझायनर नेओना या मार्गदर्शन करतील. कोल्हापुरीच चपलेला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मान मिळवून देण्यासाठी पहिल्यांदाच अशा प्रकारची कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी स्थानिक व्यापारी, कारागीर, तज्ञांची व बाटा कंपनी तसेच इतर कंपन्यांची मदत घेतली जाणार आहे.
 • कोल्हापुरी फेटा
 • कोल्हापुरी लवंगी मिरची
 • कोल्हापुरी गूळ
 • चपलाहार
 • लक्ष्मीहार
 • कापड मार्केट (गांधीनगर)

परिवहनसंपादन करा

ऑटोरिक्षा आणि महानगरपालिकेच्या बसेस
लोहमार्गाने मुंबई, नागपूर, तिरुपती आणि बंगळूरकडे जाणार्‍या गाड्या दररोज आहेत.

हवामानसंपादन करा

कोल्हापूरचे हवामान किनारपट्टी आणि देशावरील हवामानांचा संयोग आहे. वर्षभरातील तापमान १२°से. ते ३५°से. या दरम्यान असते.कोल्हापुरातील उन्हाळा शेजारच्या इतर शहरांच्या तुलनेत थंड पण जास्त दमट असतो. उन्हाळ्यातील कमाल तापमान सहसा ३८° से.च्या वर जात नाही. किमान तापमान २४° से. ते २६° से. पर्यंत असते. तापमान कमी असूनही आर्द्रतेमुळे हवा दमट आणि चिकट असते. कोल्हापूर पश्चिम घाटाजवळ असल्याने जून ते सप्टेंबर च्या दरम्यान भरपूर पाऊस पडतो. यामुळे शहराच्या सखल भागात काही दिवस पाणी शिरून पूर येतो. पावसाळ्यात तापमान २३° से. ते ३०° से. च्या दरम्यान असते. कोल्हापुरातील हिवाळा कडाक्याचा नसतो. किमान तापमान १४° से. ते १६° से. तर कमाल तापमान २९° से. ते ३२° से. पर्यंत असते. याकाळात दमटपणा कमी असल्याने हवामान उल्हासदायी असते.

कोल्हापूर साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
सरासरी कमाल °से (°फॅ) 31
(88)
33
(91)
36
(97)
37
(99)
33
(91)
29
(84)
27
(81)
26
(79)
28
(82)
30
(86)
29
(84)
29
(84)
30.7
(87.2)
सरासरी किमान °से (°फॅ) 15
(59)
17
(63)
20
(68)
22
(72)
22
(72)
22
(72)
22
(72)
21
(70)
21
(70)
21
(70)
17
(63)
15
(59)
19.6
(67.5)
सरासरी वर्षाव मिमी (इंच) 4.3
(0.17)
0.5
(0.02)
6.1
(0.24)
26.9
(1.06)
46.2
(1.82)
140
(5.51)
338.3
(13.32)
181.6
(7.15)
101.6
(4.00)
103.6
(4.08)
40.6
(1.60)
5.6
(0.22)
995.9
(39.21)
स्रोत: Government of Maharashtra

उद्योगसंपादन करा

१. घाटगे पाटील उद्योग समूह
२. स्टार उद्योग समूह
३. मेनन उद्योग समूह
४. पॉप्युलर शेती अवजारे

 • गोकुळ दूध संघ
 • वारणा दूध संघ
 • शाहू दुध
 • स्वाभिमानी दुध
 • मनुग्राफ इंडस्ट्रीज लिमिटेड, शिरोली एम.आय.डी.सी.
 • मेनन अ‍ॅंड मेनन,विक्रमनगर
 • मेनन पिस्टन लिमिटेड, शिरोली एम.आय.डी.सी.
 • कोल्हापूर स्टील लिमिटेड, शिरोली एम.आय.डी.सी.
 • श्रीराम फौंड्री,शिरोली एम.आय.डी.सी.
 • बुधले अ‍ॅंड बुधले लिमिटेड, कुलकर्णी पॉवर टूल्स्, शिरोळ
 • महाराष्ट्र कार ओल्ड पार्टस, www.caroldpart.com.
 • ॲटो रिलाईरिसायकलींगकंपनी,www.autorelife.com
 • सोक्टास इंडिया (वस्त्रौद्योग कंपनी) www.soktasindia.pvt.ltd
 • मॉंटी (वस्रौद्योग कंपनी)

साखर कारखानेसंपादन करा

 1. श्री राजाराम शुगर मिल्स्, कसबा बावडा, कोल्हापूर
 2. श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना, वारणानगर, कोल्हापूर
 3. श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना, शिरोळ, कोल्हापूर
 4. श्री कुंभी-कासारी सहकारी साखर कारखाना, कुडित्रे, कोल्हापूर
 5. श्री गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना हरळी,कोल्हापूर
 6. श्री छत्रपती शाहु सहकारी साखर कारखाना कागल
 7. श्री शरद सहकारी साखर कारखाना नरन्दे
 8. श्री डी.वाय.पाटील सहकारी साखर कारखाना, गगनबावडा
 9. श्री सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखाना, हमीदवाडा
 10. श्री कल्लाप्पाण्णा आवाडे सहकारी साखर कारखाना, हुपरी
 11. श्री उदयसिंह गायकवाड सहकारी साखर कारखाना, बाबवडे
 12. श्री पचगगा सहकारी साखर कारखाना,इचलकरजी
 13. श्री बिद्री सहकारी साखर कारखाना, बिद्री
 14. श्री दत्त सहकारी साखर कारखाना, आसुर्ले पोर्ले
 15. श्री गुरुदत्त सहकारी साखर कारखाना, सैनिक टाकळी
 16. श्री हिरण्यकेशी सहकारी साखर कारखाना, आजरा
 17. श्री दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना, हलकर्णी चंदगड
 18. अथणी शुगर्स लिमीटेड , तांबळे भुदरगड
 19. भोगावती सहकारी साखर कारखाना लि.शाहूनगर ता.करवीर
 20. संताजी घोरपडे साखर कारखाना ता.कागल
 21. अन्नपूर्णा साखर कारखाना ता. कागल (सदर कारखान्याची उभारणी पुर्ण होत आलेली आहे.)

प्रसिद्ध व्यक्तीसंपादन करा

 1. शाहू महाराज
 2. वीर शीवा काशीद
 3. रणजित देसाई
 4. सूर्यकांत मांडरे
 5. चंद्रकांत मांडरे
 6. कुलदीप पवार
 7. भालजी पेंढारकर
 8. व्ही. शांताराम
 9. शिरीष बांदारकर
 10. आशुतोष गोवारीकर
 11. जयंत नारळीकर
 12. संगीतकार,गायक सुधीर फडके
 13. जगदीश खेबूडकर
 14. अभिनेत्री उमा भेंडे
 15. संगीतकार राम कदम
 16. खलनायक राजशेखर
 17. अभिनेता वसंत शिंदे
 18. शिवाजी सावंत
 19. बाबा कदम
 20. डॉ. बापूजी साळुंखे
 21. सुरेश वाडकर
 22. IPS विश्वास नांगरे-पाटील
 23. दादू चौगले
 24. विनोद दादू चौगुले( हिंद केसरी )
 25. राही सरनोबत (नेमबाज)
 26. तेजस्विनी सावंत (नेमबाज)
 27. सिद्धार्थ देसाई (कब्बडी)
 28. वीरधवल खाडे (जलतरण )
 29. राजन गवस (लेखक)
 30. गणपत पाटील (अभिनेता)
 31. प्रसेन कोसंबीकर

छायाचित्रसंपादन करा

पहासंपादन करा

कोल्हापुरातील पुतळे- कावळा नाका येथील ताराराणी पुतळा, शिवाजी विद्यापीठातील शिवाजी महाराजांचा पुतळा, इत्यादी.

बाह्य दुवेसंपादन करा