आशुतोष गोवारीकर

भारतीय अभिनेता आणि निर्माता

आशुतोष गोवारीकर (१५ फेब्रुवारी, इ.स. १९६४; मुंबई, महाराष्ट्र - हयात) हा एक भारतीय अभिनेता, चित्रपट दिग्दर्शक व निर्माता आहे. त्याने मराठी आणि हिंदी चित्रपटांसाठी अभिनय, दिग्दर्शन व निर्मिती केली आहे. १९९८ सालच्या सरकारनामा ह्या मराठी चित्रपटामध्ये त्याने भूमिका केली होती. बॉलिवूडमधील दिग्दर्शनासाठी त्याला आजवर फिल्मफेअर सह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

आशुतोष गोवारीकर
जन्म १५ फेब्रुवारी, १९६४ (1964-02-15) (वय: ६०)
कोल्हापूर, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व मराठी, भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय, दिग्दर्शन, चित्रपटनिर्मिती
कारकीर्दीचा काळ इ.स. १९८४ - चालू
भाषा मराठी
हिंदी
पत्नी सुनीता गोवारीकर

चित्रपटयादी

संपादन

दिग्दर्शक

संपादन
वर्ष चित्रपट टीपा
१९९३ पहला नशा
१९९५ बाझी
२००१ लगान फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट सर्वांगीण मनोरंजक चित्रपट
२००४ स्वदेस
२००८ जोधा अकबर फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार
फिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार
२००९ व्हॉट्स यूवर राशी
२०१० खेलें हम जी जान से

बाह्य दुवे

संपादन
  • "अधिकृत संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत). 2012-02-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-02-03 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  • इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील आशुतोष गोवारीकर चे पान (इंग्लिश मजकूर)







.