विश्वास नांगरे पाटील

महाराष्ट्र पोलिसातील (भा.पो.से.) अधिकारी


विश्वास नांगरे पाटील (१ जून १९७३) हे भारतीय पोलीस सेवेतील एक अधिकारी आहेत. सध्या ते महाराष्ट्रातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी ते मुंबईचे सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) होते. त्याआधी ते नाशिक शहराचे पोलिस आयुक्त होते. [] [] [] पाटील यांनी १९९७ मध्ये प्रशिक्षण पूर्ण केले.

विश्वास नारायण नांगरे-पाटील
जन्म कोकरूड
१ जून १९७३
कोकरूड, शिराळा तालुका, सांगली जिल्हा
राष्ट्रीयत्व भारतीय
वांशिकत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
शिक्षण बी.ए.,एम ए, एम.बी.ए.एल.एल बी
प्रशिक्षणसंस्था शिवाजी विद्यापीठ, उस्मानिया विद्यापीठ
पेशा भारतीय पोलिस सेवा (भा.पो.से.)
कारकिर्दीचा काळ १९९७ पासून
प्रसिद्ध कामे २६/११
मूळ गाव कोकरूड
पदवी हुद्दा पोलिस सहआयुक्त(कायदा व सुव्यवस्था), मुंबई
धर्म हिंदू धर्म
जोडीदार रुपाली नांगरे-पाटील
अपत्ये जान्हवी, रणवीर
वडील नारायण नांगरे-पाटील
पुरस्कार राष्ट्रपती शौर्य पदक (२०१३)


२०१५ मध्ये त्यांना २००८ च्या मुंबई हल्ल्यादरम्यान दहशतवादविरोधी कारवायांमधील त्यांच्या भूमिकेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक (शौर्य) प्रदान करण्यात आले. [] [] [] []

सुरुवातीचा काळ आणि शिक्षण

संपादन

विश्वास नांगरे पाटील यांचा जन्म बत्तीस शिराळा या तालुक्यातील कोकरूड गावी झाला. त्यांचे वडील गावाचे सरपंच होते. त्यांनी आपले शालेय शिक्षण तालुक्यातील विद्यालयात पूर्ण केले आणि ते कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून इतिहास विषयात बी.ए.ची परीक्षा सुवर्ण पदक पटकावून उत्तीर्ण झाले. उस्मानिया विद्यापीठातून एम.बी.ए.ची पदवी घेऊन त्यांनी पुढे प्रशासकीय अभ्यासक्रमाला सुरुवात केली.•आपल्या शालेय जीवनात विश्वास नांगरे पाटील हे खूप हुशार होते. दहावी मध्ये असताना त्यांचा तालुक्यात पहिला क्रमांक आला होता.महाविद्यालयात असताना बारावीला चांगले गुण मिळाले असताना देखील विश्वास नांगरे पाटील यांनी प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी अभियांत्रिकीला न जाता कला शाखेला प्रवेश घेतला होता.महाविद्यालयात असताना त्यांना महाविद्यालयाचा उत्कृष्ट विद्यार्थी हा पुरस्कार देखील मिळाला आहे. [ संदर्भ हवा ]

कामगिरी

संपादन

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण

संपादन

पुणे जिल्हा ग्रामीण पोलीसदलात अधीक्षक असताना पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणी केलेल्या कारवाईमुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले.[] पुणे ग्रामीण पोलिसांनी सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावातील शेतात सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर ४ मार्च २००७ला छापा टाकून २८७ तरुण-तरुणींना(२१ तरुणीं) अटक केली होती.[] प्रयोगशाळेत झालेल्या रासायनिक पृथक्करण अहवालानुसार त्यातील २४९ जणांनी अमली पदार्थांचे सेवन केल्याचे स्पष्ट झाले होते.[]

२६/११चा दहशतवादी हल्ला

संपादन

२६/११च्या मुबंई हल्ल्याच्यावेळी ताजमहाल हॉटेलमध्ये पोहचणाऱ्या पहिल्या अधिकाऱ्यांपैकी ते एक होते.[ संदर्भ हवा ] सोबत दोन कॉन्स्टेबल आणि एक अंगरक्षक तसेच अंगावर सुरक्षाकवच(बुलेटप्रुफ जाकीट) नसतांनाही ते गोळीबार सुरू असलेल्या ताजमध्ये शिरले.[ संदर्भ हवा ] प्रतिकारासाठी त्यांनी ९ एमएम पिस्तुलातून गोळीबार केला. दहशतवाद्यांचा पाठलाग करत ते सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचले. त्यांच्या या कारवाईने दहशतवाद्यांना ताजमहाल हॉटेल नवीन इमारतीत जाण्यापासून रोखले[ संदर्भ हवा ]. त्यानंतर नांगरे-पाटील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या कंट्रोल रूममध्ये पोहोचले व सीसीटीव्हीच्या मदतीने दहशतवाद्यांच्या हालचालींची माहिती वरिष्ठांना देत राहीले. [ संदर्भ हवा ]सकाळी सात वाजता एनएसजीचे कमांडो कारवाईत प्रत्यक्षात सहभागी होईपर्यंत विश्वास नांगरे-पाटील यांची लढाई सुरू होती.[ संदर्भ हवा ]

कारकीर्द

संपादन
  • अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक(अज्ञात दिनांक - २८ नोव्हेंबर २००५)[]
  • पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक(२९ नोव्हेंबर इ.स. २००५ - ३ जून इ.स. २००८)[]
  • मुंबई पोलीसदल उपायुक्त (४ जून इ.स. २००८- ?)[]
  • ठाणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक
  • अप्पर पोलीस आयुक्त, मुंबई दक्षिण विभाग
  • नाशिक पोलीस आयुक्त
  • सद्यस्थितीत पोलीस सहआयुक्त(कायदा व सुव्यवस्था), मुंबई

पुरस्कार

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "Nangre Patil seeks details of all pending preventive action proposals". timesofindia.indiatimes.com. 16 May 2016 रोजी पाहिले.
  2. ^ "Vishwas Nangre Patil to be special IG, Aurangabad". business-standard.com. Press Trust of India. 7 May 2015. 16 May 2016 रोजी पाहिले.
  3. ^ "In a bid to improve the image of police among the public, Special Inspector General of Police Vishwas Nangre Patil". ndtv.com. 16 May 2016 रोजी पाहिले.
  4. ^ "Aurangabad range IG gets President's award for gallantry". timesofindia.indiatimes.com. 16 May 2016 रोजी पाहिले.
  5. ^ "The ugly questions that hang over Mumbai cop's 26/11 honour". firstpost.com. 31 July 2013. 16 May 2016 रोजी पाहिले.
  6. ^ "Police officers Date, Nangre-Patil injured". timesofindia.indiatimes.com. 16 May 2016 रोजी पाहिले.
  7. ^ "SENIOR COPS QUESTION GALLANTRY AWARD TO ADDL CP". mumbaimirror.com. 16 May 2016 रोजी पाहिले.
  8. ^ a b c "रेव्ह पार्टीमधील २४८ जणांनी अमली पदार्थाचे सेवन केल्याचे निष्पन्न". 2017-06-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-01-17 रोजी पाहिले.
  9. ^ a b c "सोशल पोलिसिंगमुळे गुन्ह्यांना प्रतिबंध".[permanent dead link]

बाह्य दुवे

संपादन

मन में है विश्वास लोकसत्ता खित 'मन में है विश्वास' या आत्मकथनपर ...

२२ मे, २०१६ - राजहंस प्रकाशनातर्फे पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील .