राधानगरी वन्यजीव अभयारण्य

(दाजीपूर अभयारण्य या पानावरून पुनर्निर्देशित)

राधानगरी अभयारण्य हे महाराष्ट्रातील कोल्हापुर जिल्ह्यातल्या राधानगरी तालुक्यातील अभयारण्य आहे. हे अभयारण्य पश्चिम घाटामध्ये सह्याद्री पर्वतरांगांच्या दक्षिण टोकाला आहे. राधानगरी अभयारण्य रानगव्यांसाठी प्रसिद्ध आहे. हे महाराष्ट्रातील सर्वात पहिले अभयारण्य आहे. याची स्थापना १९५८ साली करण्यात आली आणि त्यावेळी याला दाजीपूर अभयारण्य असे नाव देण्यात आले होते. या अभयारण्यात एकूण ३५ प्रकारच्या वन्यप्राण्यांची व २३५ प्रकारच्या पक्षी प्रजातींची नोंद झालेली आहे. या जंगलात १८०० प्रकारच्या वनस्पतीही आढळतात. त्यापैकी १५०० पेक्षा जास्त फ़ुलझाडांच्या प्रजाती आहेत तर ३०० औषधी वनस्पती आहेत.

राधानगरी वन्यजीव अभयारण्य
आययुसीएन वर्ग ४ (अधिवास/प्रजाती व्यवस्थापन क्षेत्र)
राधानगरी वन्यजीव अभयारण्यचे ठिकाण दाखविणारा नकाशा
राधानगरी वन्यजीव अभयारण्यचे ठिकाण दाखविणारा नकाशा
राधानगरी वन्यजीव अभयारण्य
ठिकाण कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे शहर कोल्हापूर ४६ किलोमीटर (२९ मैल) उपू
गुणक 16°23.09′0″N 73°57.32′0″E / 16.38483°N 73.95533°E / 16.38483; 73.95533
क्षेत्रफळ ३५१.१६ चौरस किमी (१३५.५८ चौ. मैल)
स्थापना १९५८
अभ्यागत १७,५५७ (२०००-२००१ साली)
नियामक मंडळ महाराष्ट्र वन विभाग


युनेस्कोने २०१२मध्ये राधानगरी अभयारण्याचा जागतिक वारसा यादीत समावेश केला आहे.

   दाजीपूर अभयारण्य काजवा महोत्सव 
       आजच्या धावत्या झगमगाटी दुनियेत काजव्यांची मनमोहक दुनिया हरवली आहे. मात्र, राधानगरीतील बायसन नेचर क्लब व राधानगरी नेचर क्लबच्या वतीने मे महिन्याच्या दुसऱ्यार पंधरवड्यात स्वतंत्रपणे काजवा महोत्सवाचे आयोजन केले आहे.त्यामुळे पर्यटकांना काजव्यांची मनमोहक दुनिया अनुभवता येणार आहे.जैवविविधतेने नटलेल्या दाजीपूर अभयारण्यात गवारेड्यांसह विविध प्रकारचे प्राणी, पक्षी, सर्प, फुलपाखरे आढळतात. या अभयारण्यात उन्हाळ्याच्या अखेरीस शेकडो प्रकारचे काजव्यांचे थवे रंगीबेरंगी प्रकाशाची उधळण करतात. गेल्यावर्षी बायसन नेचर क्लबने काजवा महोत्सव आयोजित करून काजव्यांचा मनमोहक जीवनपट उलगडला होता. बालपणी तिन्हीसांजेला हवेत उडणाऱ्या् काजव्यांमागे धावून पकडलेला काजवा खिशात चमकताना पाहण्याची मजा औरच होती. मात्र, सध्याच्या धावत्या युगातील झगमगाटात काजव्यांचा प्रकाश हरवला आहे. भावी पिढ्यांना काजवा म्हणजे काय, हे सांगावे लागणार आहे.
        दाजीपूर अभयारण्यातील जैवविविधतेत काजवा हा महत्त्वाचा कीटक आहे. मे महिन्यात वळीव पाऊस लागला की, अभयारण्यातील वृक्षराजीवर काजव्यांची मोहमयी दुनिया अवतरते. आंबा, जांभूळ,हुंबर, अंजनी, हिरडा व बेहडा अशा निवडक वृक्षांवर काजव्यांची वस्ती असते. काळ्याकुट्ट रात्री हजारो काजवे पांढरा पिवळा, निळा, तांबडा, हिरवा, नारंगी अशा नाना रंगांची उधळण करतात. जगात काजव्यांच्या दोन हजारांवर प्रजाती आहेत. काजव्यांच्या शरीरात ल्युसीफेरीन नावाचे द्रव्य असते त्याची ऑक्सिजनशी विक्रिया झाली की, काजवे प्रकाशतात. अंडी, अळी,कोश असा जीवन प्रवास करणाऱ्या् काजव्यांच्या अळीचे दोन आठवड्यात प्रौढावस्थेत रूपांतर होते. बेडूक व कोळ्यांसह अनेक पक्ष्यांचे काजवा हे खाद्य असून, मे व जून हा काजव्यांचा प्रजनन काळ असतो.काजव्यांची वाढती संख्या पावसाच्या आगमनाची वर्दी देते. मोसमी पावसाचा जोर वाढला की, काजव्यांचे जीवनचक्र संपुष्टात येते. अवघ्या काही आठवड्यांचे आयुष्य लाभलेला काजवा रंगांची मुक्तू उधळण करतो. त्याच्या प्रकाशाचा वेग 510ते 670 नॅनोमीटर असतो.दरवर्शि राधानगरीतील बायसन नेचर क्लब तर्फे दिनांक 19 ते 31 मेअखेर पर्यटकांसाठी काळम्मावाडी रोडवर मोफत काजवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. ‘’आडवाटेवरचे कोल्हापूर’’ यांतर्गत हा महोत्सव होणार असून, तज्ज्ञांची व्याख्याने, राममेवा प्रदर्शन, जंगली चित्रपट व पर्यटकांना विविध प्रकारची माहितीही दिली जाणार आहे, असे क्लबचे उपाध्यक्ष सम्राट केरकर यांनी सांगितले. तर राधानगरी नेचर क्लबतर्फे फराळे-राजापूरनजीक काजवा महोत्सव आयोजित केला जातो.


प्राणी

संपादन

या जंगलात दुर्मीळ होत चाललेले पट्टेरी वाघ, पश्चिम घाटात दुर्मीळ झालेले लहान हरीण, गेळा (पिसोरी) आढळतात. तसेच बिबळ्या, गवा, सांबर, भेकर, डुक्कर, रानकुत्रा, अस्वल, शेकरु, रानमांजर, उदमांजर, ससा, लंगूर, याचबरोबर वटवाघळाच्या तीन जाती आढळतात. गवा रेडा हे या अभयारण्यातील मुख्य आकर्षण आहे.

 पक्षी

होले,दयाल,कोतवाल,पिंगला,पोपट