राम कदम हे महाराष्ट्रातील संगीतकार होते.

राम कदम
जन्म नाव राम कदम
टोपणनाव राम कदम
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र संगीत
संगीत प्रकार चित्रपटसंगीत, स्वतंत्र रचना

संगीतकार राम कदम यांचा जन्म ऑगस्ट १९१६ रोजी झाला. राम कदम हे मुळचे जिल्हा सांगली मधील मिरज गावाचे रहिवासी होते.

वैयक्तिक जीवन संपादन

राम कदम यांची चित्रपट कारकीर्द पुण्यामध्ये असलेल्या प्रभात फिल्म्समधील एक ऑफिस बॉय म्हणून झाली होती.

राम कदम यांना दोन मुले आहेत. विजय कदम आणि उदय कदम. विजय कदम हेसुद्धा एक प्रसिद्ध संगीतकार आहेत.

कार्य संपादन

राम कदम एक लावण्या गाण्यासाठी नावाजलेले संगीतकार म्हणून प्रसिद्ध होते. तसेच त्यांनी चित्रपट माध्यमातूनही आपल्या संगीताचा ठसा उमठवला आहे. राम कदम यांनी १९४० ते १९९० या कालावधीत मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. राम कदम यांनी जवळजवळ २०० चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत, परंतु त्यांनी जास्तीत जास्त लावण्याच गायल्या आहेत.

राम कदम यांनी १९७२ मध्ये पिंजरा चित्रपटांसाठी गायलेली लावणी खूप गाजली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शक व्ही. शांताराम होते.

राम कदम यांनी गायलेली गाणी व चित्रपट : संपादन

पिंजरा : १९७२मध्ये,
गड जेजुरी जेजुरी : १९८५मध्ये,
दोन बायका फजिती ऐका :१९८२मध्ये,
केला इशारा जाता जाता :१९६५मध्ये.
कलावंतीण, बाई मी भोळी,
बिजली १९८६,
चंदनाची चोळी अंग अंग जाळी १९७५,
कसं काय पाटील बरं हाय का?,
अशीच एक रात्र होती १९७१,
फरारी १९७६.

या व यासारख्या अनेक चित्रपटांसाठी ते संगीत दिग्दर्शक होते.

'गड जेजुरी जेजुरी' या चित्रपटाचे त्यांनी स्वतः दिग्दर्शक होते.

मृत्यू संपादन

राम कदम १९ फेब्रुवारी १९९७ रोजी स्वर्गवासी झाले.

पुरस्कार संपादन

राम कदम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या वतीने राम कदम पुरस्कार दिला जातो. इ.स. २००९ मध्ये लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांना हा पुरस्कार दिला गेला. या आधी हा पुरस्कार ज्येष्ठ गीतकार जगदीश खेबुडकर यांना, प्रसिद्ध संगीतकार भास्कर चंदावरकर यांना आणि इनॉक डॅनियल यांना देण्यात आला आहे.

५१ हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

राम कदम कला गौरव पुरस्काराचे इ.स. २००६पासूनचे मानकरी

राम कदम यांच्यावरील पुस्तके संपादन

  • बुगडी माझी सांडली गं : संगीतकार राम कदम : गाणी आठवणी (प्रा. नीला विजय कदम )

संदर्भ संपादन

[[१]][मृत दुवा]

बाह्य दुवे संपादन