आश्विन

(अश्विन या पानावरून पुनर्निर्देशित)

हिंदू पंचांगाप्रमाणे आश्विन महिना भाद्रपदानंतर आणि कार्तिक महिन्याआधी येतो.

आश्विन महिन्यांत प्रजोत्पत्ती आश्विन, अंगिरस आश्विन आदी प्रकार असतात. युधिष्ठिराचा जन्म प्रजोत्पत्ती आश्विन महिन्यात शुक्ल पंचमीला, तर भीमाचा जन्म अंगिरस आश्विन महिन्यात वद्य नवमीला झाला.

आश्विन महिन्यात हिंदूंचे शारदीय नवरात्र, दसरा हे सण आणि दिवाळीतले नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन हे दिवस येतात. आश्विन शुद्ध एकादशीला पाशांकुशा एकादशी, तर कृष्ण एकादशीला रमा एकादशी ही नावे आहेत. द्वादशीला वसू बारस (गोवत्स द्वादशी) आणि त्रयोदशीला धनत्रयोदशी म्हणतात.

आश्विन पौर्णिमेला कोजागरी (पौर्णिमा) असते. या दिवशी ज्याने अजमेर शहराची स्थापना केली त्या अजमीढ राजाची जयंती असते.

आश्विन वद्य चतुर्थीला उत्तर भारतीय स्त्रियांचा करवा चौथ हा सण असतो.

भारतीय राष्ट्रीय पंचांग

संपादन

आश्विन हा भारतीय सरकारी पंचांगानुसारही वर्षातील सातवा महिना आहे. हा २३ सप्टेंबरला सुरू होतो व ३० दिवसांचा असतो.

हिंदू पंचांगानुसार बारा महिने
  आश्विन महिना  
शुद्ध पक्ष प्रतिपदा - द्वितीया - तृतीया - चतुर्थी - पंचमी - षष्ठी - सप्तमी - अष्टमी - नवमी - दशमी - एकादशी - द्वादशी - त्रयोदशी - चतुर्दशी - पौर्णिमा
कृष्ण पक्ष प्रतिपदा - द्वितीया - तृतीया - चतुर्थी - पंचमी - षष्ठी - सप्तमी - अष्टमी - नवमी - दशमी - एकादशी - द्वादशी - त्रयोदशी - चतुर्दशी - अमावास्या