आश्विन कृष्ण एकादशी ही आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अकरावी तिथी आहे.


१८७१-७२ची हिंदू दिनदर्शिका

हिंदू कालगणनेनुसार रमा एकादशी ही एक धार्मिक दृष्ट्या महत्त्वाची तिथी मानली जाते. तमिळ पंचांगानुसार हा दिवस पुरातास्सी महिन्यात येतो.

स्वरूप संपादन

कृष्णाच्या उपासनेसाठी ही तिथी महत्त्वाची मानली जाते.[१] पूजा,उपवास आणि जागरण हे या व्रताचे स्वरूप आहे. पृथ्वी आणि परलोकात सुखाची प्राप्ती हे या व्रताचे फळ सांगितले गेले आहे.[२] या व्रताने मोक्षप्राप्ती होते असे पद्म पुराण ग्रंथात सांगितले आहे.[३] या दिवशी कृष्णाची पूजा केल्यानंतर भगवद्गीता या धार्मिक ग्रंथांचे पठण करावे असा संकेत रूढ आहे.[४]

संदर्भ संपादन

  1. ^ नवभारतटाइम्स.कॉम (2019-10-24). "Rama Ekadashi 2019 Vrat katha Muhurat: दिवाली से पहले रमा एकादशी, यह महत्व, व्रत कथा और मुहूर्त". नवभारत टाइम्स (हिंदी भाषेत). 2021-10-14 रोजी पाहिले.
  2. ^ जोशी ,होडारकर, महादेवशास्त्री, पद्मजा (२०११ पुनर्मुद्रण). भारतीय संस्कृती कोश खंड सातवा. पुणे: भारतीय संस्कृतीकोश मंडळ प्रकाशन. pp. ७२३. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ "Rama Ekadashi 2020: रमा एकादशी, इस व्रत को करने से होती है मोक्ष की प्राप्ति". Amar Ujala (हिंदी भाषेत). 2021-10-14 रोजी पाहिले.
  4. ^ "Rama Ekadashi 2020 Vrat in Marathi धन-वैभवदायी रमा एकादशी : 'असे' करा व्रतपूजन; वाचा, महत्त्व व मान्यता". Maharashtra Times. 2021-10-31 रोजी पाहिले.