ललिता पंचमी

(आश्विन शुद्ध पंचमी या पानावरून पुनर्निर्देशित)

आश्विन शुद्ध पंचमी ही आश्विन महिन्याच्या शुद्ध पक्षातील पाचवी तिथी आहे.

ललिता पंचमी पूजा


ललिता पंचमी ही शारदीय नवरात्र उत्सवातील महत्त्वाचा दिवस मानली गेलेली तिथी आहे.[] आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला ललिता पंचमी म्हणले जाते.[]


व्रताचे स्वरूप

संपादन

या दिवशी नवरात्र उत्सवानिमित्त देवीच्या उपांग ललिता या रूपाची पूजा केली जाते.[] करंडा या भांडे प्रकारावरील केवळ झाकणाची प्रतीकरूप पूजा या दिवशी केली जाते. ललिता देवीला दूर्वांचा हार अर्पण केला जातो. देवीच्या नैवेद्याला खीर, लाडू,घारगे तयार करतात. भोपळ्याच्या घारग्याचे वन देण्याची पद्धतीही दिसून येते. रात्री जागरण आणि देवीच्या कथेचे श्रवण केले जाते. दुस-या दिवशी सकाळी व्रताचे उद्यापन केले जाते. हे व्रत स्त्री आणि पुरुष दोघेही करतात.[]

कुमारिका पूजन

संपादन
 
कुमारिका पूजन

ललिता हे देवीचे कुमारी स्वरूप मानले गेले असल्याने कुमारिका मुलींचे पूजन ललिता पंचमीच्या दिवशी करण्याची पद्धती आहे.काही ठिकाणी ते अष्टमी आणि नवमी तिथीला केले जाते.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ Kuradiya, Yogesh. "Lalita Panchami (ललिता पंचमी) 2021 Date Upang Lalita (उपांग ललिता) Vrat 2021". hindi.dekhnews.com (इंग्रजी भाषेत). 2021-10-05 रोजी पाहिले.
  2. ^ "ललिता पंचमी | भारतकोश". m.bharatdiscovery.org (हिंदी भाषेत). 2021-10-05 रोजी पाहिले.
  3. ^ Thamke, Abhishek (2016-11-07). Aarth Marathi Diwali Edition 2016: अर्थ मराठी दिवाळी अंक २०१६. Aarth Marathi.
  4. ^ जोशी,होडारकर, महादेवशास्त्री, पद्मजा (पुनर्मुद्रण मार्च २०१०). भारतीय संस्कृती कोश खंड पहिला. पुणे: भारतीय संस्कृति कोश मंडळ प्रकाशन. pp. ६७७. ISBN नाही Check |isbn= value: invalid character (सहाय्य). |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  5. ^ "Kumarika Pujan नवरात्रोत्सव : कुमारिका पूजन कसे करावे? जाणून घेऊया कोणत्या गोष्टी आवश्यक". Maharashtra Times. 2023-10-30 रोजी पाहिले.