इ.स. १९४३
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
(इ. स. १९४३ या पानावरून पुनर्निर्देशित)
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९२० चे - १९३० चे - १९४० चे - १९५० चे - १९६० चे |
वर्षे: | १९४० - १९४१ - १९४२ - १९४३ - १९४४ - १९४५ - १९४६ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनजानेवारी-जून
संपादन- जानेवारी २७ - दुसरे महायुद्ध - ५० अमेरिकन लढाउ विमानांनी विल्हेम्सहेवन वर बॉम्बफेक केली.
- फेब्रुवारी १ - दुसरे महायुद्ध - नाझी सैन्याने व्हिडकुन क्विस्लिंगला नॉर्वेच्या पंतप्रधानपदी बसवले.
- फेब्रुवारी २ - दुसरे महायुद्ध - स्टॅलिनग्राडच्या लढाईनंतर जर्मनीचे सैन्य सोवियेत संघाला शरण.
- फेब्रुवारी ८ - दुसरे महायुद्ध-कुर्स्कची लढाई - रशियन सैन्याने कुर्स्क शहर काबीज केले.
- फेब्रुवारी ८ - दुसरे महायुद्ध-ग्वाडालकॅनालची लढाई - अमेरिकन सैन्याचा जपानी सैन्यावर विजय.
- फेब्रुवारी १४ - दुसरे महायुद्ध - रोस्तोव, रशियाला रशियन सैन्याने जर्मन वेढ्यातुन मुक्त केले.
- फेब्रुवारी १४ - दुसरे महायुद्ध - कॅसेरिन पासची लढाई - ट्युनिसीयात फील्ड मार्शल एर्विन रोमेलच्या आफ्रिका कोरने कॅसेरिन घाटातील दोस्त राष्ट्रांच्या सैन्यावर कडाडून हल्ला चढवला.
- फेब्रुवारी २७ - बेर क्रीक, मॉन्टाना येथे एका खाणीत स्फोट. ७४ ठार.
- मार्च २ - दुसरे महायुद्ध - बिस्मार्कच्या समुद्रातील लढाई.
- मार्च ३ - दुसरे महायुद्ध - लंडनमध्ये बॉम्बविरोधी आश्रयस्थानात घुसताना झालेल्या चेंगराचेंगरीत १७३ ठार.
- मार्च ८ - दुसरे महायुद्ध-बोगनव्हिलची लढाई - जपानी सैन्याने प्रतिहल्ला सुरू केला.
- मे ११ - दुसरे महायुद्ध - अमेरिकन सैन्याने अल्युशियन द्वीपसमूहातील अट्टु येथील जपानी सैन्यावर हल्ला केला.
- जून १९ - बोमॉॅंट, टेक्सास येथे वांशिक दंगल.
जुलै-डिसेंबर
संपादन- जुलै ५ - दुसरे महायुद्ध - कुर्स्कची लढाई.
- जुलै १२ - दुसरे महायुद्ध - प्रोखोरोव्ह्काची लढाई.
- जुलै १४ - अमरिकेतील सेंट लुई शहरात जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हरचे स्मारक खुले.
- जुलै २४ - दुसरे महायुद्ध - दोस्त राष्ट्रांच्या विमानांनी जर्मनीतील हांबुर्ग शहरावर तुफान बॉम्बफेक सुरू केली.
- जुलै २५ - दुसरे महायुद्ध - इटलीत बेनितो मुसोलिनीची हकालट्टी.
- जुलै २८ - दुसरे महायुद्ध - रॉयल एर फोर्सच्या जर्मनीतील हांबुर्ग शहरावरील बॉम्बफेकीत ४२,००० नागरिक ठार.
- ऑगस्ट १७ - दुसरे महायुद्ध - जर्मनीने अमेरिकेची ६० लढाउ विमाने.
- नोव्हेंबर ३० - दुसरे महायुद्ध - अमेरिकन अध्यक्ष फ्रॅंकलिन डी. रूझवेल्ट, ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल व सोव्हिएत अध्यक्ष जोसेफ स्टालिन यांचे ऑपरेशन ओव्हरलॉर्ड बद्दल एकमत झाले. ऑपरेशन ओव्हरलॉर्ड हे जून इ.स. १९४४ मध्ये दोस्त राष्ट्रांच्या यूरोपवरील हल्ल्याच्या आराखड्याला दिलेले गुप्त नाव होते.
जन्म
संपादन- मे ९ - मॉरिस फॉस्टर, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- मे ३१ - ज्यो नेमथ, अमेरिकन 'फूटबॉल'पटू.
- जून ६ - आसिफ इकबाल, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- जुलै १२ - ब्रुस टेलर, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- जुलै २६ - मिक जॅगर, इंग्लिश संगीतकार, गायक.
- ऑगस्ट १० - शफाकत राणा, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट २८ - बोरिस तिसरा, बल्गेरियाचा राजा.
- सप्टेंबर २६ - इयान चॅपल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर २९ - लेक वालेंसा, पोलंडचा पंतप्रधान.
- डिसेंबर ४ - फ्रान्सिस दिब्रिटो, कॅथॉलिक ख्रिस्ती फादर, मराठी लेखक.
- डिसेंबर ५ - डॉ.लक्ष्मण देशपांडे, मराठी लेखक, दिग्दर्शक व कलाकार.
मृत्यू
संपादन- मार्च ३ - जॉर्ज थॉम्पसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- एप्रिल १८ - इसोरोकु यामामोटो, जपानचा दर्यासारंग.
- जुलै ३१ - हेडली व्हेरिटी, इंग्लिश क्रिकेट खेळाडू (युद्धबंदी असताना).