नोव्हेंबर २२
दिनांक
(२२ नोव्हेंबर या पानावरून पुनर्निर्देशित)
नोव्हेंबर २२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३२६ वा किंवा लीप वर्षात ३२७ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी संपादन करा
पाचवे शतक संपादन करा
- ४९८ - पोप अनास्तासियस दुसऱ्याच्या मृत्यूनंतर रोमच्या लॅटेरन महालात सिमाकसची तर सांता मारिया मॅजियोर येथे लॉरेन्शियसची पोपपदी निवड झाली.
नववे शतक संपादन करा
- ८४५ - ब्रिटनीच्या राजा नॉमिनोने फ्रॅंकिश राजा टकल्या चार्ल्सचा पराभव केला.
अठरावे शतक संपादन करा
- १७१८ - रॉबर्ट मेयनार्डने समुद्री चाचा एडवर्ड टीच तथा ब्लॅकबीयर्डच्या जहाजावर हल्ला करून त्याला यमसदनी धाडले.
एकोणिसावे शतक संपादन करा
- १८३० - चार्ल्स ग्रे युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानपदी.
- १८५८ - डेन्व्हर, कॉलोराडो शहराची स्थापना.
विसावे शतक संपादन करा
- १९२२ - हॉवर्ड कार्टर आणि लॉर्ड कॅर्नार्व्होननी तुतनखामनची कबर उघडली.
- १९३५ - चायना क्लिपर हे विमान अलामेडा, कॅलिफोर्नियाहून आपल्या पहिल्या सफरीवर निघाले. मनिलाला पोचायला त्याला एक आठवडा लागला.
- १९४२ - दुसरे महायुद्ध-स्टालिनग्राडची लढाई - जनरल फ्रीडरिश पॉलसने अॅडॉल्फ हिटलरला जर्मन सैन्य पूर्णपणे वेढले गेल्याने मदत पाठवण्यासाठी तार पाठवली.
- १९४३ - दुसरे महायुद्ध-कैरो बैठक.
- १९४३ - लेबेनॉनला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
- १९६३ - डॅलस, टेक्सास येथे अमेरिकेच्या जॉन एफ. केनेडीची हत्या. लिंडन बी. जॉन्सन राष्ट्राध्यक्षपदी.
- १९७५ - फ्रांसिस्को फ्रॅंकोच्या मृत्यूनंतर हुआन कार्लोस स्पेनच्या राजेपदी.
- १९७७ - ब्रिटीश एरवेझने लंडन ते न्यू यॉर्क कॉंकोर्ड या स्वनातीत विमानाची सेवा सुरू केली.
- १९८८ - पामडेल, कॅलिफोर्निया येथे सगळ्यात पहिल्या बी-२ स्पिरिट या स्टेल्थ[मराठी शब्द सुचवा] विमानाचे अनावरण.
- १९८९ - वेस्ट बैरुत येथे लेबेनॉनच्या राष्ट्राध्यक्ष रेने मोआवादची बॉम्बस्फोटात हत्या.
- १९९८ - आल्बेनियाने नवीन संविधान अंगिकारले.
- २००२ - नायजेरियामध्ये मिस वर्ल्ड स्पर्धेवरील हल्ल्यात १०० ठार.
- २००५ - एंजेला मर्केल जर्मनीची सर्वप्रथम स्त्री चान्सेलर झाली.
जन्म संपादन करा
- १६४३ - रॉबर्ट कॅव्हेलिये दिला साल, फ्रेंच शोधक.
- १७१० - विल्हेल्म फ्रीडमन बाख, जर्मन संगीतकार.
- १७२२ - ह्रिहोरी स्कोवोरोदा, युक्रेनियन कवी.
- १८०८ - थॉमस कूक, ब्रिटिश प्रवासयोजक.
- १८१९ - जॉर्ज इलियट, इंग्लिश लेखक.
- १८६८ - जॉर्ज नान्स गार्नर, अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष.
- १८६९ - आंद्रे गिदे, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच लेखक.
- १८७७ - एंद्रे ऍडी, हंगेरियन कवी.
- १८९० - चार्ल्स दि गॉल, फ्रेंच राष्ट्राध्यक्ष.
- १८९८ - वायली पोस्ट, अमेरिकन वैमानिक.
- १८९९ - होगी कारमायकेल, अमेरिकन संगीतकार.
- १९०१ - होआकिन रोद्रिगो, स्पॅनिश संगीतकार.
- १९०४ - लुई युजिन फेलिक्स नेइल, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ.
- १९१३ - बेंजामिन ब्रिटन, ब्रिटिश संगीतकार.
- १९१४ - पीटर टाउनसेंड, ब्रिटिश वैमानिक.
- १९२१ - रॉडनी डेंजरफील्ड, अमेरिकन अभिनेता.
- १९३९ - मुलायमसिंह यादव, उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री.
- १९४३ - बिली जीन किंग, अमेरिकन टेनिस खेळाडू.
- १९६७ - बोरिस बेकर, जर्मन टेनिस खेळाडू.
- १९७० - मार्व्हन अटापट्टू, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९२१ - स्कार्लेट योहान्सन, अमेरिकन अभिनेत्री.
- १९८८ - सुरेश गुप्तारा व ज्योती गुप्तारा, जुळे इंग्लिश लेखक.
मृत्यू संपादन करा
प्रतिवार्षिक पालन संपादन करा
नोव्हेंबर २० - नोव्हेंबर २१ - नोव्हेंबर २२ - नोव्हेंबर २३ - नोव्हेंबर २४ - नोव्हेंबर महिना
बाह्य दुवे संपादन करा
- बीबीसी न्यूजवर नोव्हेंबर २२ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)