स्टालिनग्राडची लढाई

स्टालिनग्राडचा वेढा
दुसरे महायुद्ध ह्या युद्धाचा भाग
दिनांक जुलै १७, इ.स. १९४२फेब्रुवारी २, इ.स. १९४३
स्थान सेंट पीटर्सबर्ग, सोव्हिएत संघ
परिणती सोव्हिएत संघाचा विजय
युद्धमान पक्ष
जर्मनी ध्वज जर्मनी Flag of the Soviet Union सोव्हियेत संघ
सेनापती
अ‍ॅडॉल्फ हिटलर
विल्हेम ब्राउन
जोसेफ स्टालिन
सैन्यबळ
२,७०,००० सैन्य १,८७,००० सैन्य
बळी आणि नुकसान
८,४१,००० ११,२९६१९

स्टालिनग्राडचा वेढा किंवा स्टालिनग्राडची लढाई या नावांनी ओळखली जाणारी लढाई नाझी जर्मनी व अक्षराष्ट्रांच्या आघाडीची सैन्ये आणि सोव्हिएत संघाचे सैन्य यांच्या दरम्यान स्टालिनग्राड (आधुनिक वोल्गोग्राद) या व्यूहात्मक महत्त्वाच्या शहरावरील नियंत्रणासाठी झडलेली दुसऱ्या महायुद्धातील लढाई होती. १७ जुलै, इ.स. १९४२ ते २ फेब्रुवारी, इ.स. १९४३ या कालखंडात ही लढाई चालली होती. या लढाईच्या अंती नाझी जर्मनीला स्टालिनग्राडावरील पकड गमवावी लागली. या लढाईतील अपयशामुळे नाझी जर्मनीच्या पूर्व आघाडीवरील यशस्वी घोडदौडीला खीळ बसून त्यांची सामरिक पीछेहाट झाली. त्या दृष्टीने ही लढाई दुसऱ्या महायुद्धातील कलाटणीच्या प्रसंगांपैकी एक मानली जाते.