बिली जीन मॉफिट-किंग अमेरिकेची अव्वल टेनिस खेळाडू होती. बिली किंग ३९ ग्रँड स्लॅम स्पर्धांतील विजेती खेळाडू आहे. यातील १२ विजेतिपदे महिला एकेरीतील, १६ विजेतिपदे महिला दुहेरीत व ११ विजेतिपदे मिश्र दुहेरीतील आहेत. टेनिस खेळाबरोबरच बिली किंगने स्त्री-पुरुष समानतेसाठी, तसे महिलांच्या सामाजिक न्यायासाठीही लढली. वयाच्या २९ व्या वर्षी १९७३ मध्ये बॅटल ऑफ सेक्सेस या प्रदर्शनीय सामन्यात तिने बॉब रिग्स या ५५ वर्षीय खेळाडूला पराभूत केले. महिला टेनिस संघटना व वुमेन स्पोर्टस फाउंडेशनची ती संस्थापक आहे.

साचा:बिली जीन किंग
देश अमेरिका
वास्तव्य लाँग बीच, कॅलिफोर्निया, अमेरिका
जन्म २२ नोव्हेंबर १९४३
लाँग बीच, कॅलिफोर्निया, अमेरिका
उंची १.६४ मीटर (५ फूट ४.५ इंच)
सुरुवात १९५३
निवृत्ती <१९९०>
शैली उजव्या हाताची- एका हाताने बॅक हँड
बक्षिस मिळकत १९,६६,४८७ अमेरिकी डॉलर
एकेरी
प्रदर्शन 695–155
दुहेरी
प्रदर्शन 87–37
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.