जुलै १४
दिनांक
(१४ जुलै या पानावरून पुनर्निर्देशित)
जुलै १४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १९५ वा किंवा लीप वर्षात १९६ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा
तेरावे शतकसंपादन करा
- १२२३ - लुई आठवा फ्रांसच्या राजेपदी.
अठरावे शतकसंपादन करा
- १७८९ - पॅरिसमध्ये नागरिकांनी फ्रेंच राज्यसत्तेचे व दडपशाहीचे चिह्न असलेल्या बॅस्टिल तुरुंगावर हल्ला केला व आतील सात बंद्यांची मुक्तता केली. ही घटना म्हणजे फ्रेंच क्रांतीची मुहुर्तमेढ होती.
- १७८९ - अलेक्झांडर मॅकेन्झी मॅकेन्झी नदीच्या मुखाशी पोचला.
- १७९१ - फ्रेंच क्रांतीपासून पळून इंग्लंडमध्ये आश्रय घेतलेल्या फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ जोसेफ प्रिस्टलीची बर्मिंगहॅम शहरातून हकालपट्टी.
विसावे शतकसंपादन करा
- १९२५ - जर्मनीत नाझी पक्षाव्यतिरिक्त सगळ्या राजकीय पक्षांवर बंदी.
- १९४३ - अमरिकेतील सेंट लुई शहरात जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हरचे स्मारक खुले.
- १९५८ - इराकमध्ये राजेशाहीविरुद्ध उठाव. अब्दुल करीम कासम सत्तेवर.
- १९६६ - अमरिकेतील शिकागो शहरात रिचर्ड स्पेकने आठ परिचारिका-विद्यार्थिनींची हत्या केली.
- १९६६ - ग्वाटेमाला सिटीतील मनोरुग्णालयात आग. २२५ ठार.
- १९८४ - डेव्हिड लॅंग न्यू झीलंडच्या पंतप्रधानपदी.
एकविसावे शतकसंपादन करा
- २००० - फिजीतील उठावाचा सूत्रधार जॉर्ज स्पेटला अटक व देशद्रोहाचा आरोप.
- २०१६ - फ्रांसच्या नीस शहरात दहशतवाद्याने लोकांच्या जमावात मोठा ट्रक घालून ८०पेक्षा अधिक लोकांना ठार केले.
जन्मसंपादन करा
- १८५६ - गोपाळ गणेश आगरकर, समाजसुधारक.
- १८६२ - गुस्टाफ क्लिम्ट, ऑस्ट्रियन चित्रकार.
- १८७४ - अब्बास दुसरा, इजिप्तचा राजा.
- १८८५ - सिसावांग वॉॅंग, लाओसचा राजा.
- १९१० - विल्यम हॅना, अमेरिकन चित्रकार, टॉम ॲंड जेरी चित्रकथेसाठी चित्रे काढली.
- १९१३ - जेरी फोर्ड, अमेरिकेचा ३८वा राष्ट्राध्यक्ष.
- १९२० - शंकरराव चव्हाण, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीयमंत्री.
- १९६७ - हशन तिलकरत्ने, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९७६ - जरैंट जोन्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
मृत्यूसंपादन करा
- १२२३ - फिलिप दुसरा, फ्रांसचा राजा.
- १२७४ - संत बोनाव्हेंचर.
- १८८१ - बिली द किड, अमेरिकन दरोडेखोर.
- १८८७ - आल्फ्रेड क्रुप, जर्मन उद्योगपती.
- १९०४ - पॉल क्रुगर, दक्षिण आफ्रिकेचा क्रांतीकारी.
- २००२ - होआकिन बॅलाग्वेर, डॉमिनिकन प्रजासत्ताकचा राष्ट्राध्यक्ष.
- २००८ - यशवंत विष्णू चंद्रचूड, भारताचे माजी सरन्यायाधीश.
प्रतिवार्षिक पालनसंपादन करा
बाह्य दुवेसंपादन करा
- बीबीसी न्यूजवर जुलै १४ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जुलै १२ - जुलै १३ - जुलै १४ - जुलै १५ - जुलै १६ - (जुलै महिना)