Disambig-dark.svg

मॅकेन्झी नदी कॅनडातील सर्वाधिक आणि उत्तर अमेरिकेतील दुसऱ्या क्रमांकाची लांब नदी आहे. कॅनडातील नॉर्थवेस्ट टेरिटोरीज या प्रांतातून वाहणारी या नदीचे पाणलोट क्षेत्र अंदाजे इंडोनेशियाच्या आकाराचे असून हीची लांबी १,७३८ किमी (१,०८० मैल) आहे. ही नदी कॅनडाच्या पश्चिम भागातून अतिशय खडतर प्रदेशातून उत्तरेकडे वाहत आर्क्टिक समुद्रास मिळते.