आर्क्टिक महासागर

महासागर
(आर्क्टिक समुद्र या पानावरून पुनर्निर्देशित)

उत्तरध्रुवी महासागर पृथ्वीच्या उत्तर धृवाभोवतीचा महासागर आहे. ह्याच्या भोवताली रशिया, अलास्का, कॅनडा, ग्रीनलॅंड, आइसलॅंड, नॉर्वे, स्वीडनफिनलंड हे देश/प्रदेश आहेत. अतिथंड वातावरणामुळे आर्क्टिक महासागराचा बराचसा भाग कायमस्वरूपी बर्फाच्या रूपात आहे. उरलेल्या भागात वर्षाचे काही महिने पाणी असते. याचे क्षेत्रफळ सुमारे १,४२,४४,९३६ चौ. किमी इतके आहे. येत्या काही वर्षात आर्क्‍टिक महासागरावरील सर्व बर्फ वितळण्याची शक्‍यता आहे. आधुनिक शोधाप्रमाणे जगातील खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे साठे या पाण्याखालील भूभागात आहेत. बर्फ वितळत चालल्याने तेल आणि नैसर्गिक वायू यांचे मोठ्या प्रमाणावरचे व्यावसायिक उत्खनन येथे आता शक्य होते आहे. तसेच् उन्हाळ्यातील काही महिने महासागरामधून सागरी वाहतूक शक्‍य झाली आहे.

पृथ्वीवरील आर्क्टिक महासागराचे स्थान

विवाद

संपादन

स्वीडन, आइसलॅंड, फिनलंड आणि इतर अशा आठ देशांनी मिळून १९९६ मध्ये एक मंडळ स्थापन केले आणि या सर्व भागावर आपली सत्ता जाहीर केली आहे. परंतु कोणाची सत्ता कोठे याबाबत मात्र विवाद आहेत. या मंडळाचे दुय्यम सदस्यत्वासाठी इतर देश अर्ज करू शकतात. या मार्फत भारतही निरिक्षक म्हणून सामील झाला आहे. निरीक्षक देशांना खनिज तेल उत्खनन आणि आर्क्‍टिक महासागरातील समुद्रमार्गावर सवलती मिळू शकतात. यामुळे हे सदस्यत्व महत्त्वाचे आहे. भारताशिवाय चीन, सिंगापूर, इटली, जपान आणि दक्षिण कोरिया हे देशही निरीक्षक म्हणून या मंडळात सामील झाले आहेत.

समुद्र

संपादन