इ.स. १९६६
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
(इ. स. १९६६ या पानावरून पुनर्निर्देशित)
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९४० चे - १९५० चे - १९६० चे - १९७० चे - १९८० चे |
वर्षे: | १९६३ - १९६४ - १९६५ - १९६६ - १९६७ - १९६८ - १९६९ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनजानेवारी-जून
संपादन- जानेवारी ३ - १९६५ च्या युद्धात भारतीय विजयानंतर भारतीय पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री व पाकिस्तानी अध्यक्ष अयुब खान यांच्यात ताश्केंतमध्ये युद्धविरामाचा ठराव.
- जानेवारी ११ - भारतीय पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा ताश्केंतमध्ये ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू.
- जानेवारी १७ - स्पेनमध्ये पालोमारेस गावाजवळ अमेरिकेच्या बी.५२ बॉम्बर व के.सी.१३५ जातीच्या विमानात टक्कर. बी.५२ मधून तीन ७० कि.टन क्षमतेचे हायड्रोजन बॉम्ब जमिनीवर पडले व एक समुद्रात.
- जानेवारी १९ - अनेक राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या पाठिंब्याने इंदिरा गांधींची भारताच्या पंतप्रधानपदी निवड.
- जानेवारी २४ - भारताच्या पंतप्रधानपदी इंदिरा गांधींचा शपथविधी.
- फेब्रुवारी ३ - सोवियेत संघाचे लुना ९ हे मानवविरहीत अंतराळयान चंद्रावर उतरले.
- फेब्रुवारी १४ - ऑस्ट्रेलियन डॉलरचे दशमान पद्धतीत रूपांतर.
- फेब्रुवारी २३ - सिरीयात लश्करी उठाव.
- मार्च ३ - ब्रिटिश ओव्हरसीझ एरवेझचे बोईंग ७०७ जातीचे विमान जपानच्या माउंट फुजीवर कोसळले. १२४ ठार.
- एप्रिल २१ - इथियोपियाच्या हेल सिलासीचे जमैकात आगमन. रासतफारी पंथातील एक महत्त्वाची घटना.
- मे १६ - चीनी कम्युनिस्ट पक्षाने सांस्कृतिक क्रांतीला सुरुवात केली.
- जून ६ - श्यामवर्णीय नागरिकांच्या नागरी हक्कांसाठी मिसिसिपीत पदयात्रा करणाऱ्या जेम्स मेरेडिथची हत्या.
- जून १९ - बाळ ठाकरेनी शिवसेनेची स्थापना केली.
जुलै-डिसेंबर
संपादन- जुलै ६ - मलावी प्रजासत्ताक झाले.
- जुलै १४ - अमरिकेतील शिकागो शहरात रिचर्ड स्पेकने आठ परिचारिका-विद्यार्थिनींची हत्या केली.
- जुलै १४ - ग्वाटेमाला सिटीतील मनोरुग्णालयात आग. २२५ ठार.
- जुलै १८ - अमेरिकेच्या जेमिनी १० या अंतराळयानाचे प्रक्षेपण.
- ऑगस्ट १ - अमेरिकेच्या ऑस्टिन, टेक्सास शहरातील युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास, ऑस्टिनच्या मुख्य इमारतीतून चार्ल्स व्हिटमनने १५ लोकांना गोळ्या घालून ठार मारले. पोलिसांनी व्हिटमनलाही ठार केले.
- नोव्हेंबर ३० - बार्बाडोसला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- नोव्हेंबर ३० - दक्षिण यमनच्या प्रजासत्ताकला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
जन्म
संपादन- मार्च ११ - पॅव्हेल पॅट्रोव्हिक मुखोर्टोव्ह, रशियन अंतराळवीर.
- मे १२ - स्टीवन बाल्डविन, अमेरिकन अभिनेता.
- मे २३ - ग्रेम हिक, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- मे ३१ - रोशन महानामा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- जून ३० - माईक टायसन, अमेरिकन मुष्टियोद्धा.
- ऑगस्ट ७ - जिमी वेल्स, विकिपिडीयाचा स्थापक.
- सप्टेंबर १४ - आमिर सोहेल, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
संपादन- जानेवारी ११ - लाल बहादूर शास्त्री, भारतीय पंतप्रधान.
- एप्रिल १३ - अब्दुल सलाम आरिफ, इराकचा राष्ट्राध्यक्ष.
- फेब्रुवारी ९ - दामूअण्णा जोशी, बालमोहन नाटक मंडळीचे संस्थापक.
- फेब्रुवारी २० - चेस्टर निमित्झ, अमेरिकन दर्यासारंग(ॲडमिरल).
- फेब्रुवारी २६ - विनायक दामोदर सावरकर
- मे २२ - टॉम गॉडार्ड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- डिसेंबर १५ - वॉल्ट डिस्ने, हरहुन्नरी अमेरिकन चित्रपट निर्माता, दिग्दर्शक.