आर्थिक सहयोग व विकास संघटना

(आर्थिक सहयोग व विकास संस्था या पानावरून पुनर्निर्देशित)

आर्थिक सहयोग व विकास संघटना (इंग्लिश: Organisation for Economic Co-operation and Development, ओईसीडी) ही जगातील ३7 देशांचा सहभाग असलेली एक आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकारी संघटना आहे. ओईसीडीची स्थापना १९४८ साली पॅरिस येथे झाली.दुसऱ्या महायुद्धानंतर १९४८ मध्ये युरोपमधीमधील अशक्त राष्ट्रांना उभारण्यासाठी ऑरगनायझेशन फॉर युरोपियन इकॉनॉमिक को-ऑपरेशन नावाची संघटना उभारण्यात आली होती ,१० सप्टेंबर १९६१ला तिचे नाव ऑरगनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन ऍण्ड डेव्हलपमेंट असे करण्यात आले. सदस्य राष्ट्रात शाश्वत आर्थिक विकास करणे ,लोंकाच्या आर्थिक राहणीमानात सुधारणा करणे ,आर्थिक स्थैर्य निर्माण करणे ,जागतिक व्यापारात आर्थिक वाढ करणे या संघटनेचे उद्दिष्ट आहे .१६ मे २०१७ला ओईसीडीच्या मंत्री परिषदेने भारत,चीन ब्राझील,इंडोनेशिया, व दक्षिण आफ्रिकेबरोबर सहकार करण्यासाठी व्यापारी तसेच आर्थिक करार करण्याचा निर्णय घेतला आहे . 

आर्थिक सहयोग व विकास संघटना
Organisation for Economic Co-operation and Development
  संस्थापक देश (१९६१)
  इतर सदस्य देश
स्थापना १६ एप्रिल १९४८ (युरोपियन आर्थिक सहकारी)
३० एप्रिल १९६१ (ओईसीडी)
प्रकार आर्थिक सहयोग
मुख्यालय पॅरिस, फ्रान्स
सदस्यत्व
३7 देश
संकेतस्थळ http://www.oecd.org/

सदस्य देश

संपादन

ओईसीडीमध्ये सध्या 37 सदस्य देश आहेत.

संस्थापक देश (१९४८):

नंतर प्रवेश मिळालेले देश:

आ.स.वि.सं.च्या सुधारणांनंतर प्रविष्ट सदस्य देश (इ.स. १९६१)

ओईसीडीमध्ये नंतर प्रवेश मिळालेले देश:

आमंत्रित देश[]:

संदर्भ

संपादन
  1. ^ "Accession: Estonia, Israel and Slovenia invited to join OECD". 2010-05-10 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन