जुलै २८
दिनांक
(२८ जुलै या पानावरून पुनर्निर्देशित)
जुलै २८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २०९ वा किंवा लीप वर्षात २१० वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनपंधरावे शतक
संपादनसोळावे शतक
संपादन- १५४० - दरबारी राजकारणात इंग्लंडचा राजा हेन्री आठव्याने थॉमस क्रॉमवेलला मृत्युदंड दिला.
अठरावे शतक
संपादन- १७९४ - फ्रेंच क्रांती - मॅक्सिमिलियें रॉबिस्पियरेला गिलोटिनवर मृत्युदंड.
एकोणिसावे शतक
संपादन- १८२१ - पेरूने स्वतःला स्पेनपासून स्वतंत्र जाहीर केले.
विसावे शतक
संपादन- १९१४ - पहिले महायुद्ध - ऑस्ट्रिया-हंगेरीने सर्बियाविरुद्ध युद्ध पुकारले.
- १९३० - रिचर्ड बेडफोर्ड बेनेट कॅनडाच्या पंतप्रधानपदी.
- १९४२ - दुसरे महायुद्ध - सोवियेत संघाच्या अध्यक्ष जोसेफ स्टालिनने हुकुम काढला ज्यानुसार कोणत्याही परिस्थितीत लढाईतून माघार घेणाऱ्या सोवियेत सैनिकांना तत्काळ मृत्यूची शिक्षा लागू झाली.
- १९४३ - दुसरे महायुद्ध - रॉयल एर फोर्सच्या जर्मनीतील हांबुर्ग शहरावरील बॉम्बफेकीत ४२,००० नागरिक ठार.
- १९४५ - होजे बुस्टामांटे इ रिव्हेरो पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- १९४५ - अमेरिकेचे बी.२५ प्रकारचे विमान न्यू यॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डींगच्या ७९व्या मजल्यावर आदळले. १४ ठार.
- १९५० - मनुएल ओड्रिया पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- १९५६ - मनुएल प्राडो उगार्तेशे पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- १९६३ - फर्नान्डो बेलॉॅंडे टेरी पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- १९७६ - चीनच्या तांग्शान प्रांतात रिश्टर मापनपद्धतीनुसार ७.८ ते ८.२ च्या दरम्यान तीव्रता असलेला भूकंप. २,४२,७६९ ठार, १,६४,८५१ जखमी.
- १९८० - फर्नान्डो बेलॉॅंडे टेरी परत पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- १९८५ - ऍलन गार्शिया पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- १९९० - आल्बेर्तो फुजिमोरी पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- १९९५ - आल्बेर्तो फुजिमोरी दुसऱ्यांदा पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
एकविसावे शतक
संपादन- २००० - आल्बेर्तो फुजिमोरी तिसऱ्यांदा पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- २००१ - अलेहांद्रो टोलेडो पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- २०१७ - पनामा पेपर्सद्वारे उजेडात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने १० वर्षे निवडलेले पद घेण्यापासून बंदी घातल्यावर तेथील पंतप्रधान मियॉं नवाझ शरीफने राजीनामा दिला.
जन्म
संपादन- १८९१ - रॉन ऑक्सनहॅम, ओस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९०७ - अर्ल टपर, टपरवेरचा इंग्लिश शोधक.
- १९२९ - जॅकलीन केनेडी-ओनासिस, जॉन एफ. केनेडीची पत्नी.
- १९३१ - जॉनी मार्टिन, ओस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९३६ - सर गारफील्ड सोबर्स, वेस्ट इंडियन क्रिकेट खेळाडू.
- १९३८ - आल्बेर्तो फुजिमोरी, पेरूचा राष्ट्राध्यक्ष.
- १९४५ - जिम डेव्हिस, अमेरिकन व्यंगचित्रकार.
- १९५४ - ह्युगो चावेझ, व्हेनेझुएलाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९७० - पॉल स्ट्रॅंग, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
संपादन- ४५० - थियोडॉसियस, पवित्र रोमन सम्राट.
- १०५७ - पोप व्हिक्टर दुसरा.
- १७९४ - मॅक्सिमिलियें रॉबिस्पियरे, फ्रेंच क्रांतीकारी.
- १८४९ - चार्ल्स आल्बर्ट, सार्डिनियाचा राजा.
- १९३४ - लुइस टॅंक्रेड, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९६८ - ऑट्टो हान, जर्मन रसायनशास्त्रज्ञ.
प्रतिवार्षिक पालन
संपादन- स्वातंत्र्य दिन - पेरू
बाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर जुलै २८ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जुलै २६ - जुलै २७ - जुलै २८ - जुलै २९ - जुलै ३० (जुलै महिना)