ऑक्टोबर २७
दिनांक
(२७ ऑक्टोबर या पानावरून पुनर्निर्देशित)
<< | ऑक्टोबर २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
ऑक्टोबर २७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३०० वा किंवा लीप वर्षात ३०१ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनसतरावे शतक
संपादन- १६८२ - फिलाडेल्फिया, पेनसिल्व्हेनिया शहराची स्थापना.
एकोणिसावे शतक
संपादन- १८१० - अमेरिकेने पश्चिम फ्लोरिडा बळकावले.
- १८३८ - मिसूरीच्या गव्हर्नर लिलबर्न बॉग्सने मॉर्मोन पंथील लोकांना राज्य सोडून जाण्यास फर्मावले. तसे न केल्यास त्यांचे शिरकाण करण्याची धमकी दिली.
विसावे शतक
संपादन- १९२२ - ऱ्होडेशियाच्या जनतेने दक्षिण आफ्रिकेत सामील होण्याचे आवाहन धुडकावले.
- १९२४ - उझबेक एस.एस.आर.ची स्थापना.
- १९५८ - पाकिस्तानमध्ये जनरल अयुब खानने लश्करी उठाव करून राष्ट्राध्यक्ष इस्कंदर मिर्झाला पदच्युत केले.
- १९७१ - कॉंगोच्या लोकतांत्रिक प्रजासत्ताकने आपले नाव बदलून झैर केले.
- १९७३ - कॉलोराडोच्या फ्रिमॉंट काउंटीत १.४ कि.ग्रा. वजनाची उल्का जमिनीपर्यंत पोचली.
- १९८६ - युनायटेड किंग्डमने आर्थिक बाजारपेठांवरील सगळे निर्बंध काढून घेतले.
- १९९१ - तुर्कमेनिस्तानला रशियापासून स्वातंत्र्य.
- १९९९ - हल्लेखोरांनी आर्मेनियाच्या संसदेत गोळ्या चालवून पंतप्रधान वाझगेन सर्गस्यान, संसदाध्यक्ष कारेन डेमिर्च्यान आणि सहा इतर सदस्यांची हत्या केली.
एकविसावे शतक
संपादन- २००४ - ८६ वर्षांनी बॉस्टन रेड सॉक्सनी वर्ल्ड सिरीझ जिंकली व कर्स ऑफ द बॅम्बिनो ही दंतकथा खोटी ठरवली.
जन्म
संपादन- १७२८ - जेम्स कूक, ब्रिटिश दर्यासारंग व शोधक.
- १८११ - आयझॅक सिंगर, अमेरिकन संशोधक.
- १८४४ - क्लाउस पॉॅंटस आर्नोल्डसन, नोबेल पारितोषिक विजेता स्वीडिश लेखक.
- १८५८ - थियोडोर रूझवेल्ट, अमेरिकेचा २६वा राष्ट्राध्यक्ष.
- १८७३ - एमिली पोस्ट, अमेरिकन लेखिका.
- १८७७ - जॉर्ज थॉम्पसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९१४ - डिलन थॉमस, आयरिश कवी.
- १९२० - के.आर. नारायणन, भारतीय राष्ट्रपती.
- १९२३ - अरविंद मफतलाल, भारतीय उद्योजक.
- १९२५ - वॉरेन क्रिस्टोफर, अमेरिकन परराष्ट्रसचिव.
- १९३१ - नवल अल-सादवी, इजिप्तचा लेखक.
- १९३९ - जॉन क्लीसी, इंग्लिश अभिनेता.
- १९४० - जॉन गॉटी, अमेरिकन माफिया.
- १९४५ - लुइस इनासियो लुला दा सिल्वा, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.
- १९६४ - मार्क टेलर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९७७ - कुमार संघकारा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९८४ - इरफान पठाण, भारताचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
संपादन- ९३९ - एथेलस्टॅन, इंग्लंडचा राजा.
- १४३९ - आल्बर्ट दुसरा, पवित्र रोमन सम्राट.
- १५०५ - इव्हान तिसरा, रशियाचा झार.
- १६०५ - अकबर, मोगल सम्राट.
- १९८० - जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
प्रतिवार्षिक पालन
संपादन- स्वातंत्र्य दिन - तुर्कमेनिस्तान.
- स्वातंत्र्य दिन - सेंट विन्सेंट आणि ग्रेनेडीन्स.
बाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर ऑक्टोबर २७ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
ऑक्टोबर २५ - ऑक्टोबर २६ - ऑक्टोबर २७ - ऑक्टोबर २८ - ऑक्टोबर २९ - ऑक्टोबर महिना