वाझ्गेन सर्ग्स्यान
(वाझगेन सर्गस्यान या पानावरून पुनर्निर्देशित)
वाझ्गेन सर्गस्यान (आर्मेनियन: Վազգեն Սարգսյան; ५ मार्च १९५९, अरारात, आर्मेनियन सोसाग, सोव्हिएत संघ - २७ ऑक्टोबर १९९९, येरेव्हान, आर्मेनिया) हा एक आर्मेनियन लष्करी अधिकारी, देशाचा पहिला संरक्षणमंत्री व १९९९ साली अल्प काळाकरिता आर्मेनियाचा पंतप्रधान होता.
१९८८ ते १९९४ दरम्यान चाललेल्या नागोर्नो-काराबाख युद्धामध्ये सर्गस्यानने मोठी भूमिका निभावली होती. युद्ध संपल्यानंतर त्याने आर्मेनियन लष्कराची सुत्रे हाती घेतली व तो देशातील एक सामर्थ्यशाली नेता बनला. ऑक्टोबर १९९९ मध्ये पंतप्रधानपदावर असताना त्याची काही माथेफिरूंनी गोळ्या घालून हत्या केली.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत