सप्टेंबर २१
दिनांक
(२१ सप्टेंबर या पानावरून पुनर्निर्देशित)
सप्टेंबर २१ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २६४ वा किंवा लीप वर्षात २६५ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनअठरावे शतक
संपादनएकोणिसावे शतक
संपादन- १८२७ - जोसेफ स्मिथ जुनियरच्या म्हणण्यानुसार मोरोनी या दैवी शक्तीने त्याला सोन्याच्या पत्र्यावर लिहीलेली मॉर्मोनपंथाची कथा दिली.
- १८९६ - होरेशियो किचनरने सुदानमधील डोंगोला शहर जिंकले.
विसावे शतक
संपादन- १९२१ - जर्मनीतील ऑप्पाउ शहरातील खत कारखान्यात स्फोट, ५-६०० ठार.
- १९३४ - सुपर टायफून मुरोतोने जपानच्या ओसाका शहरात धुमाकूळ घातला. ३,०६० ठार.
- १९३८ - १९३८ चे हरिकेन न्यू योर्क शहरात आले. ५००-७०० ठार.
- १९३९ - रोमेनियाच्या पंतप्रधान आर्मांड कॅलिनेस्कुची हत्या.
- १९४२ - ज्यूंचे शिरकाण - युक्रेनच्या दुनैव्त्सि शहरात नाझींनी २,५८८ ज्यूंची हत्या केली.
- १९६४ - माल्टाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- १९६५ - सिंगापूरला संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश.
- १९७२ - फिलिपाईन्समध्ये लश्करी कायदा लागू.
- १९८१ - बेलिझला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- १९८१ - सांड्रा डे ओ'कॉनॉरची अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नेमणूक.
- १९९१ - आर्मेनियाला सोवियेत संघापासून स्वातंत्र्य.
- १९९५ - भारतात अनेक व्यक्तिंनी दावा केला की गणपतीच्या मूर्तीसमोर दूध ठेवले असता त्याने ते दूध प्यायले.
- १९९९ - तैवानमध्ये भूकंप. २,४०० ठार.
एकविसावे शतक
संपादन- २००१ - तुलू, फ्रांसमधील रसायन कारखान्यात स्फोट. २९ ठार.
- २००३ - गॅलेलियो या अंतराळयानाने मुद्दामहून गुरूच्या वातावरणात प्रवेश केला. अत्यंत दाबामुळे यान नाश पावले.
- २०१३ - केन्याच्या नैरोबी शहरात मुस्लिम दहशतवाद्यांनी वेस्टगेट मॉलवर हल्ला करून ७२ पेक्षा अधिक लोकांना ठार केले. सुमारे १७५ जखमी.
जन्म
संपादन- १३२८ - हाँग्वू, चीनी सम्राट.
- १४१५ - फ्रेडरिक तिसरा, पवित्र रोमन सम्राट.
- १४२८ - जिंग्टाइ, चीनी सम्राट.
- १७५६ - जॉन मॅकऍडम, स्कॉटिश रस्ता-तंत्रज्ञ.
- १८४० - मुराद पाचवा, ऑट्टोमन सम्राट.
- १८४२ - दुसरा अब्दुल हमीद, ओस्मानी सम्राट.
- १८६६ - एच.जी. वेल्स, अमेरिकन लेखक.
- १९०२ - लियरी कॉन्सन्टाईन, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९३२ - पंडित जितेंद्र अभिषेकी, भारतीय-मराठी गायक, मराठी संगीतकार.
- १९४७ - स्टीवन किंग, अमेरिकन लेखक.
- १९५० - बिल मरे, अमेरिकन अभिनेता.
- १९५१ - अस्लान माश्काडोव्ह, चेचेन क्रांतीकारी.
- १९५९ - रिचर्ड एलिसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९६३ - कर्टली ऍम्ब्रोस, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९७१ - जॉन क्रॉली, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९७१ - ऍडम हकल, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
- १९७९ - क्रिस गेल, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९८० - करीना कपूर, भारतीय अभिनेत्री.
मृत्यू
संपादन- इ.स.पू. १९ - व्हर्जिल, रोमन कवि.
- १३२७ - एडवर्ड तिसरा, इंग्लंडचा राजा.
- १५५८ - चार्ल्स पाचवा, पवित्र रोमन सम्राट.
- १७४३ - सवाई जयसिंह, जयपूर संस्थानाचा राजा.
- १९३९ - आर्मांड कॅलिनेस्कु, रोमेनियाचा पंतप्रधान.
- १९५७ - हाकोन सातवा, नॉर्वेचा राजा.
- १९९८ - फ्लोरेंस ग्रिफिथ जॉयनर, अमेरिकन धावपटू.
- १९९९ - पुरुषोत्तम दारव्हेकर, मराठी नाटककार, मराठी नाट्यदिग्दर्शक.
प्रतिवार्षिक पालन
संपादनबाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर सप्टेंबर २१ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
सप्टेंबर १९ - सप्टेंबर २० - सप्टेंबर २१ - सप्टेंबर २२ - सप्टेंबर २३ - सप्टेंबर महिना