एडवर्ड तिसरा, इंग्लंड

एडवर्ड तिसरा (नोव्हेंबर १३, इ.स. १३१२ - जून २१, इ.स. १३७७) हा इंग्लंडचा राजा होता.

एडवर्ड तिसरा, इंग्लंड

जानेवारी २५, इ.स. १३२७ला एडवर्ड दुसऱ्याला त्याची बायको फ्रांसची इसाबेला व तिचा प्रेमी रॉजर मॉर्टीमर यांनी पदच्युत केले व एडवर्ड तिसऱ्याला वयाच्या १४व्या वर्षी राजा केले. त्याने जवळजवळ ५० वर्षे राज्य केले.

पुढील वर्षी त्याचे लग्न हैनॉच्या फिलिपाशी झाले. त्यांना एकूण १३ अपत्ये झाली.

इ.स. १३३०मध्ये १८ वर्षांच्या एडवर्डने मॉर्टिमरला कैद केले व मृत्युदंडाची शिक्षा दिली. आपल्या आईला त्याने कैदेत टाकले परंतु मारले नाही.

इ.स. १३३०मध्ये त्याने स्कॉटलंडवर चढाई केली व आपल्या पित्त्याला (एडवर्ड बॅलियोल) राजा केले. यानंतर त्याने फ्रांसशी युद्ध करून वर्चस्व स्थापण्याचे बव्हंशी यशस्वी प्रयत्न केले.

इ.स. १३७७मध्ये एडवर्ड ६५व्या वर्षी मृत्यु पावला.