नैरोबी
नैरोबी (Nairobi) ही पूर्व आफ्रिकेच्या केनिया देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. नैरोबी हे नाव मासाई भाषेतील एंकारे न्यिरोबी (गार पाण्याचे ठिकाण) या शब्दांवरुन आले आहे.नैरोबीला उन्हातील हिरवे शहरही म्हणतात.[१] नैरोबी शहर केनियाच्या दक्षिण भागात नैरोबी नदीच्या काठावर वसले आहे. २००९ साली येथील लोकसंख्या सुमारे ३३.७५ लाख होती. सध्या नैरोबी हे आफ्रिका खंडामधील १४व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
नैरोबी Nairobi |
|||
केनियामधील शहर | |||
| |||
देश | ![]() |
||
काउंटी | नैरोबी काउंटी | ||
स्थापना वर्ष | इ.स. १८९९ | ||
क्षेत्रफळ | ६९६ चौ. किमी (२६९ चौ. मैल) | ||
समुद्रसपाटीपासुन उंची | ५,४५० फूट (१,६६० मी) | ||
लोकसंख्या (२००९) | |||
- शहर | ३३,७५,००० | ||
प्रमाणवेळ | यूटीसी+०३:०० | ||
http://www.nairobicity.go.ke/ |
नैरोबीची स्थापना ब्रिटिशांनी इ.स. १८९९ मध्ये मोम्बासा ते युगांडा दरम्यानच्या रेल्वे मार्गावरील एक वखार म्हणून केली होती. नैरोबी शहर झपाट्याने वाढले व इ.स. १९०७ साली ब्रिटिश पूर्व आफ्रिका संस्थानाचे राजधानीचे शहर बनले. इ.स. १९५३ साली केनियाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नैरोबी केनियाची राजधानी बनली.
आफ्रिकेमधील राजकीय व आर्थिक दृष्ट्या सर्वात महत्त्वाच्या शहरांपैकी एक असलेल्या नैरोबीमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या चार प्रमुख कार्यालयांपैकी एक कार्यालय स्थित आहे (इतर तीन कार्यालये न्यू यॉर्क शहर, जिनिव्हा व व्हियेना येथे आहेत). तसेच संयुक्त राष्ट्रे पर्यावरण कार्यक्रमाचे मुख्यालय देखील नैरोबीमध्येच आहे.
केनिया एअरवेजचा मुख्य वाहतूकतळ असलेला जोमो केन्याटा आंतरराष्ट्रीय विमानतळ येथेच स्थित आहे.
संदर्भसंपादन करा
- ^ Pulse Africa. "Not to be Missed: Nairobi 'Green City in the Sun'". 2007-06-14 रोजी पाहिले.
बाह्य दुवेसंपादन करा
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- विकिव्हॉयेज वरील नैरोबी पर्यटन गाईड (इंग्रजी)