सिड मायर्स सिव्हलिजेशन ५ (इंग्लिश: Sid Meier's Civilization V; सिड मायर्सचे सभ्यता ५) (थोडक्यात सिव्हलिजेशन ५सिव ५) हा एक २०१० साली प्रकाशित केलेला संगणक खेळ आहे. ह्याचे विकसन फिरॅक्सिस गेम्स ह्यांने केलेले असून प्रकाशन टूके गेम्स ह्यांने केले. सप्टेंबर २०११ला मायक्रोसॉफ्ट विंडोजवर व नोव्हेंबर २३, २०१०ला मॅक ओ.एस एक्सवर हा खेळ प्रकाशित करण्यात आला. सिड माइअर्स सिव्हलिजेशन या प्रसिद्ध खेळ मालिकेतील ही अगदी अलीकडची आवृत्ती आहे.

सिव्हलिजेशन ५ मध्ये खेळाडू एका ऐतिहासिक सभ्यतेला नियंत्रित करून व तिला भविष्यात नेऊन जिंकण्याचा प्रयत्न करतात. जिंकण्याचे विविध मार्ग खेळाडूंसमोर उपलब्ध असतात व ते मिळवण्यासाठी खेळाडू संशोधन, आंतरराष्ट्रीय नीती, विस्तार, आर्थिक विकास, शासनसंस्था व लष्करी विजयावर नियंत्रण जमवतात. हा खेळ एका अतिशय नवीन खेळ इंजिनवर बसवला आहे व मालिकेच्या आधल्या खेळांमधील चौकोनी फरश्यांऐवजी षटकोनी फरश्या वापरल्या आहेत. सिव्हलिजेशन ४ मधल्या अनेक गोष्टी बदलल्या किंवा पूर्णपणे काढून टाकल्या आहेत. उदाहरणार्थ धर्महेरगिरी. लढाई प्रणालीचे पूर्णपणे नूतनीकरण करण्यात आले आहे, त्यामुळे आता लष्करी सामग्रीची रास लावता येत नाही व शहरे आता स्वसंरक्षणासाठी शत्रूवर थेट हल्ला करू शकतात. तसेच, नकाशांवर आता संगणक-नियंत्रित नगरराज्य दिसून येतात, व त्यांच्याशी खेळाडू व्यापार, मुत्सद्देगिरी किंव्हा युद्ध करू शकतात. या स्वरूपात कोणत्याही संस्कृतीच्या सीमा एका वेळी एकाच फरशीने वाढतात. रस्ते राखण्यासाठी निर्वाह खर्च भरायला लागतो, त्यामुळे रस्त्यांची संख्या आता कमी झाले आहेत.

खेळात लोकसमूह, मॉडिंगबहुखेळाडू हे वैशिष्ट्य समाविष्ट आहेत.

खेळणे

संपादन

सिव्हलिजेशन ५ एक चाल-आधारित डावपेचाचा खेळ आहे, अर्थात एके वेळीस एक खेळाडू आपली चाल खेळून पुढची चाल दुसऱ्या खेळाडूंना सोपतो. दर खेळाडू एका सभ्यतेच्या नेत्याला दर्शित करतात व त्या सभ्यतेच्या विकासाला हजारो वर्षांच्या कालावधीमध्ये मार्गदर्शक करतात. खेळाच्या सुरुवात होते एका छोट्या वस्तीच्या स्थापनेने व शेवट होते कोणत्याही विजय अटीला पार पाढून. आपली चाल सुरू असताना खेळाडू लष्करी व असैनिक व्यक्तींच्या गटांना दर्शित करणारे विविध घटक नियंत्रित करतात. ह्यांकढून खेळाडूंचे जगाचे समन्वेषण करणे, नवीन शहरं बसवणे, दुसऱ्या सभ्यतेंशी युद्ध किंव्हा मुत्सद्देगिरी करणे, नवीन इमारती व घटक निर्माण करणे व जमीन सुधारणे शक्य असते. याशिवाय खेळाडू विज्ञान, संस्कृति, अन्नपुरवठा व अर्थव्यवस्थेत विकास नियंत्रित करू शकतात. जिंकण्याच्या अटी महणजे: आपल्या लष्करी बळाने जग जिंकणे, मुत्सद्देगिरीने दुसऱ्या सभ्यतेंकढून स्वतःला सर्वोच्च नेता नेमवणे, सामाजिक नीत्या धारण करून "युटोपिया प्रकल्प" उभारणे किंव्हा एक अवकाशयान बांधून एका जवळच्या ग्रहावर वसाहत बसवून अवकाश शर्यत जिंकणे.

संगणक-नियंत्रित राज्ये

संपादन

सिव्हलिजेशन ५ मधील कृत्रिम बुद्धि चार स्तरांवर क्रिया करण्यास बनवली आहे: रणनीती स्तरावर ते वेगवेगळ्या घटकांना नियंत्रित करते, क्रियात्मक स्तरावर ते संपूर्ण युद्धाच्या सीमेचे सर्वेक्षण करते, व्यूहरचना स्तरावर संपूर्ण साम्राज्य सांभाळते व भन्नाट व्यूहरचना स्तरावर दीर्घकालीन ध्येय व खेळ जिंकण्याचा डावपेच सांभाळते.

कृत्रिम बुद्धीने नियंत्रित केलेल्या प्रत्येक नेत्याचे एक विशेष व्यक्तिमत्त्व असते. काही नेते जास्त युद्धखोर असतात, तर काही अर्थव्यवस्थेचा किंव्हा विज्ञानाचा विकास करण्याची प्रवृत्ती ठेवतात.

मालिकेतील आधल्या खेळांप्रमाणे सिव्हलिजेशन ५ मध्येसुद्धा शहरे ही खेळाचा आधारस्तंभ असतात. एका वसाहतकार घटकाकढून शहरे निर्माण केली जातात. जसजशी ह्या शहरांची लोकसंख्या वाढत जाते तसतसे त्यांमध्ये घटक व इमारती निर्माण केल्या जातात. शहरे विज्ञान उत्पन्न करतात, व त्यामुळे खेळाडू नवीन तंत्रशास्त्रांचा शोध लावू शकतात. तसेच शहरे, ज्याचा खेळात विविध प्रकाराने उपयोग केला जाऊ शकतो असे सोने निर्माण करतात. यांचबरोबर शहरे संस्कृती स्थापित करतात. अशाने त्या शहराच्या सीमा वाढतात व खेळाडू सामाजिक बांधिलकी मिळवतात.

सिव्हलिजेशन ५ मध्ये एक खास बदल म्हणजे की शहरे स्वतःच्या संरक्षणासाठी घटकांवर अवलंबून राहत नाहीत. ते आता स्वतःचे रक्षण करू शकतात व आपल्यापासून दोन फरशा बाहेर पर्यंत शत्रूच्या घटकांवर हल्ला करू शकतात. शहरांवरील हल्ल्यांच्या मोजणीसाठी गुण ठेवलेले आहेत. ते मार खाल्ल्याने कमी होत जातात व मार न खाल्ल्याने पुनर्जनित होतात. जर का एका शहराने सर्व गुण गमावले, तर ते शहर हल्ला करणाऱ्या फौजेला सोपवले जाते. त्यापुढे ती जिंकणारी फौज शहर ताब्यात घेऊ शकते व त्यावर एक नामधारी अधिकारी नेमू शकते, किंवा ते शहर पूर्णपणे उध्वस्त करू शकते. मार अंक वाढवण्यासाठी खेळाडू एखाद्या घटकाला गरज असेल त्या शहरात शिबंदी बसवू शकतो किंव्हा त्या शहरात तटबंदी, किल्ला व युद्धसामग्रीसाठी गोदामे अशा संरक्षणासाठी आवश्यक असलेल्या इमारती बांधू शकतो.

घटक व लढाई

संपादन

सिव्हलिजेशन ५ मध्ये एक उठून दिसणारा बदल म्हणजे की खेळात चौकोनी टाइलांबदली षटकोनी टाइल वापरले गेलेले आहेत. त्याबरोबर दर टाइलवर एका वेळीस फक्त एकच लष्करी व असैनिक घटक व्यापू शकतात, ज्यामुळे सेना एका जागी कोंबून ठेवता येत नाही. या स्वरूपात घटकांचे संचलन जास्त सोपे केरण्यात आले आहे. घटक अता स्वतःहून जलावरून प्रवास करू शकतात, दूरवरून हल्ला करू शकतात व त्यांना जास्त हालचाल अंक सोपवले गेले आहेत. दूरवरून वार करणारे व जवळून वार करणाऱ्या घटकांमध्ये संतुलन ठेवले आहेत. जवळून वार करणारे घटकांवर दूरूं हल्ला झाला, तर ते त्यात प्रतिक्रिया देऊ शकत नाहीत, पण जर एका दुरून वार करणाऱ्या घटकावर जवळून वार झाला, तर तो घटक उध्वस्त होऊन जाईल.

मागच्या स्वरूपांपेक्षा या खेळात घटक निर्माण व्हायला जास्त वेळ घेतात व ते ह्यामुळे जास्त कीमती असतात. जसे ते शत्रुच्या घटकांना हरवतात, तसे ते पदोन्नती कमवतात. खेळाडू या पदोन्नतीचा वापर करून त्यांना कोणत्याही एका प्रकाराना जास्त मजबूत बनवू शकतात, किंव्हा पदोन्नती सोडून देऊन ते त्या घटकाचे पूर्णपणे पुनर्योजन करू शकतात.

"महान व्यक्ती" नावाचे विशेष घटक आपोआप शहरांमध्ये निर्माण होत जातात. ह्या महान व्यक्ती घटकांची नावं इतीहासातील खऱ्या व्यक्तींवरून ठेवली जातात, जसे की अल्बर्ट आइनस्टाइन किंव्हा लिओनार्दो दा विंची. महान व्यक्ती घटक विविध प्रकारांचे असतात व दर प्रकाराकडे एक विशेष क्षमता असते. महान व्यक्तींचा वापर करून खेळाडू आपल्या सभ्यतेसाठी सुवर्ण युग सुरू करू शकतात किंव्हा त्या घटकाला खपवून एक विशेष जमीन सुधारणा उभारू शकतात. शत्रूच्या महान व्यक्तीचे अपहरण करण्याने तो घटक नष्ट होऊन जातो.

संशोधन

संपादन

मागच्या स्वरूपांप्रमाणे या खेळात शोधलेल्या तंत्रज्ञानांचा दुसऱ्या सभ्यतेंशी व्यापार करता येत नाही. त्या बदली दोन सभ्यत अता एकत्र सोने गुंतवून एका संशोधन कराराला राजी होऊ शकतात, जो पार पडल्याने एक तंत्रज्ञाना दोन्ही नेत्यांना मिळवले जाईल. एका तंत्रज्ञानाचा शोध लावल्यावर त्या तंत्रज्ञानाचे फळ शोधणाऱ्या सभ्यतेला मिळतात. उधारणार्थ, "कृषिविद्येचा" शोध लावल्याने खेळाडू शेती बांधवू शकतात. एक तंत्रज्ञान शोधण्याने तंत्रज्ञान वृक्षाच्या पुढची कडी संशोधन करण्यास उपलब्ध होते. उधारणार्थ, "विद्युत शक्तिचा" शोध लावल्याने खेळाडू "प्रशीतन", "दूरलेखी" व "रेडिओ"वर संशोधन करू शकतात.

नगरराज्य

संपादन

"नगरराज्य" हे वैशिष्ट्य सिविलिजेशनच्या या स्वरूपात पहिल्यांदा दिसून येतात. नगरराज्य हे विशेष सभ्यता असतात जे फक्त संगणक-नियंत्रित असू शकतात व बाकीच्या सभ्यतेंमुकाबले ते खेळ जिंकण्यास खेळत नसतात. त्यांच्या ताब्यात नेहमी फक्त एकच शहर असते व ते फार मोठ्या संख्येत सैन्य निर्माण करत नाहीत. खेळाडू या नगरराज्यांशी मैत्री किंव्हा युद्ध करू शकतात. मैत्री करण्याने खेळाडूंना त्या नगरराज्यकढून देणगीच्या रूपात संसाधन मिळू शकतात व ते नगरराज्य युद्धाच्यावेळी खेळाडूंचे साथ देईल. मैत्री करण्यासाठी खेळाडू त्यांना सोन्याचे बक्षीस देऊ शकतात किंव्हा त्यांनी मागितलेले कार्य पार पडवू शकतात.

सामाजिक नीत्या

संपादन

सिव्हलिजेशन ४ मधल्या नागरिकशास्र प्रणालीची जागा घेते सिव्हलिजेशन ५ची नवीन सामाजिक नीत्यांची प्रणाली. ह्या प्रणालीने जसे सभ्यता संस्कृती अंक कमवतात, तसेच ते अंक एका सामाजिक नीतीवर खर्च करू शकतात. सामाजिक नित्या दहा वेगळ्या फांद्यांमध्ये वाटलेले असतात, व ह्या फांद्या विविध तत्त्वज्ञानांना दर्शित करतात, जसे की "हुकूमशाही", "बुद्धिवाद" व "धर्मनिष्ठा". सामाजिक निती स्वीकृत करण्याने त्या सभ्यतेला खास लाभ होतो. उधारणार्थ "लोकशाही" स्वीकृत करण्याने महान व्यक्ती निर्माण होण्याता दर पन्नास टक्क्याने वाढतो, व "समाजवाद" स्वीकृत करण्याने इमारती परिरक्षण खर्च दहा टक्क्यांने कमी होतो.

जिंकण्याच्या अटी

संपादन

खेळाडूंसमोर जिंकण्यास विविध मार्ग उपलब्ध असतात, व जिंकण्यासाठी खास अटी मिळवायला लागतात. अवकाश विजय मिळवण्यासाठी खेळाडूला संशोधन करून बाकी सर्व प्रतिस्पर्धींच्या आधी एक अवकाशयान उभारायला लागतो. राजनैतिक विजय मिळवायला खेळाडूला संयुक्त राष्ट्रांमध्ये दुसऱ्या सभ्यतेचा व नगरराज्यांचा पाठिंबा मिळवायला लागतो. सांस्कृतिक विजय मिळवण्यास खेळाडूला सामाजिक नीत्यांच्या पाच फांद्या पूर्ण करून "युटोपिया प्रकल्प" उभारायला लागतो. लष्करी विजय मिळवण्यासाठी खेळाडू खेळात असा एकमात्र सदस्य असायला हवा ज्याची राजधानी अजून ही त्याच्याच ताब्यात आहे (अर्थात दुसऱ्या सभ्यतेंच्या राजधान्या उध्वस्त किंव्हा खेळाडूच्या ताब्यात असायला हव्या). शेवटी, काळ विजय मिळवण्यासाठी खेळाडूची सभ्यता २०५० साला पर्यंत टिकून राहीली पाहीजे व त्या वेळी बाकी सर्व सभ्यतेंपेक्षा जास्त गुणसंख्या धरणारी असली पाहीजे.

सभ्यता व नेते

संपादन

सिव्हलिजेशन ५च्या प्रमाणित किरकोळ आवृत्तीत १८ सभ्यता आहेत व दर सभ्यतेला जोडलेला कमाल एक नेता आहे. खेळ सुरू करण्याआधी खेळाडू यांमधील एक नेता निवडतो, व त्या सभ्यतेचे विशेष लाभ मिळवतो. दुसऱ्या नेत्यांशी खेळाडू राजनैतिक पडद्यावर संवाद साधतो. मालिकेतिल पहिल्यांदा राजनैतिक पडद्यावर नेते आपल्या देशभाषेत संवाद साधतात. उधारणार्थ, नेपोलियन आपली देशभाषा फ्रंच बोलतात व मोक्तेजुमा आपली देशभाषा नाहुआत्ल बोलतात.

सिव्हलिजेशन ५ मधील सभ्यतेंची सूची
सभ्यता नेता राजधानी विशेष घटक १ विशेष घटक २ विशेष इमारत विशेष क्षमता
अरेबिया हारून अर्रशिद मक्का उंटस्वार तिरंदाज बाजार व्यापार काफिला
अस्तेक मोक्तेजुमा टेनोचटिट्लान जॅग्वार तरंगणारे बाग बळीचे कैदी
अमेरिका वॉशिंग्टन वॉशिंग्टन मिनिटमन बी-१७ मॅनिफेस्ट डेस्टिनी
इंग्लंड एलिझाबेथ लंडन लाँग्बोव्मन शिप ऑफ द लाइन सूर्य कधीही मावळत नाही
इजिप्त दुसरा रॅमसीज थेब्स युद्ध रथ समाधी स्थान स्मारक बांधकामगार
इरक्वॉइ हिआवाथा ओनोन्डागा मोहॉक योद्धा लांबघर महान युद्ध मार्ग
इराण दारयवहुश पर्सेपोलिस अमर्त्य सात्रापचे दरबार हखामनी वारसा
ओस्मानी सुलैमान इस्तंबूल येनिचेरी सिपाही बार्बारी कॉर्सेर
ग्रीस अलेक्झांडर अथेन्स होप्लिते साथीदार घोडदळ ग्रीकांश राज्यसंघ
चीन ऊ चेथिएन बीजिंग चु क नू कागद निर्माता युद्धाची कला
जर्मनी बिस्मार्क बर्लिन लांड्सकनेश्ट पँजर फुरोर तिउतोनिकुस
जपान ओदा नोबुनागा क्योतो सामुराइ जीरो बुशिदो
रशिया कॅथेरिन मॉस्को कॉझाक क्रेपोस्त सायबेरियाचे धनदौलत
रोम ऑगस्टस रोम लीजन बलिस्ता रोमचा गौरव
सयाम रामखामहॅङ सुखोठाय नरेस्वानचा हत्ती वत पिता मुलांवर राज्य करतो
सोङाय आस्किया गाओ मान्देकालू घोडदळ चिखल कोणस्तूप मशीद नदी दलनायक
फ्रांस नेपोलियन पॅरिस बरकंदाज परकीय लीजन आंसिएं रेजीम
भारत गांधी दिल्ली युद्ध हत्ती मुघल गड लोकसंख्या वाढ