ऑगस्टस

रोमन साम्राज्याचा पहिला सम्राट

ऑगस्टस (पूर्ण नाव - गेइअस ज्युलिअस सीझर ओक्टेवियन डिवी फिलीअस ऑगस्टस) (लॅटिन : Imperator Caesar Divi F. Augustus)
(जन्म - २३ सप्टेंबर, इ.स.पू. ६३, रोम मृत्यू - १९ ऑगस्ट, इ.स. १४, नोला) ऑगस्टस हा रोमन साम्राज्याचा पहिला सम्राट होता.

ऑगस्टस
रोमन साम्राज्याचा पहिला सम्राट
ऑगस्टसचा पुतळा
अधिकारकाळ १६ जानेवारी, इ.स.पू. २७ ते १९ ऑगस्ट, इ.स. १४
पूर्ण नाव गेइअस ज्युलियस सीझर ओक्टॅव्हिअन्स डिवी फिलिअस ऑगस्टस
जन्म २३ सप्टेंबर, इ.स.पू. ६३
रोम
मृत्यू १९ ऑगस्ट, इ.स. १४
नोला
पूर्वाधिकारी कुणी नाही.
उत्तराधिकारी टायबीअरिअस
वडील गेइअस ऑक्टॅविअस
आई अतिआ बाल्बा कॅसोनिआ

पार्श्वभूमी

संपादन

ऑक्टेवियन याने जुलियस सीझरच्या सगळ्या मुलांची हत्या केली होती याशिवाय त्याने मार्क ॲंटोनी यालाही हरवले होते. मार्क ॲंटोनीने पराभव झाल्यानंतर आत्महत्या केली. या सगळ्या घडामोडीनंतर रोमन सीनेटने ऑक्टेवियन याला ऑगस्टस असे नाव दिले व तो ऑगस्टस सीझर या नावाने सत्तारूढ झाला.

कामगिरी

संपादन

ऑगस्टस सत्तेवर आला त्यावेळी अंतर्गत गृहयुद्धामुळे रोमन साम्राज्यात असलेल्या प्रांतांची संख्या ५० वरून २८ वर आली होती. डॅन्यूब आणि एल्ब या नद्या आपल्या साम्राज्याच्या सीमा बनवण्यासाठी ऑगस्टसने इल्लीरीया, मोयेसिया, पैन्नोनिया, जर्मेनिया या प्रांतांवर आक्रमण करण्याचे आपल्या सैन्याला आदेश दिले. त्याच्या या प्रयत्नांनी त्याच्या साम्राज्याच्या सीमा उत्तरेकडे ऱ्हाइन आणि डॅन्यूब नदीपर्यंत विस्तारल्या गेल्या. ऑगस्टसने इ.स.पू. ३१ मध्ये ऑक्टीअमच्या लढाईत मार्क ॲंटोनी आणि क्लिओपात्राचा पराभव करून इजिप्तवर आपला ताबा मिळवला व इजिप्तला रोमन साम्राज्याचा एक प्रांत बनवला.[१]

ज्युलियस सिझरने सोसिजीनीस या खगोलशास्त्रज्ञाच्या सल्ल्यानुसार ३५५ दिवसांच्या चांद कालगणनेचे रूपांतर ३६५ दिवसांच्या सौर कालगणनेत केले होते. त्यातीलच सेक्टीलीस महिन्याला इ.स.पू. ८ मध्ये ऑगस्टसच्या महत्त्वाकांक्षेपोटी ऑगस्ट असे नाव देण्यात आले. ऑगस्टसच्याच आग्रहावरून फेब्रुवारीतला एक दिवस कमी करून ऑगस्ट महिन्याला जोडून तो ३१ दिवसांचा करण्यात आला.[२][३]

वित्रुवियस या वास्तुरचनाकार व अभियंत्याने द आर्कीटेक्चुरा हा वास्तुरचनेवर आधारीत लिहिलेला दहा खंडांचा ग्रंथ ऑगस्टसला समर्पित केला होता.

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "ऑगस्टस सीझर, रोमन एएम्परर (इस.पू. ३१ ते इ.स. १४)" (इंग्रजी भाषेत). १२ नोव्हेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ सचिन अहिरराव. "कालगणनेला नवा आयाम". Archived from the original on १२ ऑगस्ट २०१४. १३ नोव्हेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ अ.ना. ठाकूर. "मराठी विश्वकोश, खंड २, "ऑगस्ट"". १२ नोव्हेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]

बाह्यदुवे

संपादन