क्लिओपात्रा

प्राचीन इजिप्तची राणी

क्लिओपात्रा फिलोपातोर ७ वी (इ.स. पूर्व ६९ - १२ ऑगस्ट ३०[६]) ही इजिप्तच्या टॉलेमिक राज्याची शेवटची राणी होती. टॉलेमिक राजवंशाचा संस्थापक टॉलेमी सॉटर पहिला आणि अलेक्झांडर द ग्रेट यांची ती वंशज होती. [note ४] तिच्या मृत्यूनंतर इजिप्त हा रोमन साम्राज्याचा एक प्रांत बनला. [note ५] क्लिओपात्राची मूळ भाषा कोइन ग्रीक होती, तसेच इजिप्शियन भाषा शिकणारी ती एकमेव टॉलेमिक शासक होती. [note ६]

क्लिओपात्रा
Photograph of an ancient Roman marble sculpture of Cleopatra VII's head as displayed at the Altes Museum in Berlin
बर्लिन क्लियोपेट्रा ही रोमन शिल्पाकृती. रॉयल डायडेम परिधान केलेले हे शिल्प इ.स.पू. १ल्या शतकाच्या मध्यभागी (तिच्या रोमला भेटींच्या वेळी ४६-४४ इ.स.पू.), इटालियन व्हिलामध्ये सापडले आणि आता जर्मनीच्या संग्रहालयात आहे. [१][२][३][note १]
टोलेमिक राज्याची राणी
क्लिओपात्राचे राज्य इ.स.पूर्व ५१–३० (२१ वर्षे) [४]
Predecessor टोलेमी आउलेटस १२वा
उत्तराधिकारी टोलेमी सिझेरियन १५वा[note २]
सह-शासक
  • टोलेमी आउलेटस १२वा
  • टोलेमी थिओस फिलोपेतर १३वा
  • टोलेमी फिलोपेतर १५वा
  • टोलेमी सिझेरियन १५वा
जन्म इ.स.पूर्व ६९
अलेक्झांड्रिया, टोलेमिक राज्य
मृत्यु इ.स.पूर्व १२ ऑगस्ट ३० (वय. ३९)[५]
अलेक्झांड्रिया, रोमकालीन इजिप्त
दफन टोम्ब ऑफ अँटनी अँड क्लिओपात्रा
(कदाचित इजिप्त)
जोडीदार
  • टोलेमी थिओस फिलोपेटर १३वा
  • टोलेमी १५वा
  • मार्क अँटनी
Issue
  • सिझेरियन
  • अलेक्झांडर हेलिओस
  • क्लिओपात्रा सेलेन दुसरा
  • टोलेमी फिलाडेल्फस (क्लिओपात्राचा मुलगा)
  • टोलेमी फिलापेडस Philadelphus
Full name
क्लिओपात्रा थिआ फिलोपेटर ७वी
राजवंश टोलेम
वडील टोलेमी आउलेटस १२वा
आई कदाचित क्लिओपात्रा ट्रायफेना ६वी [note ३]

इ.स.पूर्व ५८ मध्ये, आपल्या निर्वासित वडिलांसोबत क्लिओपात्रा रोमला गेली. त्यावेळी चौथ्या बेरेनिसने सिंहासनावर दावा केला. इ.स.पूर्व ५५ मध्ये रोमन लष्कराच्या सहाय्याने टॉलेमी इजिप्तला परतला तेव्हा बेरेनिस मारली गेली. इ.स.पू. ५१ मध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर क्लिओपात्रा आणि तिचा भाऊ टॉलेमी १३वा या दोघांनी संयुक्त राजवट सुरू केली, परंतु मतभेदांमुळे पुढे त्यांचे गृहयुद्ध सुरू झाले.

क्लिओपात्रा आणि सीझर (१८६६), चित्रकार: जीन-लिओन गेरोम

ज्युलियस सीझरविरुद्ध फार्सलसची लढाई हरल्यानंतर रोमन राजकारणी पोम्पी इजिप्तला पळून गेला. पॉम्पी हा टॉलेमी १२वा याचा सहकारी होता. पुढे टॉलेमी १३वा याने दरबारी लोकांच्या आग्रहास्तव सीझरने अलेक्झांड्रियाचा ताबा घेण्यापूर्वी हल्ला करून पोम्पीला मारले. सीझरने नंतर टोलेमी भावंडांशी समेट करण्याचा प्रयत्न केला, परंतु टॉलेमीचा मुख्य सल्लागार असलेल्या पोथीनोस याने सीझरच्या अटी क्लिओपात्राला अनुकूल मानल्या, म्हणून त्याच्या सैन्याने राजवाड्याला वेढा देऊन तिला आणि सीझरला कैद केले.

वेढा उठवल्यानंतर लवकरच टॉलेमी १३वा हा नाईलच्या लढाईत मरण पावला. त्यानंतर सीझरने क्लिओपात्रा आणि तिचा भाऊ टॉलेमी १४वा यांना संयुक्त राज्यकर्ते घोषित केले. पुढे क्लिओपात्राला सीझरकडून एक मुलगा झाला, ज्याचे नाव सीझेरियन असे ठेवले गेले. इ.स.पूर्व ४६ आणि ४४ मध्ये क्लिओपात्रा ही मांडलिक राणी म्हणून रोमला गेली, जिथे ती सीझरच्या महालात राहिली. इ.स.पू.४४ मध्ये सीझरच्या आणि (तिच्या आदेशानुसार) टॉलेमी १४व्याच्या हत्येनंतर, तिने तिचा मुलगा सीझेरियनला सह-शासक घोषित करून टॉलेमी १५वा असे नाव दिले.

क्लियोपात्रा फिलोपेटर ७वी, एलिजाबेथ सोफी चेरॉन हिचे कोरीव काम, प्रकाशित: १७३६

इ.स.पूर्व ४३-४२ च्या लिबरेटर्सच्या गृहयुद्धात क्लिओपात्राने ऑक्टाव्हियन (सीझरचा नातू आणि वारस), मार्क अँटनी आणि मार्कस एमिलियस लेपिडस यांची बाजू घेतली. इ.स.पूर्व ४१ मध्ये अँटनीला तारसोस येथे भेटल्यापासून राणीचे त्याच्याशी प्रेमसंबंध होते. त्याने आर्सिनोला क्लिओपात्राच्या विनंतीनुसार फाशी दिली आणि क्लिओपात्राने त्याला पार्थियन साम्राज्य व आर्मेनियाच्या साम्राज्यांवर केलेल्या आक्रमणांसाठी पैसे आणि लष्करी मदत पुरवली.

अँटनीने त्याच्या अधिकाराखालील विविध प्रदेशांवर अँटनी व क्लिओपात्राची मुले अलेक्झांडर हेलिओस, क्लियोपात्रा सेलेन दुसरी आणि टॉलेमी फिलाडेल्फस यांना राज्यकर्ते म्हणून घोषित केले. ही घटना, त्यांचे लग्न आणि ऑक्टाव्हियनची बहीण ऑक्टाव्हिया मायनर हिच्याशी अँटोनीचा घटस्फोट यांमुळे रोमन साम्राज्याचे अंतिम युद्ध सुरू झाले. ऑक्टाव्हियन याने युद्ध सुरू केले आणि त्याने रोमन सिनेटमधील अँटनीच्या सहकाऱ्यांना इ.स.पूर्व ३२ मध्ये रोममधून पळून जाण्यास भाग पाडले. ऑक्टाव्हियन याने पुढे क्लिओपात्राविरुद्ध युद्ध घोषित केले. इ.स.पू ३१ मध्ये ऍक्टियमच्या लढाईत अँटनी आणि क्लिओपात्रा यांच्या नौदल ताफ्याचा पराभव केल्यानंतर, ऑक्टाव्हियनच्या सैन्याने इ.स.पू. ३० मध्ये इजिप्तवर आक्रमण करून अँटनीचा पराभव केला. त्यानंतर अँटनीने आत्महत्या केली. जेव्हा क्लिओपात्राला समजले की, ऑक्टाव्हियनने तिला रोमन विजयी मिरवणुकीत आणण्याची योजना आखली आहे, तेव्हा तिने विष प्राशन करून आत्महत्या केली. परंतु तिचे सर्पदंशाने निधन झाले होते, असा लोकप्रिय गैरसमज आहे.

क्लिओपात्राचा मृत्यू, चित्रकार:अलेसेंड्रो ट्रुची

क्लिओपात्राचा वारसा प्राचीन आणि आधुनिक कलाकृतींमध्ये टिकून आहे. रोमन इतिहास आणि लॅटिन कवितांनी या राणीबद्दल टीकात्मक दृष्टिकोन निर्माण केला, जो नंतरच्या मध्ययुगीन आणि प्रबोधन साहित्यात देखील पसरला. व्हिज्युअल आर्ट्समधील तिच्या प्राचीन चित्रणांमध्ये रोमन प्रतिमा, चित्रे आणि शिल्पे, कॅमिओ कोरीव काम, काचकाम, टॉलेमिक व रोमन नाणी आणि रिलिफ्स यांचा समावेश होतो. प्रबोधन आणि बारोक कलांमध्ये ती ऑपेरा, चित्रे, कविता, शिल्पकला आणि नाटकांसह अनेक कलाकृतींचा विषय आहे. व्हिक्टोरियन काळापासून ती इजिप्‍टोमॅनियाची पॉप कल्चर आयकॉन बनली आहे. तसेच आधुनिक काळात क्लिओपात्रा ही अप्लायड आर्ट ,ललित कला, बर्लेस्क व्यंगचित्र, हॉलीवूड चित्रपट आणि विविध व्यावसायिक उत्पादनांच्या ब्रँड प्रतिमांमध्ये दिसत आली आहे.

पोंपेई येथील हाऊस ऑफ द ऑर्चर्डमधील एका महिलेचे फ्रेस्को चित्र. ही महिला कदाचित क्लिओपात्रा असावी.

इतिहास

संपादन

इ.स.पू. ६९ मध्ये जन्मलेली क्लिओपात्रा बाराव्या टॉलेमीची कन्या होती. या टॉलेमीचा पूर्वज पहिला टॉलेमी हा अलेक्झांडर द ग्रेट याच्या सैन्यात सेनानी होता. हा मॅसोडेनियन सेनानी अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर इजिप्तचा पहिला टॉलेमी राजा झाला. या राजघराण्याने भाऊ-बहिणींमधील लग्नाची पद्धत वंशशुद्धीच्या कल्पनेने उचलली होती. क्लिओपात्राच्या जन्माच्या वेळी इजिप्त हे अतिशय श्रीमंत राज्य होते. परंतु हे राज्य राजकीयदृष्ट्या अस्थिर असल्यामुळे व शेजारच्या रोमन साम्राज्यापुढे आपला टिकाव लागणार नाही म्हणून क्लिओपात्राच्या बापाने करार करून सीझर आणि पॉंपेईकडून आपला इजिप्तवर राजा म्हणून असलेला अधिकार मान्य करून घेतला होता. याबदल्यात रोमनांनी टॉलेमीकडून प्रचंड रक्कम घेतली. ही रक्कम टॉलेमीने रोमन धनकोंकडून कर्जाऊ घेऊन दिली. या प्रचंड रकमेची परतफेड करणे अवघड होते त्यामुळे त्याच्या राज्यातील नागरिकांना त्याचे हे कृत्य पसंत नसल्याने राज्यात अंतर्गत बंडाळी माजली. या परिस्थितीतच इ.स.पू. ५१ मध्ये टॉलेमीचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर त्याची १८ वर्षीय कन्या क्लिओपात्रा आणि तिचा धाकटा १० वर्षाचा भाऊ तेरावा टॉलेमी संयुक्तपणे राज्यावर आले. या राजघराण्यातील परंपरेनुसार हा तिचा धाकटा भाऊ तेरावा टॉलेमी क्लिओपात्राचा नवरा होता. तो आपल्याच हाताखालील एका सेवकाच्या आहारी जाऊन त्याच्या हातातील बाहुले बनला होता. क्लिओपात्राला दूर करून राज्य हातात घेण्याच्या त्यांच्या योजना चालू होत्या. रोममध्येही त्याचवेळी सीझर सत्तेवर आला होता. रोमची तिजोरी रिकामी होती त्यासाठी सीझरला इजिप्तकडून वसूली करणे गरजेचे होते म्हणून सीझर अलेक्झांड्रियाला आला. राज्यातील अंतर्गत बंडाळी आणि भावाची/नवऱ्याची कारस्थाने यातून मार्ग काढण्यासाठी क्लिओपात्राने सीझरची मदत घेतली. यानंतर क्लिओपात्राचे सीझरशी अत्यंत सलोख्याचे संबंध असले तरी रोमविषयी तिच्या मनात भीती होतीच. सीझरच्या खुनाच्या वेळी क्लिओपात्रा रोममध्येच होती. सीझरचे खूनी आणि त्याचे मित्रही या खुनासाठी क्लिओपात्राची मदत मागत होते. तिची सत्ता आणि राज्याचे स्वतंत्र असणे याचा विचार करून तिने त्यावेळी ॲंटोनीला मदत केली. नौका पुरविल्या. पैसा दिला. त्यामुळे साहजिकच क्लिओपात्रा आणि ॲंटोनी यांच्यातही सलोख्याचे संबंध निर्माण झाले.

मृत्यू

संपादन

मुख्य लेख: क्लिओपात्राचा मृत्यू

क्लिओपात्राचा मृत्यू कशामुळे झाला याचे गूढ अजूनही कायम आहे. मात्र तिने स्वतःच सर्पदंश करून घेऊन आत्महत्या केली असे मानले जाते. क्लिओपात्राचा समकालीन ग्रीक इतिहासकार स्ट्राबो याने आपल्या जिओग्राफीका या पुस्तकातही असाच उल्लेख केलेला आहे. यात तो म्हणतो एक तर क्लिओपात्राने विषारी द्रव्य सेवन केल्याने तिचा मृत्य झाला अथवा तिने स्वतःच्या वक्षावर सर्पदंश करवून घेतला. हा उपलब्ध स्रोत सर्वात जुना असून व क्लिओपात्राच्या मृत्यूसमयी स्ट्राबो अलेक्झांड्रिीयातच असल्याने हा स्रोत ग्राह्य मानला जातो. या घटनेनंतर साठ वर्षांनी मार्क्स व्हेलिअस पॅटरक्यूलस या रोमन इतिहासकाराने कॉम्पेटीशन ऑफ रोमन हिस्ट्री या ग्रंथात व या घटनेच्या १५० वर्षानंतर फ्लोरस या रोमन इतिहासकारानेच लिहिलेल्या एपिटोम ऑफ रोमन हिस्ट्री या ग्रंथातही क्लिओपात्राने सर्पदंश करवून घेऊन आत्महत्या केल्याचे उल्लेख आहेत.

क्लिओपात्राच्या मृत्यूनंतर १३० वर्षांनी ग्रीक इतिहासकार प्लुटार्क आपल्या लाईफ ऑफ ॲंटोनी मध्ये म्हणतो की, ऑक्टोव्हिअन क्लिओपात्राला शोधण्यात यशस्वी झाला होता आणि त्याने आपल्या सैनिकांना क्लिओपात्राला आत्महत्या करण्यापासून बाजूला करण्याचे आदेशही दिले होते कारण रोमला परत गेल्यावर होणाऱ्या विजयी मिरवणूकीत नेऊन त्याला क्लिओपात्राला अपमानित करायचे होते. पण ज्यावेळेस सैनिक तिच्यापर्यंत गेले त्यावेळी क्लिओपात्रा मरून पडली होती व तिच्याजवळ तिच्या दोन दासी आणि अंजीराच्या टोपलीत एक सर्प होता.

शेक्सपिअरनेही आपल्या ॲंटोनी ॲन्ड किलओपात्रा या नाटकात क्लिओपात्राच्या मृत्यूची हीच प्रतिमा कायम ठेवली आहे.

अलीकडच्या काळात इ.स. २०१० मध्ये जर्मन इतिहासकार ख्रिस्तोफर शाफर याने म्हटले आहे की, क्लिओपात्राचा मृत्यू सर्पदंशाने न होता तो विषारी द्रव्याच्या सेवनाने झालेला आहे. यासाठी त्याने अनेक ऐतिहासिक पुराव्यांची व विषतज्‍ज्ञांची मदत घेतली. तो म्हणतो ज्या सर्पाच्या दंशाने क्लिओपात्राचा मृत्यू झाला असे म्हटले जाते त्या सर्पाच्या (इजिप्शिअन कोब्रा) दंशाने झटपट आणि विनावेदना मृत्यू येऊ शकत नाही. या सर्पाच्या दंशाने मृ्त्यू येण्यापूर्वी हळूहळू शरीराचे एकक अवयव सुरुवातीला डोळ्यापासून निकामी होऊ लागतात. शाफर आणि विषतज्‍ज्ञ डायट्रीच मेब्स यांनी क्लिओपात्राचा मृत्यू हेमलॉक, वोल्फ्सबेन आणि ओपिअम या विषारी द्रव्याच्या सेवनाने झाल्याचे म्हटले आहे.[७]

चिरस्थान

संपादन

क्लिओपात्राच्या मृत्यूनंतर तिने घेतलेल्या चिरविश्रांतीचे ठिकाण शोधण्याचे आत्तापर्यंत अनेकांनी प्रयत्‍न केले आहेत. प्रसिद्ध इजिप्शियन पुरातत्त्वज्ञ डॉ. झही हवास आणि डॉमिनीकन रिपब्लिकची पुरातत्त्वज्ञ डॉ. कॅथलिन मार्टीनेझ यांनी अलिक्झांड्रियाच्या पश्चिमेला ५० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या तापोसिरीस मॅग्ना या मंदिरातच ॲंटोनी आणि क्लिओपात्राची चिरविश्रांतीस्थाने आहेत असा दावा केला आहे.[८] प्लुटार्कने उल्लेख केल्याप्रमाणे ॲंटोनी आणि क्लिओपात्राची दफने जवळजवळच आहेत या मतांचा त्यांनी आधार घेतला. हे तापोसिरीस मॅग्ना मंदिर ओरीसिस या देवतेचे असून तिला राक्षसाने मारून तिचे चौदा तुकडे इजिप्तच्या भूमीत फेकून दिले होते. हे ओरीसिसचे चौदा तुकडे जिथे जिथे पडले त्या त्या ठिकाणी इजिप्तमध्ये ही ओरीसिसची मंदिरे आहेत. त्यापैकीच तापोसिरीस मॅग्ना हे एक आहे. या मंदिराचे उत्खनन करतेवेळी डॉ. झही आणि मार्टिनेझ यांना त्या ठिकाणी अलेक्झांडर द ग्रेट याचे एक नाणे आणि क्लिओपात्राच्या चेहऱ्याचा मुखवटा सापडला आणि त्यावरून हे मंदिर चौथ्या टॉलेमीच्या काळात २००० वर्षांपूर्वी बांधले गेले असल्याचे त्यांनी सिद्ध केले.[९] या पुरातत्त्ववेत्त्यांनी रडारचा वापर करून या मंदिरात खाली २५ ते ३० मीटर खोलीवर तीन ठिकाणे शोधली. त्यांपैकी एका ठिकाणी क्लिओपात्राचे दफन झालेले असू शकते अशी शक्यता वर्तवली आहे.

  • क्लिओपात्रा आपल्या सौंदर्य रक्षणासाठी गाढवीच्या दुधाने आंघोळ करीत असे.[१०]
  • क्लिओपात्रा कारमाइन बीटल्सपासून बनवलेला लाल रंग ओठांचे सौंदर्य खुलविण्यासाठी वापरीत असे.[११]
  • आस्प जातीच्या सर्पाच्या दंशाने चटकन मृत्यू येतो याची खात्री करून घेण्यासाठी क्लिओपात्रा राणीने प्रथम तिच्या गुलामांवर प्रयोग केले.[१२]

वंशावळ

संपादन
 
पाचवा टॉलेमी, एपिफेन्स
 
 
 
इजिप्तची पहिली क्लिओपात्रा
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
आठवा टॉलेमी, फिस्कॉन
 
 
 
सहावा टॉलेमी फिलोपेटर
 
 
 
इजिप्तची दुसरी क्लिओपात्रा
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
इजिप्तची तिसरी क्लिओपात्रा
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
दहावा टॉलेमी
 
 
 
पहिली क्लिओपात्रा सेलेनी
 
 
 
दहावा टॉलेमी, लाथायरॉस
 
 
 
इजिप्तची चौथी क्लिओपात्रा
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
इजिप्तची तिसरी बेरेनाईस
 
 
 
 
बारावा टॉलेमी, आउलेट्स
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
इजिप्तची पाचवी क्लिओपात्रा
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
क्लिओपात्रा

क्लिओपात्रावरील पुस्तके

संपादन
  • क्लिओपात्रा (कादंवरी, सन २०२०पर्यंत ७ आवृत्त्या, लेखक संजय सोनवणी)
  • क्लिओपात्रा (व्यक्तिचित्रण, लेखिका - अलका रोडे)

चित्रपट आणि टीव्ही मालिका

संपादन

क्लियोपेट्रावर आधारित चित्रपट आणि टीव्ही मालिका

  • अँटोनी आणि क्लियोपात्रा (१९०८ चित्रपट)
  • अँटोनी आणि क्लियोपात्रा (१९१३ चित्रपट)
  • अँटोनी आणि क्लियोपात्रा (१९५९ चित्रपट)
  • अँटोनी आणि क्लियोपात्रा (१९७२ चित्रपट)
  • अँटोनी आणि क्लियोपात्रा (1974 टीव्ही नाटक)
  • अँटनी आणि क्लियोपात्रा (२०१५ चित्रपट)
  • बीबीसी टेलिव्हिजन शेक्सपियर
  • क्लियोपेट्रा (१९१७ चित्रपट)
  • क्लियोपेट्रा (1934 चित्रपट)
  • क्लियोपात्रा (१९६३ चित्रपट)
  • क्लियोपेट्रा (1970 चित्रपट)
  • क्लियोपेट्राचा दुसरा पती
  • कन्नकी (चित्रपट)
  • रेड नोटीस
  • झुल्फिकार (चित्रपट)

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ Raia & Sebesta (2017).
  2. ^ Sabino & Gross-Diaz (2016).
  3. ^ Grout (2017b).
  4. ^ Burstein (2004), pp. xx–xxiii, 155.
  5. ^ Skeat (1953, pp. 98–100).
  6. ^ Hölbl (2001), p. 231.
  7. ^ "पॉइझन, नॉट स्नेक किल्ड क्लिओपात्रा" (इंग्रजी भाषेत).
  8. ^ "क्लिओपात्राज टॉम्ब साईट डिस्कव्हर्ड" (इंग्रजी भाषेत). १३ एप्रिल, २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  9. ^ "डिग मे रिव्हील क्लिओपात्राज टॉम्ब" (इंग्रजी भाषेत). १३ एप्रिल, २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  10. ^ "रूपवतींच्या सौंदर्याचे हे आहे रहस्य". १३ एप्रिल, २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[मृत दुवा]
  11. ^ "अर्थवेध:लिपस्टिक". १३ एप्रिल, २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[मृत दुवा]
  12. ^ "आमापन, जैव (मराठी विश्वकोश, खंड २)". १३ एप्रिल, २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  1. ^ For further validation about the Berlin Cleopatra, see Pina Polo (2013, pp. 184–186), Roller (2010, pp. 54, 174–175), Jones (2006, p. 33), and Hölbl (2001, p. 234).
  2. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; Reign of Caesarion नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  3. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; cleopatra v or vi नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  4. ^ Southern (2009, p. 43) writes about Ptolemy I Soter: "The Ptolemaic dynasty, of which Cleopatra was the last representative, was founded at the end of the fourth century BC.
  5. ^ Grant (1972, pp. 5–6) notes that the Hellenistic period, beginning with the reign of Alexander the Great, came to an end with the death of Cleopatra in 30 BC.
  6. ^ The refusal of Ptolemaic rulers to speak the native language, Late Egyptian, is why Ancient Greek (i.e.

बाह्यदुवे

संपादन