नाईल नदी
नाईल (अरबी: النيل) ही आफ्रिका खंडातील प्रमुख नदी आहे. ६,६५० किलोमीटर (४,१३० मैल) इतकी लांबी असलेल्या नाईलला जगातील सर्वात लांब नदी मानण्यात येते.[१] पांढरी नाईल व निळी नाईल ह्या दोन नाईलच्या प्रमुख उपनद्या आहेत. पांढऱ्या नाईलचा उगम व्हिक्टोरिया सरोवरामध्ये होतो तर निळ्या नाईलचा उगम इथियोपियामधील ताना सरोवरात होतो. सुदानमधील खार्टूम शहराजवळ ह्या दोन नद्यांचा संगम होतो व पुढील प्रवाहाला एकत्रितपणे नाईल नदी असे संबोधले जाते. साधारणपणे उत्तरेकडे वाटचाल करून नाईल नदी भूमध्य समुद्रामध्ये मिळते.
नाईलचे पाणलोट क्षेत्र सुमारे ३४ लाख वर्ग किमी एवढे असून ती इथियोपिया, इजिप्त, सुदान, युगांडा, काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक व टांझानिया ह्या ६ देशांमधून वाहते. उत्तर आफ्रिकेतील सुदान व इजिप्त देशांमध्ये नाईल जवळजवळ पूर्णपणे वाळवंटामधून वाहते. ऐतिहासिक काळापासून इजिप्तमधील जीवन संपूर्णपणे नाईलवर अवलंबून आहे. इजिप्तमधील शहरे व गावे प्रामुख्याने नाईलच्या काठावरच वसलेली आहे व इजिप्तच्या संस्कृतीमध्ये नाईलला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
नील नदीच्या उपनद्या
संपादनअटबारा नदी निळ्या नाईल संगमाच्या खाली अटबारा नदी आहे, साधारणतः ताना तलावाच्या उत्तरेस इथिओपियामध्ये उगम पावते. सुमारे ८०० किलोमीटर (५०० मैल) लांब आहे. इथिओपियामध्ये पाऊस पडतो तेव्हाच अटबारा नदी वाहते.मुखाजवळ तिचे पात्र १५० किमी रुंद आहेत.
चित्रदालन
संपादन-
नाईल नदीतील बोट इजिप्त येथे इ.स. १९००
-
क्रूस बोटेतून नाईल नदिचे दृश्य लक्सर आणि अस्वान दरम्यानचे -
फेलूक्का, अस्वान जवळील दृश्य -
नाईल नदीतील बोट झामलेक भागातील, कॅंरियो.
-
नाईल नदी दलदलीचे दृश्य -
नाईल नदी युगांडा येथे -
नाईल नदी पार करतांना बोट, युगांडा येथील दृश्य -
नाईल नदीच्या काठावरील वाळवंटातील सापासारखे दिसणारे दृश्य.
व्हिडियो
संपादन-
नदी आणि पर्वत दृश्य नाईल नदी जवळील
-
नाईल नदी काठावर राहणारे लोक.
संदर्भ
संपादनबाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |