टायबेरियस

(टायबीअरिअस या पानावरून पुनर्निर्देशित)

टायबीअरिअस ज्युलिअस सीझर ऑगस्टस (लॅटिन : Tiberius Julius Caesar Augustus)
(जन्म - १६ नोव्हेंबर, इ.स.पू. ४२ : मृत्यू - १६ मार्च, इ.स. ३७) हा इ.स. १४ ते मृत्यूपर्यंत रोमन सम्राट होता. याचे मूळ नाव टायबीअरिअस क्लॉडिअस नीरो असे होते.

टायबीअरिअस
रोमन साम्राज्याचा २ रा सम्राट
अधिकारकाळ १८ सप्टेंबर, इ.स. १४ ते १६ मार्च, इ.स. ३७
पूर्ण नाव टायबीरिअस ज्युलिअस सीझर ऑगस्टस
जन्म १६ नोव्हेंबर, इ.स.पू. ४२
रोम
मृत्यू १६ मार्च, इ.स. ३७
मिसेनम
पूर्वाधिकारी ऑगस्टस
उत्तराधिकारी कालिगुला
वडील टायबीरिअस क्लॉडीअस नीरो
आई लिव्हिआ ड्र्यूसिला

पार्श्वभूमी

संपादन

टायबीअरिअसच्या आधीचा रोमन सम्राट ऑगस्टस याला मुलगा नव्हता. आपल्या मृत्यूनंतर रोमन साम्राज्यात आपल्या वारसावरून यादवी माजू नये म्हणून ऑगस्टसने आपल्या हयातीतच टायबीअरिअस या आपल्याच अनौरस पुत्राला दत्तक घेतले आणि त्याच्याबरोबर आपल्या जुलिया या विधवा मुलीचा पुनर्विवाह केला. काही वर्षे ऑगस्टसने टायबीअरिअसला आपल्या शासनात सहसम्राट म्हणून सामावून घेतले आणि त्याला प्रशासनातील तपशिलांची माहिती दिली. साहजिकच ऑगस्टसच्या मृत्यूनंतर त्याने केलेल्या मृत्यूपत्राप्रमाणे टायबीअरिअस हा रोमचा विधिवत सम्राट झाला आणि सिनेटसभेनेही त्याला मान्यता दिली.

कारकीर्द

संपादन

टायबीअरिअसने राजेशाही थाट कमी करून सीनेटसभेचे काही अधिकार वाढविण्याचा प्रयत्न केला. याच्या कारकिर्दीतील महत्त्वाची घटना म्हणजे ख्रिस्ती धर्मप्रवर्तक येशू ख्रिस्त याला रोमन अधिपत्याखालील पॅलेस्टाईन या भूप्रदेशात क्रॉसवर ठोकून मारण्यात आले. त्याच्या जेरूसलेम येथील ऱ्हाईन नदीच्या खोऱ्यातील काही सैनिकांनी बंडही केले होते. त्याचा पुतण्या व मुख्य सेनापती जरमॅनिकस यास सैन्याने सम्राट करण्याचे आमिष दाखविले आणि फितुरीचे प्रयत्न केले. परंतु टायबीअरिअसने त्यालाच दत्तक घेऊन भावी वारस म्हणून घोषित केल्यामुळे सैन्यातील हा अंतर्गत संघर्ष टळला.[१]

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "द रोमन एंपायर इन द फस्ट सेंच्युरी" (इंग्रजी भाषेत). १९ मे, २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे

संपादन
मागील:
ऑगस्टस पहिला
रोमन सम्राट
१८ सप्टेंबर, १४१६ मार्च, ३७
पुढील:
कालिगुला