ओटो फॉन बिस्मार्क (जर्मन: Otto von Bismarck; ऑटो एडुआर्ड लिओपोल्ड, बिस्मार्कचा युवराज व लॉरेनबर्गचा ड्यूक; १ एप्रिल १८१५ - ३० जुलै १८९८) हा जर्मन साम्राज्याचा पहिला चान्सेलर व तत्कालीन युरोपातील एक प्रभावी नेता होता. प्रशियाचा राष्ट्रप्रमुख असणाऱ्या बिस्मार्कने इ.स. १७७१ साली संपलेल्या युद्धात फ्रान्सचा पराभव केल्यानंतर अनेक जर्मन भाषिक राज्यांचे एकत्रीकरण करून शक्तिशाली जर्मन साम्राज्याची स्थापना करण्यात पुढाकार घेतला.

ओटो फॉन बिस्मार्क

जर्मन साम्राज्याचा पहिला चान्सेलर
कार्यकाळ
२१ मार्च १८७१ – २० मार्च १८९०
राजा विल्हेल्म १
फ्रीडरिश ३
विल्हेल्म २
मागील पदनिर्मिती
पुढील लेओ फॉन काप्रिव्ही

जन्म १ एप्रिल, १८१५ (1815-04-01)
श्योनहाउझन, प्रशिया
मृत्यू ३० जुलै, १८९८ (वय ८३)
फ्रिडरिक्सरूह
सही ओटो फॉन बिस्मार्कयांची सही

आपल्या त्याच्या धोरणी व प्रभावी नेतृत्व तसेच शांतताप्रिय परराष्ट्रधोरणांमुळे युरोपात शांततेचे वातावरण टिकून राहिले. सम्राट पहिल्या विल्हेल्मच्या मृत्यूनंतर काही काळातच इ.स. १८८८ साली सत्तेवर आलेल्या दुसऱ्या विल्हेल्मला बिस्मार्कचे शांतीवादी विचार पटले नाहीत व त्याने १८९० साली त्याने बिस्मार्कला चान्सेलरपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले. त्यानंतरच्या काळात वसाहतवादी विचारांच्या विल्हेल्मने झपाट्याने लष्करबळ वाढवून जर्मनीला पहिल्या महायुद्धाकडे ढकलले.

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: