विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प/भाषांतर आणि इतर विकिपीडियात निर्यात सुसूत्रीकरण

सुयोग्य चित्र वापरा प्रकल्प
सामान्य माहिती (संपादन · बदल)भाषांतराची विनंती कशी करावी

संपादन

मराठी विकिपीडियामधील दर्जेदार लेख इंग्रजी भाषेत अनुवादीत करणे सोपे आहे.

१) मराठी विकिपीडियातून इंग्रजी/इतरभाषी विकिपीडियात अनुवादीत करावयाचा लेख,विकिपीडिया किमान निकषास व सुयोग्य संदर्भांनी युक्त दर्जास प्राप्त असावा.
२) इंग्रजी/इतर भाषी विकिपीडियावर संबधीत विषयाबद्दल लेख असावा.किंवा इंग्रजी विकिपीडियावरील स्वत:च्या सदस्य पानावर किमान स्वरूपाचा अनुवाद सुरू करावा. संबंधीत अमराठी विकिपीडियातील मुख्य नामविश्वात लेख किमान स्वरुपात तेथील समुदायाने स्विकारल्याची खात्री करावी अथवा न वगळले जाता किमान महीना पंधरा दिवस पासून तरी न वगळला जाता अस्तीत्वात आहे हे पहावे.
३) इंग्रजी विकिपीडीयावर मराठीतून अनुवादीत करावयाच्या लेखाच्या चर्चापानावर {{Expand Marathi|Marathiarticletitle|date=CURRENTMONTHNAME CURRENTYEAR }} असा साचा लावावा.Marathiarticletitle च्या ठिकाणी मराठी विकिपीडियावरील लेखाचे नाव (मराठीतून), CURRENTMONTHNAME= सध्याचा चालू महीना इंग्रजीतून,CURRENTYEAR सध्या चालू वर्ष इंग्रजीतून लिहावे.उदाहरणार्थ en:Talk:Emilie Schenkl येथे लावलेला {{Expand Marathi|एमिली शेंकल|date=June 2011}} हा साचा.

जर इंग्रजी लेख उपल्ब्ध नसेल तर,एक दोन ओळींनी एक अपुर्ण लेख सुरू करा,ज्यात त्या लेखाचे वर्णन वा प‍रीभाषा/व्याख्या असेल.मग आपल्या लेखास भाषांतर साचा लावा.

en:Wikipedia:Category:Wikipedia featured articles in other languages यात, जुन्या प्रकल्पातील असे अनेक लेख असतात ज्यास "भाषांतर करून हवे" अशी पुस्ती जोडलेली असते. यापैकी अनेक गैरलागु असतात.(म्हणजे-सामान्यतः,इंग्रजी विकिपीडियावरील लेख चांगला असतो. असे इंग्रजी विकिपीडियावरील सदस्यांना नेहमी वाटत असते)

4)संबंधीत लेख मराठी अथवा महाराष्ट्रीय संदर्भाने असून इंग्रजी विकिपीडियावरील महाराष्ट्र प्रकल्प ने त्याची दखल घेऊन हवे असल्यास खालील प्रमाणे साचा लेखाच्या चर्चा पानावर लावता येतो.
{{WP India
|class=stub
|importance=low
|maharashtra=yes
|maharashtra-importance=low
}}


मराठीतून इतर भाषात अनुवादीत करून हवे असलेले लेख यादी

संपादन
  • लेखांची उल्लेखनीयता-स्विकार्हता ठरवण्यास तो-तो भाषी विकिपीडिया समुदाय स्वतंत्र असतो.तेथे मराठी विकिपीडियाचे निकष जसेच्या तसे लागू न होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे प्रकल्प पान केवळ मराठी विकिपीडियातून करावयाच्या मराठी भाषी अनुवादक समन्वयापुरते मर्यादीत उद्दीष्ट ठेवते हे लक्षात घ्यावे.
  • अनुवाद प्रस्ताव लेखाचा मराठी विकिपीडियावरील आकार किमान ७००० बाईट आहे आणि त्याचे विकिपीडिया:लेख तपासणी आणि सुधारणा प्रकल्प प्रकल्पांतर्गत किमान ज्ञानकोशीय गुणवत्ता प्राप्त समसमीक्षा झाली असे पहावे (,अर्थात एमिली शेंकल || en:Emilie Schenkl लेखा प्रमाणे इंटरेस्टेड सदस्य स्वत:च एकतर्फी पुढाकार संबंधीत भाषा प्रकल्पात घेऊ शकतात; सर्व भाषी प्रकल्प स्वतंत्र असल्यामुळे म्हणून हा अत्यावश्यक नियम नव्हे)
क्रमांक मराठी विकिपीडियावरील लेख ज्या इतर भाषां विकिपीडियांमध्ये अनुवादीत करावयाचा आहे अशा भाषांचे नाव
एमिली शेंकल en:Emilie Schenkl
उदाहरण उदाहरण
उदाहरण उदाहरण