रामायणाच्या आवृत्त्या

(रामायणाची रुपांतरणे या पानावरून पुनर्निर्देशित)

विविध प्रकारे मोजल्यास, रामायण ह्या महाकाव्याच्या जवळजवळ ३०० वेगवेगळ्या आवृत्त्या आहेत. त्यांपैकी महर्षी वाल्मिकी यांनी संस्कृत भाषेत लिहिलेले रामायण अर्थात वाल्मीकि रामायण हे सर्वात जुने व मूळ आहे.

राजा रविवर्मा यांनी काढलेले चित्र

रामायणाचा प्रसार भारताबाहेर श्रीलंका, नेपाळ, ब्रह्मदेश, इंडोनेशिया, कंबोडिया, लाओस, चीन, थायलंड, फिलिपाईन्स, जपान, मलेशिया, व्हिएतनाम, आणि मंगोलिया अशा आशियातील देशांमध्ये झाला आहे. मूळ वाल्मिकी रामायण भारत तसे भारताबाहेरील गेले तसेच त्याचे भारतातील अन्य प्रादेशिक भाषांमध्ये रूपांतरित झाले.

मूळ रामायणाचे रूपांतरण केवळ विविध भाषा साहित्य लेखन या माध्यमांपुरते झालेले नसून ह्याचे प्रकटीकरण अनेक प्रकारचा कला माध्यमांतून झालेले आहे. उदाहरणार्थ, ख्मेर नृत्य रंगभूमी, केरळलक्षद्वीप मधील मुस्लिमांची मप्पिला गीते, कर्नाटकातील यक्षगान नृत्ये इत्यादी. काही रामायणावरील प्रसंगांवर आधारित चित्रं म्हणजे थायलंडमधील वट फ्रा केयो मंदिरावरील चित्रे. तसेच सादरीकरणातील इंडोनेशियातील इतर प्रकार म्हणजे रामायणावर आधारित नृत्यनाट्य सादरीकरण, मुखवटा नृत्यनाट्य आणि वायंग हे छायाबाहुली सादरीकरण. तसेच शिल्प प्रकारांमध्ये, अंगकोर वट मंदिराच्या भिंतीवरील रामायणातील लंकेच्या अंतिम युद्धाचे काही प्रसंग कोरण्यात आले आहेत.

संस्कृत आवृत्या

संपादन

खाली रामायणाच्या काही प्रमुख संस्कृत आवृत्त्या आहेत. यांतील काही आवृत्त्या प्रामुख्याने वाल्मिकींनी लिहिलेल्या कथानकावर भर देतात तर काही आवृत्त्या परिघीय कथेवर किंवा आध्यात्मिक दर्शनावर भर देतात

अध्यात्म रामायण .

हे ब्रह्मांड पुराणावर आधारित आहे. असे मानले जाते की ह्या रामायणाचा प्रभाव तुळशीदास यांनी लिहिलेल्या रामचरितमानस या ग्रंथावर आहे. वाल्मीकि रामायण रामांच्या मानवी अस्तित्वावर भर देते, मात्र अध्यात्मरामायण रामायणाची कथा त्याच्या दिव्यत्वाच्या दृष्टिकोनातून सांगते.

वसिष्ठ रामायण

(हे प्रामुख्याने योगवाशिष्ठ म्हणून ओळखले जाते.)

यात प्रामुख्याने वशिष्ठ मुनी व राम यांच्यातील संवाद आला आहे. या संवादाद्वारे अद्वैत सिद्धांताच्या नियमांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्ये अनेक उपाख्याने तसेच स्पष्टीकरणात्मक कथांचा समावेश करण्यात आला आहे; मात्र वाल्मीकि रामायणासारखे खोलात वर्णन करण्यात आले नाही आहे.

लघु योगवाशिष्ठ

काश्मिरातील अभिनंद याने लिहिलेले हे रूपांतरण म्हणजे वशिष्ठ रामायणाचे संक्षिप्त रूप आहे.

आनंद रामायण

हे संपूर्णतः वाल्मिकी रामायणावर आधारित आहे मात्र हे रामायण रामाचा आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर अधिक भर देते. ह्या रामायणात सीतेचे अपहरण आणि रामेश्वरम येथे रामाने केलेल्या शिवलिंगाची प्रतिष्ठापना या प्रसंगांचा विशेषतः समावेश आहे

अगस्त्य रामायण

ह्या रामायणात अगस्त्यांच्या गुणविशेषावर भर देण्यात आला आहे.

संस्कृत नाटक

संपादन
  • प्रतिमा नाटक
  • अभिषेक नाटक
  • यज्ञ फलम
  • कुंदमाला
  • महावीरचरित
  • उत्तर राम चरित
  • जनक जननद
  • चलित राम
  • रामाभ्युदय
  • स्वप्न दशानन
  • मैथिली कल्याण
  • उदात्त राघव
  • आश्चर्य चुडामणी
  • कृत्य रावण
  • माया पुष्पक
  • अनर्घ राघव
  • बाल रामायण
  • अभिनव राघव
  • वाली वध
  • प्रसन्न राघव
  • रघु विलास
  • राघव अभ्युदय
  • जानकी राघव
  • विलास
  • राघव विक्रम
  • दूतांगद
  • अमोघ राघव
  • अभिराम राघव
  • अद्भुत दर्पण
  • जानकी परिणय
  • राघवानंद
  • ललित राघव
  • महा नाटक
 
हनुमानाच्या खांद्यावर बसलेला राम राक्षसराज रावणाशी युद्ध करताना.

प्रादेशिक रूपांतरणे

संपादन

भारतातील राज्यांनुसार रामायणाची रूपांतरणे खालीलप्रमाणे :

महाराष्ट्र

  • सोळाव्या शतकात संत एकनाथांनी लिहिलेले भावार्थरामायण हे प्रसिद्ध मराठी रूपांतरण आहे . त्याचप्रमाणे असे म्हणले जाते की बाराव्या किंवा तेराव्या शतकात रामायणाचे जुन्या मराठीत भाषांतर उपलब्ध होते, असा एक संदर्भ सापडतो.
  • वास्तव रामायण: डाॅ पद्माकर विष्णू वर्तक यांनी लिहिलेल्या या रामायणात कोणतेही चमत्कार नाहीत. या रामायणातले वानर हे माकड नाहीत.

तामिळनाडू

बाराव्या शतकात कवी कम्बन यांनी लिहिलेले कम्बरामायणम् हे प्रसिद्ध तमिळ रूपांतरण आहे.

केरळ

बाराव्या शतकातील चीरमान याने मल्याळम भाषेत लिहिलेले रामचरितम हे काही प्रथम काव्यांपैकी आहे. तसेच सोळाव्या शतकातील निर्णम राम पंचिकेर यांनी लिहिलेले कन्नस्सा रामायण आणि अध्यात्म रामायण किलीपट्टू( सर्वात लोकप्रिय) हे थूंचथ एळूथचन यांनी लिहिलेले.

कर्नाटक

तेराव्या शतकातील कुुुमूदेंदू रामायण आणि सोळाव्या शतकातील कुमार वाल्मिकी तोरावेे रामायण ही रामायणाची शास्त्रीय कन्नड रूपांतरणे आहेत. याव्यतिरिक्त बाराव्या शतकातील नागचंद्राने लिहिलेले रामचंद्र चरित्र पुराण हे एक रूपांतरण आहे.

आंध्र प्रदेश

चौदाव्या शतकात गोना बुड्डा रेड्डी यांनी लिहिलेले श्री रंगनाथन रामायण हे तेलुगु रूपांतरण आहे. तसेच कवी मोल्लाने मोल्ला रामायणमु लिहिले. विश्वनाथ सत्यनारायण यांनी लिहिलेले श्रीमदरामायण कल्पवृक्षमु हे तेलुगु भाषेतील सर्वात प्रशस्त लेखन मानले जाते. तेलुगु भाषेला याच काव्य कृतीसाठी पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता.

आसाम

चौदाव्या शतकात माधव कंंदालीने लिहिलेले सप्तकांड रामायण हे आसामी भाषेत झालेले रामायणाचे रूपांतरण आहे.

ओडिसा

रामायणावर आधारित लेखनाची ओडिसामध्ये मोठी साहित्यिक परंपरा आहे. चौदाव्या शतकात बलराम दास यांनी ओडिया भाषेत दंडी रामायण अथवा जगमोहन रामायणाचे रूपांतरण केले. पंधराव्या शतकात सरला दास यांनी विलंका रामायण काव्य प्रारूपात लिहिले. त्यानंतर रघुनाथ भंजाने रघुनाथ विलास लिहिले. आणि सतराव्या शतकात त्याचा नातू उपेंद्र भंज याने बैदेहीश विलास लिहिले. विश्वनाथ खुंटिया यांनी लिहिलेले बिसी रामायण वा विचित्र रामायण सर्वात लोकप्रिय आहे.

बंगाल

पंधराव्या शतकात कृत्तिवास ओझा यांनी लिहिलेले कृत्तिवास रामायण हे रामायणाचे बंगाली रूपांतरण आहे .

गोवा

पंधराव्या शतकात कृष्णदास श्याम यांनी रामायणु हे कोकणी भाषेत लिहिले होते.

उत्तर प्रदेश

सोळाव्या शतकात गोस्वामी तुळशीदास यांनी रामचरितमानस या ग्रंथाची रचना केली.