अद्वैत ही संज्ञा व संकल्पना गूढवाद, तत्त्वमीमांसा, मानसशास्त्र आणि तत्त्वज्ञान यांमध्ये आढळते. मानसशास्त्र व गूढवादात अद्वैताचा अर्थ व्यक्तीची आत्मजाणीव व व्यक्तीच्या जाणिवेतील घटक (चेतनेचे/जाणिवेचे विषय) यांच्यात अभेद असणे असा होतो. योगामध्ये याला विलिनता असे म्हटले जाते.