मिरज जंक्शन रेल्वे स्थानक

भारतीय रेल्वे स्टेशन
(मिरज रेल्वे स्थानक या पानावरून पुनर्निर्देशित)

मिरज रेल्वे स्थानक हे मिरज शहरामधील रेल्वे स्थानक आहे. सांगली जिल्ह्यातीलपश्चिम महाराष्ट्रामधील सर्वात वर्दळीचे जंक्शन असलेल्या मिरज येथे तीन प्रमुख लोहमार्ग मिळतात. कोल्हापूरकडे जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या मिरजवरूनच जातात. तसेच कर्नाटकातील बेळगाव, हुबळी, बंगळूर इत्यादी प्रमुख शहरे देखील मिरजसोबत जोडली गेली आहेत.

मिरज
मध्य रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता मिरज, सांगली जिल्हा
गुणक 16°49′11″N 74°38′20″E / 16.81972°N 74.63889°E / 16.81972; 74.63889
समुद्रसपाटीपासूनची उंची १२९ मी
मार्ग

पुणे–मिरज–लोंडा रेल्वेमार्ग
मिरज-लातूर रोड मार्ग

मिरज-कोल्हापूर मार्ग
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण पूर्ण
संकेत MRJ
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे
स्थान
मिरज is located in महाराष्ट्र
मिरज
मिरज
महाराष्ट्रमधील स्थान

मिरज-पंढरपूर-कुर्डुवाडी-लातूर ह्या नॅरोगेज मार्गाचे २००८ साली पूर्णपणे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर झाले. ह्यामुळे मिरजहून सोलापूर, हैदराबाद इत्यादी शहरांसाठी देखील गाड्या सुटू लागल्या.

इतिहास संपादन

मध्य रेल्वेकडून चालविण्यात येत असलेल्या मिरज स्थानकाची दक्षिण मराठा रेल्वे कंपनीच्या काळात स्थापना करण्यात आली असल्याचा इतिहासात दाखला मिळतो. दक्षिण मराठा रेल्वे कंपनीकडून जून १८८७ मध्ये कोरेगाव ते मिरज दरम्यान रेल्वेमार्गांची बांधणी करण्यात आली होती. या मार्गावरील रेल्वेच्या सफलतेनंतर तातडीने डिसेंबर १८८७ मध्ये मिरज ते बेळगाव रेल्वेमार्गाची निर्मिती करण्यात आली. सांगली जिल्ह्यातील मिरज स्थानकाचे महत्व दक्षिण मराठा रेल्वे कंपनीच्या निदर्शनास आल्याने मिरज स्थानकाचा व या मार्गे धावणाच्या गाड्यांचा झपाट्याने विस्तार करण्याचा सपाटा कंपनीने

लावला होता. १९०७ पर्यंत टप्प्याटप्प्याने सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात रेल्वेचे जाळे निर्माण होण्यास सुरुवात झाली होती.

मात्र दक्षिण मराठा रेल्वेचे मद्रास रेल्वे कंपनीत विलीनीकरण करण्यात आले होते. त्यानंतर भारतीय रेल्वेकडून १९४४ मध्ये मद्रास रेल्वेकडून भारत सरकारने रेल्वेची यंत्रणा ताब्यात घेतली होती. परंतु मिरजेतील यंत्रणा ताब्यात घेण्यासाठी भारत सरकारला सन १९४९ पर्यंतची वाट पहावी लागली होती. कारण त्यावेळी मिरज-कोल्हापूर हा रेल्वेमार्ग कोल्हापूरचे राजर्षि शाहू महाराज आणि मिरज- सांगली हा रेल्वेमार्ग सांगलीचे पटवर्धन सरकार यांच्याकडून चालविला जात होता. संस्थांचे विलीनीकरण झाल्यानंतर ही दोन्ही रेल्वे स्थानके भारत सरकारने ताब्यात घेतली. १९५२ पासून रेल्वेच्या पुनर्गठनासठी सुरुवात करण्यात आली. त्यानंतर रेल्वेचा विस्तार करण्यासाठी रेल्वेचे विविध विभागांची स्थापना करण्यात आली. त्यानुसार मिरज आणि कोल्हापूर हे दोन्ही स्थानके तत्कालीन दक्षिण- मध्य रेल्वेकडे देण्यात आली. त्या काळात पुणे- बंगलोर, मिरज सांगली, मिरज - कोल्हापूर हे मीटरगेज रेल्वेमार्ग दक्षिण-मध्य रेल्वेकडे तर मिरज-लातूर हा नॅरोगेज रेल्वेमार्ग मध्यरेल्वेकडे देण्यात आला होता. त्यानंतर मिरजेतील रेल्वेच्या विस्तारीकरणाचा विकासाला खो बसला आहे. खऱ्याअर्थाने चालना मिळाली. मिरज ते कोरेगाव जून १८८७ मध्ये, कोरेगाव ते पुणे नोव्हेंबर १८९० मध्ये पूर्ण

आले. तसेच लोंडा - बेळगाव रेल्वेमार्ग १८८७ रोजी तर बेळगाव मिरज हा रेल्वेमार्ग डिसेंबर १८८७ मध्ये सुरू करण्यात आला. टप्प्याटप्प्याने रेल्वेला प्रवाशांची संख्या वाढू लागल्याने रेल्वे गाड्यांचादेखील विस्तार करण्यात आला होता.

मिरज रेल्वे स्थानकाला ओळख निर्माण करून देण्याचे काम खन्या अर्थाने त्या काळातील दक्षिण मध्य आणि आताच्या दक्षिण-पश्चिम रेल्वेकडूनच करण्यात आले. महाराष्ट्राच्या सीमेवर असणाऱ्या मिरज स्थानकाला मुख्य प्रवाहात आणण्यास आणखीन चालना मिळेल यासाठी मिरज रेल्वे स्थानकाचा मध्य रेल्वेमध्ये समावेश करण्यात आला.

महत्त्वाच्या रेल्वेगाड्या संपादन

क्र. रेल्वे नाव
११००५ / ११००६ मुंबई दादरपाँडिचेरी चालुक्य एक्सप्रेस
११०२१ / ११०२२ दादर–[[तिरूनेलवेल्ली] चालुक्य एक्सप्रेस
११०२३ / ११०२४ मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसकोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस
११०२९ / ११०३० मुंबई–कोल्हापूर कोयना एक्सप्रेस
११०३५ / ११०३६ दादर–म्हैसूर शरावती एक्सप्रेस
११०३९ / ११०४० कोल्हापूर–गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस
११०४५ / ११०४६ कोल्हापूर–धनबाद दीक्षाभूमी एक्सप्रेस
११०४७ / ११०४८ मिरज–हुबळी एक्सप्रेस
११०४९ / ११०५० अहमदाबाद–कोल्हापूर एक्सप्रेस
११०५१ / ११०५२ कोल्हापूर–सोलापूर एक्सप्रेस
११०९७ / ११०९८ पुणेएर्नाकुलम पूर्णा एक्सप्रेस
११३०३ / ११३०४ हैदराबाद–कोल्हापूर एक्सप्रेस
११४०३ / ११४०४ नागपूर–कोल्हापूर एक्सप्रेस
१२६२९ / १२६३० यशवंतपूरहजरत निजामुद्दीन कर्नाटक संपर्क क्रांती एक्सप्रेस
१२७७९ / १२७८० वास्को द गामा–हजरत निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस
१६२०९ / १६२१० अजमेर–म्हैसूर एक्सप्रेस
१६५०५ / १६५०६ गांधीधामबंगळूर एक्सप्रेस
१६५८९ / १६५९० बंगळूर–मिरज-राणी चेन्नम्मा एक्सप्रेस
१७३१७ / १७३१८ हुबळी − लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
१७४११ / १७४१२ मुंबई–कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस
१७४१५ / १७४१६ तिरुपती–कोल्हापूर हरिप्रिया एक्सप्रेस
१२४९३ /१२४९४ मिरज-ह.निझामुद्दीन दर्शन सुपरफास्ट एक्स्प्रेस ०१४२३/०१४२४ मिरज-पुणे एक्स्प्रेस

बाह्य दुवे संपादन