लातूर रेल्वे स्थानक हे लातूर शहरामधील एक रेल्वे स्थानक असून ते मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागामधील लातूर रोड–मिरज ह्या मार्गावर स्थित आहे.[१] लातूर हे स्थानक बंगलोर, हैदराबाद, पुणे, गुलबर्गा, बिदर, मुंबई, नांदेड, अमरावती, नागपूर, कोल्हापूर, मिरज, सोलापूर आणि धनबाद लातूर रोड, तिरुपती,उस्मानाबादशी जोडले गेलेले आहे.[२]

लातूर
मध्य रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता लातूर, लातूर जिल्हा
गुणक 18°25′48″N 76°33′22″E / 18.43000°N 76.55611°E / 18.43000; 76.55611
समुद्रसपाटीपासूनची उंची ६५१ मी
मार्ग मिरजलातूर रोड रेल्वेमार्ग
इमारत प्रकार 1
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत LUR
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग सोलापूर विभाग, मध्य रेल्वे
स्थान
लातूर is located in महाराष्ट्र
लातूर
लातूर
महाराष्ट्रमधील स्थान

प्रशासन

संपादन

हे स्थानक मध्य रेल्वेच्या सोलापूर रेल्वे विभागांतर्गत येते.

इतिहास

संपादन

१९२३ पासून तेथे नॅरो गेज रेल्वे होती परंतु २००७ मध्ये तिला ब्रॉड गेज मध्ये रूपांतरीत करण्यास सुरुवात झाली. २००८ मध्ये संपूर्ण मिरज – लातूर रेल्वे लाईन नॅरो गेज वरून ब्रॉड गेज करण्यात आली. तसेच २००८ मध्ये मिरज स्थानक रेल्वे मार्गाद्वारे सोलापूर स्थानकाशी जोडण्यात आले.

जलदूत एक्स्प्रेस

संपादन

महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच सलग ३ वर्षाच्या दुष्काळामुळे लातूर शहरात २०१६ साली उन्हाळ्यामध्ये प्रचंड पाणीटंचाईचा सामना करावा लागला. ही समस्या सोडवण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक संयुक्त प्रकल्प हाती घेतला. अधिक संशोधनानंतर आणि योजनेत विविध बदल करून शेवटी लातूरला ३४२ कि.मी. वरून पाणी पुरविण्यासाठी मिरज स्थानकाची निवड करण्यात आली.[३] ११ एप्रिल २०१६ रोजी, प्रत्येकी ५०,००० ली. पाणी याप्रमाणे १० टँकर असलेली जलदूत एक्स्प्रेस रवाना झाली.[४] २५०,००० लिटर पेक्षा जास्त पाण्याची वाहतूक करण्यात आली आणि ही योजना यशस्वीपणे पार पाडण्यात आली.[५]

विद्युतीकरण

संपादन

युनियन रेल्वे बजेट २०१४-१५ नुसार कुर्डूवाडी – लातूर – लातूर रोड मार्गाचे विदुतीकरण होणार आहे.[६]

दुहेरीकरण

संपादन

कुर्डूवाडी – लातूर रोड दरम्यानच्या सेक्शनचे अंदाजे ७०० करोडचा खर्च करून दुहेरीकरण करण्यात येणार आहे.[७]

संदर्भ

संपादन
  1. ^ "Solapur Railway Division". 16 May 2017 रोजी पाहिले.
  2. ^ "Latur Train Station List". 16 May 2017 रोजी पाहिले.
  3. ^ "How India's longest water train is coming to Latur".
  4. ^ "Latur 'water train' completes 100 trips".
  5. ^ "Maharashtra drought: Latur to get water by train in 15 days".
  6. ^ "Surveys for 19 new rail lines proposed in Interim Rail Budget".
  7. ^ "Doubling of track: Faster rail services by 2016".