गांधीधाम (गुजराती: ગાંધીધામ) हे भारताच्या गुजरात राज्याच्या कच्छ जिल्ह्यामधील मधील एक सुनियोजित शहर आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सिंध प्रांतामधून स्थलांतरित झालेल्या हिंदू निर्वासितांसाठी गांधीधाम शहर १९५० साली वसवले गेले. गांधीधाम कच्छ प्रदेशाच्या दक्षिण भागात गुजरातची राजधानी गांधीनगरच्या ३०० किमी पश्चिमेस स्थित आहे. कच्छची आर्थिक राजधानी मानल्या जात असलेल्या गांधीधामची लोकसंख्या २०११ साली २.४८ लाख होती.

गांधीधाम
ગાંધીધામ
भारतामधील शहर

गांधीधाम रेल्वे स्थानक
गांधीधाम is located in गुजरात
गांधीधाम
गांधीधाम
गांधीधामचे गुजरातमधील स्थान

गुणक: 23°4′N 70°8′E / 23.067°N 70.133°E / 23.067; 70.133

देश भारत ध्वज भारत
राज्य गुजरात
जिल्हा कच्छ जिल्हा
समुद्रसपाटीपासुन उंची ८९ फूट (२७ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर २,४७,९९२
  - घनता १२,७३५ /चौ. किमी (३२,९८० /चौ. मैल)
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ
अधिकृत संकेतस्थळ

पश्चिम रेल्वेवरील गांधीधाम रेल्वे स्थानक कच्छमधील सर्वात वर्दळीचे स्थानक असून कच्छ एक्सप्रेससयाजीनगरी एक्सप्रेस या भूज ते मुंबईदरम्यान रोज धावणाऱ्या गाड्या गांधीधाममार्गेच जातात.

हे सुद्धा पहा

संपादन