कच्छ एक्सप्रेस
कच्छ एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. पश्चिम रेल्वेद्वारे चालवली जात असलेली ही रेल्वे मुंबईला गुजरातच्या कच्छ जिल्ह्यामधील भूज शहरासोबत जोडते. ही गाडी वांद्रे टर्मिनस व भुज स्थानकांदरम्यान रोज धावते व मुंबई ते भूज दरम्यानचे ८४१ किमी अंतर १६ तास व १५ मिनिटांत पूर्ण करते. सयाजीनगरी एक्सप्रेस ही गाडी देखील ह्या दोन स्थानकांदरम्यान रोज धावते.
मुंबई ते अहमदाबाद दरम्यानचा रेल्वेमार्ग विद्युत असल्यामुळे डब्ल्यू.ए.पी.-४ हे विद्युत इंजिन कच्छ एक्सप्रेसला अहमदाबादपर्यंत नेते व त्यापुढील प्रवास डिझेल इंजिन वापरून केला जातो.
तपशील
संपादनवेळापत्रक
संपादनगाडी क्रमांक | मार्ग | प्रस्थान | आगमन | कधी |
---|---|---|---|---|
१९१३१ | वांद्रे टर्मिनस – भुज | १७:१० | ०९:२५ | रोज |
१९१३२ | भुज – वांद्रे टर्मिनस | १९:५० | ११:२५ | रोज |