सयाजीनगरी एक्सप्रेस

सयाजीनगरी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. पश्चिम रेल्वेद्वारे चालवली जात असलेली ही रेल्वे मुंबईला गुजरातच्या कच्छ जिल्ह्यामधील भुज शहरासोबत जोडते. ही गाडी वांद्रे टर्मिनसभुज स्थानकांदरम्यान रोज धावते व मुंबई ते भुज दरम्यानचे ८४१ किमी अंतर १६ तास व २५ मिनिटांत पूर्ण करते. कच्छ एक्सप्रेस ही गाडी देखील ह्या दोन स्थानकांदरम्यान रोज धावते.

भुज स्थानकावर उभी असलेली सयाजीनगरी एक्सप्रेस
सयाजीनगरी एक्सप्रेसचा मार्ग

मुंबई ते अहमदाबाद दरम्यानचा रेल्वेमार्ग विद्युत असल्यामुळे डब्ल्यू.ए.पी.-४ हे विद्युत इंजिन सयाजीनगरी एक्सप्रेसला अहमदाबादपर्यंत नेते व त्यापुढील प्रवास डिझेल इंजिन वापरून केला जातो.

तपशील

संपादन

सयाजीनगरी एक्सप्रेसला १ प्रथमवर्गीय वातानुकुलित, २ वातानुकुलित २-टियर, ६ वातानुकुलित ३-टियर, ८ शयनयान, ३ अनारक्षित आणि २ ईओजी/सामानवाहतूक डबे असतात. प्रवाशांच्या मागणीनुसार यात किरकोळ बदल असतात.on demand.

इंजिन १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२
  EOG UR H1 A1 A2 B1 B2 B3 B4 B5 B6 S8 S7 S6 S5 S4 S3 S2 S1 UR UR EOG

वेळापत्रक

संपादन
गाडी क्रमांक मार्ग प्रस्थान आगमन कधी
१९११५ वांद्रे टर्मिनस – भुज १४:५० ०९:२५ रोज
१९११६ भुज – वांद्रे टर्मिनस २२:१५५ १४:०५ रोज

मार्ग

संपादन

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन