बारामती रेल्वे स्थानक

महाराष्ट्रातील रेल्वे स्टेशन, भारत

बारामती रेल्वे स्थानक दौंड बारामती रेल्वेमार्गावरील शेवटचे स्थानक आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात असलेले हे स्थानक फलटणमार्गे लोणंद येथे पुणे-मिरज मार्गास जोडण्यासाठी बारामती-फलटण-लोणंद या मार्गास मान्यता मिळाली. त्यापैकी लोणंद-फलटण मार्ग तयार झाला असून फलटण येथे स्थानकदेखील उभारण्यात आले आहे. परंतु बारामती-लोणंद या मार्गाच्या उभारणीचे कोणतेही काम अद्यापही सुरू झालेले नाही. बारामती रेल्वे स्थानक हे भिगवण रोड वर आहे.बारामती बस स्थानकापासून रेल्वे स्थानकापर्यंत रिक्षाची सोय आहे.

बारामती
मध्य रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता भिगवण रस्ता, बारामती, पुणे जिल्हा
गुणक 18°09′13″N 74°15′22″E / 18.1537°N 74.2560°E / 18.1537; 74.2560
समुद्रसपाटीपासूनची उंची ५५३ मी
मार्ग दौंड बारामती रेल्वेमार्ग
फलाट
मार्गिका
इतर माहिती
विद्युतीकरण नाही
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग पुणे विभाग, मध्य रेल्वे
स्थान
बारामती is located in महाराष्ट्र
बारामती
बारामती
महाराष्ट्रमधील स्थान
दौंड–बारामती रेल्वेमार्ग
0 दौंड जंक्शन
13.1 मळदगाव
20.3 शिरसाई
32.8 कटफळ
42.8 बारामती