लेखाचे पुनर्लेखन पूर्ण

संपादन

(टीप: ही चर्चा:डॉ. बाबासाहेब आंबेडकर येथील चर्चा येथे हलवण्यात आलेली आहे.)

  • जाणत्या सदस्यांना याची कल्पना असेल की, बाबासाहेब अांबेडकर हा लेख सुमारे २ वर्ष इतक्या प्रदीर्घ कालावधी (जुलै २०१८) पासून 'पूर्ण संरक्षित' आहे, म्हणजेच लेखात प्रचालकांखेरीज इतर कोणत्याही सदस्याला संपादने करता येत नाहीत. म्हणून लेखात दोन वर्षापासून काहीही संपादने झालेली नाहीत. मागील तीन वर्षाच्या उपलब्ध आकडेवारीनुसार मराठी विकिपीडियावर वर्षभरात सर्वाधिक वाचला जाणारा द्वितीय क्रमांकाचा लेख हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आहे, म्हणून यात वेळोवेळी सुधार करणेही गरजेचे वाटते.
  • मी २ महिन्यापासून सातत्याने 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या लेखाचे पुनर्लेखन करीत आहे ( सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर येथे). एप्रिल २०२० पूर्वी (जयंती माह) हा लेख मला महत्त्वाच्या माहितीसह पूर्ण करायचा होता, जो केला आहे. तथापि अद्यापही बरेच काम बाकी आहे ( सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर/१ येथे); उर्वरित कामावर मी माझा परीक्षेचा कालावधी संपल्यानंतर एक-दोन महिन्यानंतर पुनश्चः भरीवपणे योगदान देणे सुरू करीन.
  • लेखात विविध संदर्भ आहेत. मी लेखात प्रामुख्याने एका आंबेडकरचरित्रातून माहिती लिहिलेली आहे, आणि ठिकठिकाणी तसे संदर्भ सुद्धा दिले आहे. तसेच काही ठिकाणी मराठी बातम्यांतील आवश्यक मजकूर लेखात वापरलेला आहे व सोबत बातम्यांच्या लिंक्स सुद्धा जोडलेल्या आहेत. आता यावरही प्रताधिकारभंग झाला म्हणत वाद नको व्हायला.
  • @ आणि प्रसाद साळवे: कृपया आपण लेखातील शुद्धलेखनावर काम करावे. शक्यतो लेख खूप मोठा असल्याने एका-एका विभागात स्वतंत्रपणे संपादन करणे श्रेयस्कर ठरेल.
  • @Tiven2240: कृपया आपण लेखातील संदर्भ दुरुस्त करावे, तसेच अन्य तांत्रिक मदत करावी. मृत संदर्भ शोधणे, संदर्भ दुरुस्ती, साचे दुरुस्ती, माहितीचौकट साचा दुरुस्ती इत्यादी.
  • लेखाच्या नावात दोन साधारण बदल केले आहेत. पहिला बदल आडनावाचा आहे;
  • वादग्रस्त सदस्यांना या लेखात संपादने वा बदल करण्याची तूर्तास तरी परवानगी असू नये. यामुळे लेखावर चांगले काम करणे बाजूला पडून संपादनयुद्धे, वादावादी आणि निरर्थक हमरीतुमरी होणार नाही याची खात्री नसेल.
  • @अभय नातू: सर, लेखात विश्वसनीय संदर्भ जोडले आहेत आणि, महत्त्वाची व आवश्यक माहिती टाकलेली आहे. म्हणून कृपया, बाबासाहेब अांबेडकर लेखाचे पुनर्निर्देशन या पानावर करावे. इतरही मार्गदर्शनाची व सहकार्याची अपेक्षा, धन्यवाद.
  • दुवे जोडणे, संदर्भ भरणे (देणे नव्हे) अशी काही कामे करायची बाकी आहेत. --संदेश हिवाळेचर्चा ०२:३८, १० मार्च २०२० (IST)Reply

@Sandesh9822 आणि अभय नातू:, बाबासाहेब अांबेडकर हा लेख 'पूर्ण संरक्षित' आहे. यावर चर्चा सुरु आहे. असे असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा लेख नव्या शीर्षकाने प्रकाशित करून याकडे मूळ लेख वळवणे हे सर्वथा नियमबाह्य आहे असे वाटते. हे मान्य केले तर असे संरक्षित लेख अन्य प्रकारे तयार करण्याची आपण सोय उपलब्ध करून दिली असे होईल. त्यामुळे प्रचालकांनी योग्य ते मत मांडून पुढील उचित कार्यवाही करावी ही विनंती. संदेश, आपण पुनर्लेखन करण्यासाठी घेत असलेले कष्ट मी बघत असतो. तथापि समुदायाच्या चर्चेविना रीतसर प्रक्रिया टाळून अशी संपादने करू नयेत ही नम्र विनंती. परीक्षेसाठी शुभेच्छा!
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ११:३६, १० मार्च २०२० (IST)Reply

@सुबोध कुलकर्णी: शुभेच्छांसाठी धन्यवाद सर. "बाबासाहेब अांबेडकर हा लेख 'पूर्ण संरक्षित' आहे. यावर चर्चा सुरु आहे." प्रत्यक्षात हा लेख दोन वर्षापासून बंद/लॉक आहे. मी जुन्या लेखाच्या शीर्षकातील त्रुटी विषयी अभय नातूंशी पूर्वी चर्चा केलेली आहे (दुवा दिलाय) तसेच नवीन लेखाच्या शीर्षकाबाबत वरती सुद्धा स्पष्टिकरण दिलेले आहेच मात्र तरीही तुम्हास ते नियमबाह्य वाटत असेल तर क्षमस्व. परंतु माझा माफक उद्देश हाच की काम लवकर व्हावे, इतरांचाही कमी वेळ खर्च व्हावा. समुदायाच्या चर्चेविना रीतसर प्रक्रिया टाळून अशी संपादने करू नयेत यावर सहमत आहे. लेख समृद्ध करण्यासाठी आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे, धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा ११:५५, १० मार्च २०२० (IST)Reply
@Sandesh9822:आपण केलेले काम अवैध, विकीच्या नियमांच्या विरुद्ध आहे असे तुम्हास खरेच वाटत नाही का? मी अशा कृतींना समर्थन देऊ शकत नाही. सर्व भारतीय भाषांत बाबासाहेब अांबेडकर या शीर्षकाचा लेख आहे. आपले कारण चुकीचे आहे. @अभय नातू:, आपण तटस्थपणे नियमांना धरून आपले मत द्यावे. अवैधपणे तयार केलेले पान वगळावे असे माझे मत आहे. आपण योग्य ती कारवाई कराल अशी आशा आहे. मला लेख विकीच्या तत्वांना धरून विकसित करण्यात रस आहे. मजकुरावर मुद्द्यांना धरून मी अवश्य चर्चा करेन. --सुबोध कुलकर्णी (चर्चा) १२:०७, १० मार्च २०२० (IST)Reply
आपणास माझे कारण चुकीचे वाटते मग Dr. Dre, Dr. Seuss, Dr. John या व्यक्तींच्या नावातही 'डॉ.' का आहे? इंग्लिश विकिपीडिया वरील सर्वच निकष मराठी विकिपीडिया ला लागू होत नसले तरी असंख्य निकष लागू होतात म्हणून या निकषाबाबत विचार करावा. प्रत्येकदा एकांकी विचार करुन कसे चालेल? @अभय नातू: याचा निरपेक्ष न्याय व्हावा. माझे शीर्षक बदलाचे कारण चूकीचे नसून त्यास दुजोरा देणारी कारणेही आहेत. --संदेश हिवाळेचर्चा १३:०६, १० मार्च २०२० (IST)Reply
अांबेडकर चुकीचे आहे. आंबेडकर बरोबर शुद्धलेखन आहे.
लेखाचे नाव बाबासाहेब आंबेडकर असेच असावे.
डॉ. ही त्यांनी मिळविलेली पदवी आहे. ते त्यांचे नाव नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा/आणि भीमराव रामजी आंबेडकर येथून बाबासाहेब आंबेडकर येथे पुनर्निर्देशने असावी.
Dr. Dre, Dr. Seuss, इ.नी त्यांच्या नावातच (किंवा टोपणनावात) डॉ. घेतलेले आहे. गमतीचा भाग असा की हे दोघेही गृहस्थ डॉकटर नाहीत. त्यांच्याकडे ना वैद्यकीय पदवी आहे ना विद्यावाचस्पतीची पदवी.
अभय नातू (चर्चा) २३:५२, १० मार्च २०२० (IST)Reply
@अभय नातू: तुमच्या मताशी सहमती दर्शवतो. मी या लेखातील माहिती बाबासाहेब आंबेडकर या लेखात घालतो. या कामासाठी मला थोडा वेळ लागेल. त्यानंतर हे पान व इतर पाने बाबासाहेब आंबेडकर कडे पुनर्निर्देशित करतो. चालेल का? त्यानंतर आपण लेखसुधाराविषयी पुढील चर्चा करू शकतो. सर्वप्रथम माहितीचौकट साचातील त्रुटी दुरुस्त करणे अगत्याचे वाटते, व यात आपण लक्ष घालावे ही विनंती. --संदेश हिवाळेचर्चा १२:०५, ११ मार्च २०२० (IST)Reply
@सुबोध कुलकर्णी:
वरील प्रस्तावावर तुमचे मत कळवावे.
अभय नातू (चर्चा) २२:११, ११ मार्च २०२० (IST)Reply
@अभय नातू:, माझे प्रांजळ मत मी देत आहे. मुळात संरक्षित लेखाला समांतर लेख करण्याचा चुकीचा पायंडा आपण पाडू नये. आपल्या अवैध असले तरीही त्यातून मोठे नुकसान होते आहे असे दिसत नाही या विधानावर आपण पुनर्विचार करावा. आपापली मते मांडण्यासाठी असे अनेक लेख एका व्यक्तीवर तयार झाले तरी चालतील असे आपणास वाटत असेल तर तसे धोरण मांडावे. येथे हा लेख संदेश यांचा, माझा, तुमचा असे नाही, आपण व्यापक समुदायाचा भाग आहोत. विकीच्या हिताचाच नियमांना बगल न देता विचार झाला पाहिजे. संदेश यांनी धूळपाटीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखातील मजकूर हलवावा. चुकीची संपादने उलटवावीत. अन्यथा आपण प्रचालक म्हणून पुढील कृती करावी. लेखाची सुरक्षितता काढण्याचा विषय आपल्या अधिकारात आहे. ती काढल्यावर कोणीही त्यात संपादन करू शकेल. ही पुढील प्रक्रिया चर्चेतून ठरावी. यावर हे माझे अंतिम म्हणणे आहे. सर्वांच्या विवेकावर विश्वास ठेवून पुढील सर्व गोष्टी योग्य घडतील या अपेक्षेत...--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १०:५८, १२ मार्च २०२० (IST)Reply
@सुबोध कुलकर्णी: सर्वप्रथम आपण बाबासाहेब अांबेडकरबाबासाहेब आंबेडकर या लेखातला फरक समजून घ्यावा. सध्या बाबासाहेब अांबेडकर हा लेख 'पूर्ण संरक्षित' लेख आहे, यातील 'अांबेडकर' शब्द चुकीचा असल्यामुळे मी व अभय नातू बाबासाहेब आंबेडकर या शीर्षकाखाली हा लेख बनवण्यावर एकमत आहोत. बाबासाहेब आंबेडकर हा लेख बनल्यावर त्याकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरबाबासाहेब अांबेडकर यांना पुनर्निर्देशित केले जाईल. आणि समांतर लेख करण्याचा चुकीचा पायंडा हा लेख मूळ लेखाकडे पुनर्निर्देशित केल्याने 'दुरुस्त' होईलच. मग आपण बाबासाहेब अांबेडकर याच लेखावर संपादने करावे असे का सुचवत आहात? @अभय नातू: मी पुढे काय करावे? साध्या गोष्टी किचकट बनवल्या जात आहेत. अशा गोंधळाच्या स्थितीने उत्साह मावळत आहे. --संदेश हिवाळेचर्चा ११:३०, १२ मार्च २०२० (IST)Reply
चर्चा सुरळीत व्हावी म्हणून याचे उत्तर खाली देत आहे.
अभय नातू (चर्चा) ०९:००, १३ मार्च २०२० (IST)Reply

@अभय नातू, V.narsikar, आणि Rahuldeshmukh101:, वरीलप्रमाणे अवैध संपादन आपणास प्रचालक म्हणून मान्य आहे का? डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा/आणि भीमराव रामजी आंबेडकर येथून बाबासाहेब आंबेडकर येथे पुनर्निर्देशने असावी. हे ठीक आहे. पण चुकीच्या पद्धतीने तयार केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पान आपण वगळत का नाही? यामुळे वाचकांची दिशाभूल होऊ शकते. हे गंभीर आणि चिंताजनक आहे. हा चुकीचा पायंडा पडतो आहे असे आपणास खरेच वाटत नाही का? स्पष्ट लिहिल्याबद्दल राग मानू नये.--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १०:१८, ११ मार्च २०२० (IST)Reply

@सुबोध कुलकर्णी:
चर्चा एकतर्फी न होता इतरही सदस्यांना उत्तर देण्याचा वेळ दिला आहे. असे संपादन जरी अवैध असले तरीही त्यातून मोठे नुकसान होते आहे असे दिसत नाही. जर तुम्हाला वाटत असल्यास ते कसे हे दाखवावे.
सदस्य संदेश यांनी माझा संदेश वाचून प्रतिक्रिया नोंदवल्यावर पुढे काय करावे ते ठरवले जाईल.
तोपर्यंत तुम्ही धीर धरावा ही विनंती.
अभय नातू (चर्चा) ११:०५, ११ मार्च २०२० (IST)Reply
  • विनाकारण लेख चर्चेत अडकवून लेख विस्तारला जाऊ नये. आंबेडकरांवर लेखन होऊच नये असा मानस कुलकर्णी व खोले घेत आहेत. कुलकर्णी यांचा रोख तर वगळून वगळून 10% केलेला लेख आहे तेव्हढा ही डिलीट केला जावा. असे प्रयत्न आहेत.

स्वतः ही विस्तार करायचा नाही आणि विस्तार ही करू द्यायचा नाही.

असो विकिपीडियावर मनमानी व मनुवादी विचार असलेल्या व्यक्तींकडून अपेक्षाच काय केली जाऊ शकते.. याच सातत्याच्या अनुभावातून एकेकाळी टॉप टेन मध्ये असलेला माझ्यासारखा संपादन विकिपीडिया पासून दूर गेलेला आहे.

खरे तर मराठी विकिपीडियाच बंद व्हावा. इतकी उदविग्नता आलेली आहे. प्रसाद साळवे (चर्चा) १५:२९, १२ मार्च २०२० (IST)Reply

उत्तर

संपादन

आता माझे प्रांजळ मत.

@सुबोध कुलकर्णी:

कठोर वस्तुनिष्ठेने पाहिले असता एकाच व्यक्तीवर दोन लेख असू नयेत हे बरोबर आहे. परंतु अनेक महिने रखडलेला, महत्वपूर्ण असलेला लेख सुधारण्यासाठी कोणी धडपड केली असता आपण ते काम घालवून देऊ नये आणि ते काम कसे अंतर्भूत करावे ही भूमिका प्रचालकांनी (आणि इतर अनेक सपादकांनी) ठेवली नसती तर आज मराठी विकिपीडियावर ५६,००० ऐवजी ५६ (कदाचित ५००) लेख असते.

- अवैध असले तरीही त्यातून मोठे नुकसान होते आहे असे दिसत नाही या विधानावर आपण पुनर्विचार करावा.

हे मी पूर्ण विचार करुनच हे लिहिलेले होते.

  1. येथील संपादक एकमेकांशी संवाद साधून एकमेकांच्या कामात खोडे न घालता किंवा हे चुकीचे आहे उलटवून लावा असे न म्हणता सामंजस्याने मार्ग काढतील असे वाटले होते.
  2. मराठी विकिपीडियावर एकमेकांस शिव्याशाप, अपमान आणि तत्सम गोष्टी तुमच्या समक्षच झालेल्या आहेत. त्यापेक्षा ही परिस्थिती १०० पट चांगली आहे.

पहिली गोष्ट झाली नाही आणि दुसरी निर्विवाद आहे हे तुम्हीही मान्य करालच. #२मध्ये उल्लेखिलेल्या वेळी सुद्धा तुम्ही हस्तक्षेप केला असतात तर अर्थात चांगलेच झाले असते परंतु झाले ते गेले. प्रस्तुत विषायत येथे केलेले काम घालविण्याच्या ऐवजी तुम्ही वेगवेगळे मार्ग सुचविले असते आणि मध्यम मार्ग शोधला असतात तर बरे झाले असते. असो, हे ही झाले (नाही) ते गेले.

@Sandesh9822:,

मला वाटते की वायफळ चर्चा वाढविण्याऐवजी सुबोध कुलकर्णी यांनी सुचविल्याप्रमाणे मजकूर परत धूळपाटीवर हलवावा. त्यानंतर लेखावर इतर संपादकांकडून मत मागावे वर संमती मिळाल्यावर (किंवा ५ दिवस प्रतिक्रिया न आल्यास) प्रचालकांना संदेश द्यावा म्हणजे ते तितका मजकूर मूळ लेखात हलवतील.

मूळ लेखाची सुरक्षापातळी कमी करावी कि नाही हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे आणि तो येथे आणून चर्चा अधिक गढूळ करु नये ही विनंती. एकदा लेख अद्ययावत झाला की मग त्या विषयाला हात घालूयात.

वर म्हणल्याप्रमाणे हे माझे प्रांजळ आणि पूर्णतः निष्पक्ष मत आहे राग मानू नये.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) ०९:००, १३ मार्च २०२० (IST)Reply

@अभय नातू: ठीक आहे. माझ्यासाठी हे त्रासदायक ठरणार असले तरीही एकदा(च) करुया हे. तुम्ही सुचविल्याप्रमाणे संपूर्ण मजकूर या लेखातून काढला आहे आणि आता केवळ धूळपाटीवर तो मजकूर उपलब्ध आहे. चर्चा:बाबासाहेब अांबेडकर येथे चर्चा होईल, मात्र चर्चा यशस्वी झाल्यानंतर धूळपाटीवरील माहिती बाबासाहेब आंबेडकर (बाबासाहेब अांबेडकर नव्हे) या लेखात माहिती घातली जाईल. व ही माहिती मला हलवू द्यावी. जर या लेखात सुधारित माहिती घातली गेली तर त्याला 'पूर्ण संरक्षित' ठेवण्याची गरज पडणार नाही. मूळ चर्चापानावर निरर्थक वादावादी आणि निरर्थक हमरीतुमरी सारख्या वायफळ चर्चा होणार नाही ही अपेक्षाच करु शकतो. --संदेश हिवाळेचर्चा २२:३६, १३ मार्च २०२० (IST)Reply

@अभय नातू: अवैध कृती मान्य करून ('एकाच व्यक्तीवर दोन लेख असू नयेत हे बरोबर आहे'), नियमांना बांधील राहून ती संपादने उलटविण्याचा योग्य निर्णय प्रचालक म्हणून दिल्याबद्दल धन्यवाद. संदेश यांनाही धन्यवाद. हे वेळीच झाले असते तर चर्चा भरकटली नसती. शिवाय नाहक आपण केलेली विधाने - तुम्ही हस्तक्षेप केला असतात तर अर्थात चांगलेच झाले असते परंतु झाले ते गेले. प्रस्तुत विषायत येथे केलेले काम घालविण्याच्या ऐवजी तुम्ही वेगवेगळे मार्ग सुचविले असते आणि मध्यम मार्ग शोधला असतात तर बरे झाले असते. - करण्याचे काही कारण नाही. तसेच अन्य एका सदस्याने केलेल्या व्यक्तिगत हल्ल्यावर आपण काहीच लिहिले नाही. मी वैध प्रक्रियेचा आग्रह धरला म्हणून मीच अडचणीत आलो असे वाटायला लागले आहे. मलाही हा लेख विकी नियमानुसार करण्यात रस आहे हे मी वेळोवेळी लिहिले आहे.
@अभय नातू आणि Sandesh9822:, इतर प्रचालक व सदस्यांचे मत घेण्याची प्रक्रिया कशी असणार ते ठरवावे. लेख संरक्षित राहणार असेल तर प्रचालकांनीच ही माहिती हलवावी लागेल. एकदम सर्व मजकुरावर मत देण्यासाठी पुरेसा अवधी द्यायला हवा असे माझे मत आहे. त्याऐवजी एकेका विभागावर विचार करून तो मजकूर हलवावा. यासाठी प्राधान्याने आपण आणू इच्छिता ते निश्चित करावेत. तो मजकूर अजूनही संरक्षित म्हणजेच काही काळासाठी कायमचा तेथे न बदलण्याजोगा राहणार असेल तर विशेष काळजी घ्यावी लागेल. किमान दहा दिवसांचा वेळ न्याय्य आहे असे वाटते, सर्वांना साद दिल्यानंतर. पुढील वेळ प्रत्यक्ष मजकूर संपादित करण्यासाठी कारणी लागावा या अपेक्षेसह,- सुबोध कुलकर्णी (चर्चा) १२:२५, १४ मार्च २०२० (IST)Reply

@अभय नातू: As decided before Sandesh has made an new improved article with sources on his sandbox. Let's all together have a discussion on that talk page to improve that work. Once the sandbox article is completed we shall move it to main article and keep it semi protected and open for public edit.Hope this helps, Regards --Tiven2240 (चर्चा) १२:४२, १४ मार्च २०२० (IST)Reply
  • सदस्य खोले यांनी हा सुधारणेच्या नावाखाली अतीशय मेहनतीने तयार केलेला व विकिपीडिया वरील पुरस्कार या लेखानंतर सर्वात मोठा द्वितीय लेख काटछाट करून मूळ लेखाच्या फक्त 10% ठेवला. व तेथूनच वाद उत्पन्न झाला व प्रचालकांनी तो लेख संपादनासाठी लॉक करून टाकला. खरं तर बाबासाहेब आंबेडकर लेखाचं खूप मोठे नुकसान व त्यावर घेतलेली मेहनत वाया गेली. वरून हा लेख तेच पुन्हा लिहिणार असेही त्यावेळी ते म्हटले होते. पण पुढे काय झाले..? काहीच नाही.

खरे तर प्रचालकांनी खोले सदस्यांनी जेथे हा वाद सुरू केला अर्थात जी संपादने वगळली त्या टप्प्यावर हा लेख पुन्हा सर्वद्वितीय मोठा लेख या टप्यावर आणून त्यावर सुधिरणा सुचवावी. म्हणजे सर्व objections व वाद बाजूला पडतील. पण अशी शक्यता आता धूसर आहे. प्रचालक असे करतील काय ? तरच खरा न्याय होईल.. व सदर सदस्याला पाठिशी घातले असा संदेश यातून जाणार नाही. प्रसाद साळवे (चर्चा) १६:५१, १७ मार्च २०२० (IST)Reply

पुनर्लेखन

संपादन

@अभय नातू: मी धूळपाटीवर बाबासाहेबांच्या लेखाचे पुनर्लेखन केले आहे. मी ते बाबासाहेब आंबेडकर या लेखात घालू इच्छितो, यासाठी परवानगी द्यावी. त्यानंतर आपण हा लेख 'बाबासाहेब आंबेडकर' कडे पुनर्निर्देशित करावा (विनंती). चर्चा:डॉ. बाबासाहेब आंबेडकर वरील चर्चा इतरत्र भरकटत जात आहे, आणि मला त्या वादात मुळीच पडण्याची इच्छा नाही. आपणच हा गोंधळ टाळून मध्यममार्ग काढू शकता व लेख निर्मितीचा मार्ग सुकर करु शकता. --संदेश हिवाळेचर्चा १८:०५, १२ मार्च २०२० (IST)Reply

शीर्षक "बाबासाहेब आंबेडकर" (बाबासाहेब अांबेडकर ऐवजी) असेच असावे. "डॉ. बाबासाहेब आंबेडकर" किंवा/आणि "भीमराव रामजी आंबेडकर" येथून "बाबासाहेब आंबेडकर" येथे पुनर्निर्देशने असावी. असे आपण म्हणाला आहात, यानुसार मी आज पुढील कृती करीत आहे. त्यानंतर आपण बाबासाहेब अांबेडकर चे बाबासाहेब आंबेडकर येथे पुनर्निर्देशन करावे, ही विनंती. --संदेश हिवाळेचर्चा ०८:५५, १३ मार्च २०२० (IST)Reply


  • जाणत्या सदस्यांना याची कल्पना असेल की, बाबासाहेब अांबेडकर हा लेख सुमारे २ वर्ष इतक्या प्रदीर्घ कालावधी (जुलै २०१८) पासून 'पूर्ण संरक्षित' आहे, म्हणजेच लेखात प्रचालकांखेरीज इतर कोणत्याही सदस्याला संपादने करता येत नाहीत. म्हणून लेखात दोन वर्षापासून काहीही संपादने झालेली नाहीत. मागील तीन वर्षाच्या उपलब्ध आकडेवारीनुसार मराठी विकिपीडियावर वर्षभरात सर्वाधिक वाचला जाणारा द्वितीय क्रमांकाचा लेख हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आहे, म्हणून यात वेळोवेळी सुधार करणेही गरजेचे वाटते.
  • मी २ महिन्यापासून सातत्याने 'बाबासाहेब आंबेडकर' या लेखाचे पुनर्लेखन करीत आहे ( सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर येथे). एप्रिल २०२० पूर्वी (जयंती माह) हा लेख मला महत्त्वाच्या माहितीसह पूर्ण करायचा होता, जो केला आहे. तथापि अद्यापही बरेच काम बाकी आहे ( सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर/१ येथे); उर्वरित कामावर मी माझा परीक्षेचा कालावधी संपल्यानंतर एक-दोन महिन्यानंतर पुनश्चः भरीवपणे योगदान देणे सुरू करीन.
  • लेखात विविध संदर्भ आहेत. मी लेखात प्रामुख्याने एका आंबेडकरचरित्रातून माहिती लिहिलेली आहे, आणि ठिकठिकाणी तसे संदर्भ सुद्धा दिले आहे. तसेच काही ठिकाणी मराठी बातम्यांतील आवश्यक मजकूर लेखात वापरलेला आहे व सोबत बातम्यांच्या लिंक्स सुद्धा जोडलेल्या आहेत. आता यावरही प्रताधिकारभंग झाला म्हणत वाद नको व्हायला.
  • लेखाच्या नावात एक साधारण बदल होणार आहे. लेख शीर्षकातील शब्द "अांबेडकर" वरुन "आंबेडकर" केला जाईल ( अ+ा+ं ऐवजी आ+ं वर्ण). याबाबत सविस्तर माहिती येथे पहावी – सदस्य चर्चा:अभय नातू/जुनी चर्चा ३३#लेखाची संरक्षित पातळी रद्द करणे बाबत
  • सदस्यांनी चर्चेत वादग्रस्त विधाने करु नयेत. यामुळे लेखावर चांगले काम करणे बाजूला पडून वादावादी आणि निरर्थक हमरीतुमरी हेच होण्याची शक्यता असेल.
  • @अभय नातू: सर, लेखात विश्वसनीय संदर्भ जोडलेले आहेत आणि, महत्त्वाची व आवश्यक माहिती टाकलेली आहे. चर्चेच्या पाच दिवसानंतर (१८ मार्च २०२०) रोजी आपण अंतिम निर्णय घ्यावा. चर्चा सफल झाल्यानंतर मी बाबासाहेब आंबेडकर लेखात धूळपाटीवरील माहिती हलवेन. त्यानंतर कृपया आपण बाबासाहेब अांबेडकर लेखाचे पुनर्निर्देशन बाबासाहेब आंबेडकर या पानावर करावे. आणि इतरही मार्गदर्शन व सहकार्य करावे.
  • धूळपाटीवरील मजकूरात दुवे जोडणे, संदर्भ भरणे (संदर्भ जोडणे नव्हे), माहितीचौकट दुरुस्ती अशी काही कामे करायची बाकी आहेत.
  • @सुबोध कुलकर्णी: आपण इतर सदस्यांचे मत घ्यावे.
  • येथे चर्चा करण्यापूर्वी या चर्चेचा पूर्वभाग चर्चा:डॉ. बाबासाहेब आंबेडकर येथे जरूर पाहून घ्यावा. --संदेश हिवाळेचर्चा २३:०२, १३ मार्च २०२० (IST)Reply
@Sandesh9822:, आपण नियमांनुसार रीतसर प्रक्रिया सुरु करावी. इतरांचे मत घेणे हे माझे काम/जबाबदारी नाही. आपण सारेच येथे स्वयंसेवक व सहकारी आहोत. एकमेकांचा आदर राखून काम पुढे नेऊया. वर अभय नातू यांना उद्देशून केलेल्या सूचना - 'लेखात विश्वसनीय संदर्भ जोडलेले आहेत आणि, महत्त्वाची व आवश्यक माहिती टाकलेली आहे. चर्चेच्या पाच दिवसानंतर (१८ मार्च २०२०) रोजी आपण अंतिम निर्णय घ्यावा. चर्चा सफल झाल्यानंतर मी बाबासाहेब आंबेडकर लेखात धूळपाटीवरील माहिती हलवेन. त्यानंतर कृपया आपण बाबासाहेब अांबेडकर लेखाचे पुनर्निर्देशन बाबासाहेब आंबेडकर या पानावर करावे.' - एकतर्फी वाटतात. लेख संरक्षित असल्याने प्रचालक वैध ती प्रक्रिया झाल्यावर पान संपादित करतील. सर्व काही सद्हेतूने होईल यावर विश्वास ठेवावा ही विनंती.--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १२:३६, १४ मार्च २०२० (IST)Reply
एखाद्या कैद्याल्या निर्दोष घोषित केल्यानंतरही आपण त्याला तुरुगांतच डांबून ठेवण्याचे समर्थन करणार का? मी धूळपाटीवर लेख पुनर्लेखन केलाय, त्यामुळे मी कामे मते मांडली. तुम्ही त्याला एकतर्फी म्हणत असाल तरी तीच मला योग्य वाटतात. आणि कृपया याचा निर्णय प्रचालकांनाच घेऊ द्या. पुढे प्रचालकांच्या निर्णयांत अतिहस्तक्षेप टाळावा. चर्चेसाठी प्रचालक ५ दिवस म्हणाले, तुम्ही १० दिवस म्हणालात आणि तिसरा एखादा सदस्य २०/३० दिवस म्हणेल, तेव्हा तुम्ही त्याचे समर्थन करणार नाही ही अपेक्षा. मला एप्रिल पूर्वी लेखाचे काम पूर्ण करायचे आहे. जर चर्चेचा कालावधी अमर्याद वाढला किंवा वाढवला गेला तर योग्य असणार नाही.
मराठी विकि समुदायातील स्वयंसेवक व सहकारी एकमेकांचा आदर राखून लेखाबाबत सुबुद्धीने काम करतील ही अपेक्षा.
@अभय नातू: चर्चेवर आपले नियंत्रण असावे. नाहितर चर्चा इतरत्र भरकटत जाऊन माझ्यासह सर्वांचाच नाहक वेळ खर्च होईल.
@Tiven2240: कृपया सक्रीय सदस्यांना साद द्यावी, त्यांना चर्चेसाठी आमंत्रित करणे आहे.
--संदेश हिवाळेचर्चा १४:१६, १४ मार्च २०२० (IST)Reply

@Bhargavibhagat, Dharmadhyaksha, Dr.sachin23, आणि Madhulika123:@Manasviraut, Minakshimane, Natkuk27, आणि Nikita3083:@Radha.shende, Roshniabnave, Sanchitamane, आणि Sonal90:@Stt65, Vikrantkorde, अमित म्हाडेश्वर, आणि अरविंद धरेप्पा बगले:@आर्या जोशी, कल्याणी कोतकर, V.narsikar, आणि प्रसाद साळवे: कृपया आपले मत द्यावे --Tiven2240 (चर्चा) १४:५३, १४ मार्च २०२० (IST)Reply

आपल्या सर्वांना येथे एका महत्त्वाच्या चर्चेसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. ही चर्चा सर्व सदस्यांसाठी आहे. मजकूरांतील काही त्रुटीमुळे हा लेख दोन वर्षापासून 'संपूर्ण संरक्षित' आहे. त्यामुळे मी धूळपाटीवर (येथे) या लेखाचे पुनर्लेखन लेखन केले आहे, यामध्ये विविध विश्वसनीय संदर्भांसह आवश्यक मजकूराची भर घालून लेख समृद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. संदर्भहीन मजकूर लेखात ठेवलेला नाही. आपण सर्वांनी धूळपाटीवरील लेख वाचून, तपासून तेथील मजकूर बाबासाहेबांच्या मुख्य लेखात हलवण्यासंबंधी आपली मते द्यावी. २४ मार्च रोजी चर्चा समाप्त केली जाईल प्रचालक अभय नातू अंतिम निर्णय घेतील. धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा १५:२९, १४ मार्च २०२० (IST)Reply

शिर्षकाचे पुनर्निर्देशन व्हायला हवे.चेतनहिरे (चर्चा) १६:३९, १४ मार्च २०२० (IST)Reply

सदस्य खोले यांनी हा सुधारणेच्या नावाखाली अतीशय मेहनतीने तयार केलेला व विकिपीडिया वरील पुरस्कार या लेखानंतर सर्वात मोठा द्वितीय लेख काटछाट करून मूळ लेखाच्या फक्त 10% ठेवला. व तेथूनच वाद उत्पन्न झाला व प्रचालकांनी तो लेख संपादनासाठी लॉक करून टाकला. खरं तर बाबासाहेब आंबेडकर लेखाचं खूप मोठे नुकसान व त्यावर घेतलेली मेहनत वाया गेली. वरून हा लेख तेच पुन्हा लिहिणार असेही त्यावेळी ते म्हटले होते. पण पुढे काय झाले..? काहीच नाही. खरे तर प्रचालकांनी खोले सदस्यांनी जेथे हा वाद सुरू केला अर्थात जी संपादने वगळली त्या टप्प्यावर हा लेख पुन्हा सर्वद्वितीय मोठा लेख या टप्यावर आणून त्यावर सुधिरणा सुचवावी. म्हणजे सर्व objections व वाद बाजूला पडतील. पण अशी शक्यता आता धूसर आहे. प्रचालक असे करतील काय ? तरच खरा न्याय होईल.. व सदर सदस्याला पाठिशी घातले असा संदेश यातून जाणार नाही. प्रसाद साळवे (चर्चा) १६:५१, १७ मार्च २०२० (IST)Reply

@प्रसाद साळवे: कृपया आपण धूळपाटीवरील मजकूराबद्दलच थोडक्यात मत व्यक्त करावे. वादगस्त मते बाजूला सारुन मध्यम मार्ग स्वीकारणे सर्वांसाठी श्रेयस्कर ठरेल, धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा १७:०१, २० मार्च २०२० (IST)Reply

@अभय नातू: बाबासाहेब आंबेडकर या लेखाचे हे अधिकृत चर्चा पान असल्याने इतिहास योग्य जागी नोंदविण्याच्या दृष्टीने चर्चा:डॉ. बाबासाहेब आंबेडकर येथील चर्चा या ठिकाणी हलवायला हवी असे वाटते. नाहक वाद व आरोप नको म्हणून मी हे केलेले नाही. आपण प्रचालक म्हणून यासाठी योग्य ती कार्यवाही करावी ही विनंती. आपण सुचविल्याप्रमाणे धूळपाटीवरील मजकूर विकी नियमांप्रमाणे तपासून मूळ लेखात आणण्यासाठी काय प्रक्रिया असेल त्यावर आपण स्पष्ट मत द्यावे. एकदम सर्व मजकुरावर सर्व सदस्यांनी ठराविक अवधीत मत देणे व्यवहार्य वाटत नाही. आपणही प्रचालक या नात्याने मजकूर हलविण्यापूर्वी तो तपासणे अपेक्षित आहेच. एक वेगळे पान करून तेथे एकेक विभाग चर्चेसाठी घ्यावा. आपण प्रक्रिया ठरवावी. उदा. प्रस्तावनेवरील माझे मत -

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (१४ एप्रिल १८९१ – ६ डिसेंबर १९५६), डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाने ओळखले जाणारे लोकप्रिय, हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरूद्ध होणारा सामाजिक भेदभाव रोखण्यासाठी नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक आणि प्रजासत्ताक भारताचे पिता होते.[] भारतात आणि इतरत्र बहुतेक वेळा त्यांना 'बाबासाहेब' म्हणतात, ज्याचा मराठीत अर्थ "आदरणीय पिता" असा होय.

कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात डॉक्टरेट पदव्या मिळवणारे आंबेडकर हे प्रतिभाशाली विद्यार्थी होते; आंबेडकर यांनी पदव्या मिळविल्या. तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवरील संशोधन केले. संशोधनासाठी अभ्यासक किंवा विद्वान म्हणून नावलौकिक मिळविला. त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत, ते एक अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यानंतर त्यांचे जीवन सामाजिक व राजकीय घडामोडींत व्यतित झाले; ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचार व चर्चांमध्ये सामील झाले, वृत्तपत्रे प्रकाशित केली, दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान दिले.

१९५० च्या दशकात बौद्ध भिक्खुंनी त्यांना 'बोधिसत्व' उपाधी प्रदान केली. इ.स. १९५६ मध्ये त्यांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. धर्मांतरानंतर काही महिन्यांनी त्यांचे निधन झाले. इ.स. १९९० मध्ये, त्यांना मरणोत्तर 'भारतरत्‍न' हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात केला. त्यांचा जन्मदिवस दरवर्षी आंबेडकर जयंती म्हणून भारतासह जगभरात साजरा केला जातो.[] इ.स. २०१२ मध्ये, "द ग्रेटेस्ट इंडियन" नावाच्या सर्वेक्षणात आंबेडकरांची 'सर्वश्रेष्ठ भारतीय' म्हणून निवड करण्यात आली आहे. आंबेडकरांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके आणि चित्रणे लोकप्रिय संस्कृतीत केली गेली आहेत उभी राहिली आहेत.

टीप - वरील परिच्छेदातील विशेषणे, अविश्वकोशीय वर्णने, विश्वसनीय संदर्भ नसलेले विधान (बोधिसत्त्व उपाधीबाबत) इ. हटविले आहे. दिलेला संदर्भ उपलब्ध नाही. @अभय नातू:, आपण हा उदाहरण म्हणून दिलेला सुधारित मजकूर बघून आपले मत द्यावे. व पुढील प्रक्रिया कशी असेल याचा निर्णय द्यावा. चर्चेत व्यक्तिगत हल्ला करणाऱ्या, मनुवादी किंवा तत्सम विशेषणे वापरून अपमान करण्याऱ्या सदस्यांना वेळीच समज देण्यात यावी. निष्पक्ष व विधायक चर्चेच्या अपेक्षेत,--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १२:२५, २२ मार्च २०२० (IST)Reply

@सुबोध कुलकर्णी: एकदम सर्व मजकुरावर सर्व सदस्यांनी ठराविक अवधीत मत देणे व्यवहार्य वाटत नाही. या आपल्या मतावर माझा तीव्र आक्षेप आहे. प्रचालकांनी चर्चेसाठी ५ दिवसांचा अवधी द्यावा म्हटल्यावर आपण १० दिवस अवधी मागितला. मी केवळ वाद होऊ नये म्हणून इच्छा नसतानाही तुमच्या मतावर सहमत झालो. आणि परत तुम्ही अवधी वाढवणार नाही हेही मी सूचित केले होते. आता तुम्ही सरळ १२ महिन्यांचाच भरपूर वेळ वाढवून घ्यावा व एप्रिल २०२१ नंतर पुढे पुन्हा एक-एक वर्ष कालावधी वाढवत रहावा. बाबासाहेब आंबेडकर लेख सुधाराविषयी तुमचा हेतू अनुकूल दिसत नाही. कारण कुणाला आक्षेप नसतानाही तुम्ही पुष्कळ वेळेची मागणी करत आहात. विकिपीडियामध्ये सर्व सदस्य समान आहेत, मग तुमच्या मताला वेगळे मूल्य व माझ्या मताला वेगळे मूल्य असे समजण्याचे कारण नाही. तुमचे मत योग्यच व माझेच मत योग्य किंवा अयोग्य असाही ग्रह बाळगू नये. तुम्ही प्रांजळ मते मांडली व तुम्ही वादविदाची भाषा केली नाही हा तुमचा गैरसमज आहे; तुमची मते आग्रही, टोकाची व वादविवादाची राहिली. यामुळे पुढे तुमच्या अनुचित मागण्या मान्य करण्यास मी असमर्थच नव्हे तर त्यांचा विरोधी आहे.
@अभय नातू: आता इथे सर्व गोष्टी सुबोध कुलकर्णी यांच्याच मता-मनाप्रमाणे होणार असतील तर माझे धूळपाटीवरील काम फुकट वाया जाणार हे निश्चित. तसेच त्यांनी चर्चा:डॉ. बाबासाहेब आंबेडकर येथे प्रचालकांच्याही (तुमच्या) मतांना सुद्धा आव्हान दिलेच आहे. कुलकर्णी स्वतः या लेखाच्या सुधारासाठी काहीही करणार नाही, व मलाही करु देणार नाहीत पण तो अडकून कसा ठेवता येईल व या लेखाला अजून कसे वादगस्त ठरवता येईल याचा ते पुरेपुर प्रयत्न करताना दिसत आहेत. मी केवळ निरर्थक वादावादी टाळण्यासाठी व सर्वांच्या सहकार्याने लेखाचे पुनर्लेखन व्हावे म्हणून 'मध्यम मार्ग' स्वीकारला होता, मात्र इथे आम्हीच खरे म्हणून आमचेच ऐकून घेतले जातेय असा समज रुढ झालाय. चर्चेसाठी दिलेल्या १० दिवस अवधीचे आता केवळ २ दिवसच शिल्लक राहिले असताना कुलकर्णी यांनी पुन्हा ही अवधी वाढवण्याची मागणी करणे सर्वथा चूक आहे. आता या शेवटच्या एक-दोन दिवसातच येथे मोठे चर्चासत्र घडून येईल व दिलेल्या वेळेत पूर्ण करण्याचे लेखाचे काम जाणीवपूर्वक अडवले जाईल, अशीच शक्यता मला वाटत आहे. सुबोध कुलकर्णी यांच्या अनावश्यक व आग्रही मतांपुढे आता जर माझ्या किंवा तुमच्या मतांना किंमत राहणार नसेल तर मी धूळपाटीवर दोन महिने टाईमपास केला असे मानून हा विषय सोडून देणे मला भाग पडेल (आणि...तर असे होईलही). हा लेख माझा, तुमचा किंवा सुबोध कुलकर्णी यांचा वैयक्तिक नसला तरी या लेखावर (धूळपाटीवर) मी मेहनत घेतली हे खरे आहे. मात्र कुलकर्णी हे सतत वेगवेगळे आग्रही मागण्या करुन लेखाचे काम कायमस्वरुपीचे लांबणीवर टाकत आहेत. ते स्वतः लेखाचे पुनर्लेखन करणार नाहीत, तसेच त्यांनी पूर्वीही असे प्रयत्न केले नाही पण काहीनाकाही कारणं सांगत ते सर्वांचाच वेळ खर्च करत आहेत. प्रत्येकदा सुबोध कुलकर्णी यांचा 'अनुचित हस्तक्षेप' मला मान्य नाही. आपण तिघांनी चर्चांत ठरवल्याप्रमाणे २४ तारखेनंतर 'बाबासाहेब आंबेडकर' तयार होणे न्याय्य आहे. --संदेश हिवाळेचर्चा १५:३५, २२ मार्च २०२० (IST)Reply

२४ मार्च, २०२०

संपादन

@Sandesh9822, Tiven2240, सुबोध कुलकर्णी, आणि चेतनहिरे:

दोन्हीकडील पक्षकारांना विरोधी पक्षाचेच खरे होत आहे असेच सातत्याने वाटल्यास कोर्टाने समजावे की या खटल्यात तारीख पे तारीख, तारीख पे तारीख पडत राहणार. -- निनावी निवृत्त न्यायाधीश
वरील विधान तापलेल्या चर्चेत थोडीशी गार हवा येण्यासाठी केलेले आहे. प्रचालक हे काही न्यायधीश नाहीत तर मध्यस्थ असतात. विधान पसंत न पडल्यास सोडून द्यावे, त्यावरुन काथ्याकूट करू नये. धन्यवाद.
सर्वप्रथम - जगात इतरत्र काय चालले आहे यापुढे आपले वाद किती क्षुल्लक आहेत याची आपण (सगळ्यांनीच) एकदा स्वतःस आठवण करुन देऊन पुढील पावले उचलावी ही विनंती.
येथे दोन वरवर विरोधी वाटणारी तत्त्वे आलेली आहेत - १. लेखात टाकोटाक बदल करुन लेखात भर पडावी, २. लेखातील बदल करण्यास घाई न करता ते पडताळून घेउन मगच बदल करावे.
दोन्ही मुद्द्यांमागे इतिहास आहे आणि तथ्यही आहे. यांत पुन्हा एकदा पडत नाही. दोन्हीतील मथितार्थ आहे की लेखात बदल व्हावे.
याशिवाय कुलकर्णी यांनी बदल करण्यामागची प्रक्रिया स्पष्ट करण्यास सांगितले आहे. माझ्यामते -
एकदम सगळा लेख पडताळलेला गेला दिसत नाही.
१. पडताळणी केलेले तसेच वादग्रस्त नसलेले बदल लगेचच करावे. अशा विभागांची आणि उताऱ्यांची यादी चर्चा पानावर करावी
२. ही यादी मजकूर लिहिणाऱ्याने सुचवू नयेत तर इतरांनी सुचवावेत.
३. वादग्रस्त किंवा शंका असलेले उताऱ्यांची यादी वेगळी करावी. प्रत्येक उताऱ्यामागे वादग्रस्त का ठरू शकतात हे लिहावे.
३.१ सगळे पुनर्लेखन वादग्रस्त आहे असे सरसकट विधान केल्यास त्यामागे आळशीपणा किंवा आडमुठेपणा आहे अशी भावना निर्माण होईल, तरी या प्रकारची विधाने करू नयेत.
४. यासाठी आपण दहा दिवस थांबलो आहोत तसेच अधिक तीन (३) दिवस ही यादी करण्यास थांबावे.
५. यानंतर वादग्रस्त नसलेले उतारे लगेचच मूळ लेखात हलवावेत. लेखाची सुरक्षितता पातळी अद्याप बदलू नये.
६. वादग्रस्त यादीतील प्रत्येक उताऱ्याला १-२ दिवसांची चर्चा द्यावी. यासाठी टप्पे ठरवावे लागले तरी चालतील. सतत १०-१५ दिवस चर्चा करणे इष्ट नाही व सद्यपरिस्थितीत ते शक्य असेलच असेही नाही.
७. अशा प्रत्येक उताऱ्यात बदल करुन किंवा शंकासमाधान करुन हे उतारे मूळ लेखात हलवावे.
यात अजून तीन दिवस जात आहेत असे वाटणे साहजिक आहे परंतु बाबासाहेब आंबेडकरांवरचा लेख (हिवाळे यांनी लक्षात आणून दिल्याप्रमाणे) मराठी विकिपीडियावरील सर्वाधिक वाचला जाणाऱ्या लेखांपैकी एक आहे. त्यासाठी थोडा अधिक धीर धरणे रास्तच वाटते.
आशा आहे आपण हे नियम धरुन पुढील कार्यवाही लगेचच सुरू करू.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) ०५:१७, २५ मार्च २०२० (IST)Reply


@अभय नातू: आपण १० दिवस थांबलो, पण या काळात केवळ सुबोध कुलकर्णी यांनीच प्रस्तावनेतील दुरुस्ती सुचवली (ज्यानुसार मी काल धूळपाटीवर बदल केले). इतर सदस्य यात सहभागी झाले नाही. लेखात टाकोटाक बदल करुन लेखात भर पडावी या मताचा मी नाहीच पण लेखातील मजकूर पडताळण्यासाठी 'अमर्याद वेळ' घेणेही मला पटत नाही. त्यामुळे कृपया आपण शक्य तितक्या कमी कालावधीत हे पडताळणीचे काम कसे पूर्ण करता येईल याकडे लक्ष द्यावे. त्यासाठी सदस्यांना त्यांची कामे वाटून द्यावी व विशिष्ट कालावधीत ती कामे पूर्ण करुन घ्यावीत. जर लेख पडताळणीसाठी सदस्य पुढे येणार नसतील किंवा आले नाहीत तर त्याचेही नियोजन आत्ताच करुन घ्यावे. नाहितर आपले अनेक दिवस निष्फळ खर्च होईल. --संदेश हिवाळेचर्चा १०:२८, २५ मार्च २०२० (IST)Reply

@अभय नातू: आपण तीन (३) दिवस यादीसाठी थांबलोय. कृपया पुढील निर्णय घ्यावा. --संदेश हिवाळेचर्चा १४:४९, २८ मार्च २०२० (IST)Reply

@अभय नातू: आपण लेख/विभाग पडताळ्यासाठी तारखांवर तारखा दिल्या मात्र त्यातून काहीही फायदा झालेला नाही. धूळपाटीवरील मजकूरावर कुणालाही आक्षेप नाही. लेखात फार फार तर शब्दांच्या/वाक्यांच्या रचना बदलणे एवढेच काम पडताळीनंतर होणार होते. त्यामुळे यावर अजून वेळ न दडवता धूळपाटीवरील मजकूर मुख्य लेखात हलवावा ही आग्रहाची विनंती. त्यानंतर सदस्य ज व Tiven2240 यांच्या मदतीने लेखात शुद्धलेखन व तांत्रिक दुरुस्ती करता येऊ शकते. इतर सदस्यांवर पडताळणी वगैरेंच्या कामासाठी अवलंबून राहावे लागले तर आताही आपला केवळ वेळच फुकट वाया जावू शकतो, म्हणून पुढील कृती करावी (विनंती).

@Tiven2240: यांनी धूळपाटीवरील मजकूर मुख्य लेखात हलवून लेखाची सुरक्षा पातळी कमी (अर्धसुरक्षित) करण्याविषयी मत नोंदवले आहेच. माझेही हेच मत आहे. तसेच @चेतनहिरे: यांना सुद्धा असेच म्हणायचे आहे. कृपया यांच्या मतांचाही विचार व्हावा. धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा ०९:४२, २९ मार्च २०२० (IST)Reply

हे काम करीत आहे. अधीर होऊ नये.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) ०९:५६, २९ मार्च २०२० (IST)Reply
@अभय नातू: व्यक्तिगत अडचणींमुळे मला पुढचे ५ दिवस यासाठी वेळ देणे शक्य नाही. माझी आपणास विनंती आहे की, येथे कोणी आक्षेप नोंदविला नाही याचा अर्थ हलविण्याची विनंती केला गेलेला सर्व मजकूर ज्ञानकोशीय आणि विश्वसनीय संदर्भांना धरून आहे, असा निष्कर्ष काढणे योग्य आहे का ते तपासावे. आपण अनुभवी व सर्व नियम जाणत असल्याने परीक्षण करूनच योग्य तितका मजकूर हलवाल अशी अपेक्षा आहे. येथे सर्वच स्वयंसेवी असल्याने एकमेकांच्या वेळेचा आदर करायला हवाच. यासाठी घाई करू नये या आपल्या मताशी मी सहमत आहे. हा लेख सर्वाधिक वाचला जात असल्याने या लेखनावरून मराठी विकिपीडियाची प्रतिमा पण तयार होत असते समाजाच्या मनात, या मुद्द्याचा गंभीरपणे विचार व्हावा. अविश्वकोशीय मजकूर हलवून पूर्ण संरक्षित केला जाऊ नये ही विनंती.--सुबोध कुलकर्णी (चर्चा) २०:३४, २९ मार्च २०२० (IST)Reply

ता.क. - पुढील पावले उचलतांना मागील चर्चा (उदा. चर्चा:बाबासाहेब अांबेडकर/चर्चा २) पण कृपया पहाव्यात.

मजकूर पडताळणी

संपादन

संदर्भ - चावडीवरील 'लेखाचे शीर्षक बदलण्याबाबत' या विभागातील चर्चा.(तो मजकूर इथे असणे उचित आहे. तो येथे हलवायला हवा.) @अभय नातू आणि Sandesh9822:, मी पुन्हा एकदा नोंदवत आहे - मजकूर पडताळणे हे माझे काम/जबाबदारी नाही. येथे कोणीही इतरांना अमुक वेळेत हे व्हायला हवे, म्हणून कामाची गती वाढवा, जर काम करायचे आहे म्हणून केले असते तर.... वगैरे लिहून दबाव टाकणे, शेरे मारणे इ. वर्तन सर्वथा अयोग्य आहे. एकमेकांचा आदर राखून चर्चा करावी ही विनंती. मजकूर खूप असल्याने प्राधान्याने आणायचा मजकूर, तीन ते चार विभाग संदेश यांनी निश्चित केले तर पडताळणे व्यवहार्य होईल असे वाटते. हे मी आधीही लिहिले आहे. अभय पण हे काम करणार असतील तर त्यांनीही मी एक परिच्छेद केला आहे तसा करून मांडावा. म्हणजे तेच तेच काम पुन्हा होणार नाही. अभय, यासाठी एक उपपान बनवावे अशी माझी सूचना आहे. चर्चांमध्ये पडताळणी मजकूर सापडणे अवघड जाते. या उपपानावर मी पुढील मुद्दे मांडेन. @Shantanuo:, आपण योग्य मुद्दे मांडले आहेत, मी सहमत आहे.--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १७:०५, ५ एप्रिल २०२० (IST)Reply

@सुबोध कुलकर्णी: मजकूर पडताळणे हे माझे काम/जबाबदारी नाही मग कोणाची आहे? तुमची जबाबदारी फक्त दिवसांवर दिवस वाढवून मिळवण्याची आहे का? तुम्ही आता उलटसुलत युक्तिवाद करत आहात, प्रत्यक्षात तुम्हाला स्वतः काहीही काम करायचे नाही तसेच इतरांनाही करु द्यायचे नाही.
  • धूळपाटीवरील मजकूरावर कोणीही सदस्याने हरकत घेतली नाही तर अभय नातू त्यास मुख्य लेखात हलवणार होते. सदस्यांनी हरकत घेतली नाहीच पण तुम्ही मात्र 'वेळ' वाढवून घेतली!! का? ते कुणास ठाऊक?
  • मजकूर पडताळल्या शिवाय लेखात टाकता येणार नाही हा दंडक तुम्हीच दिलाय.
  • आणि आता २५ दिवसांनंतर सांगताय की, मजकूर पडताळणे हे माझे काम/जबाबदारी नाही. वाह! छान आहे. म्हणजे मस्त गेम केा तुम्ही. म्हणजे गाधवावरही चालू द्यायचे नाही आणि पायीही चालू द्यायचे नाही.
  • एरव्ही कधीही वादविवादात सहभागी न होणारे तुम्ही येथे मात्र हिरहिरीने भाग घेतला... विकिपीडिया नियम, विकिनिती वगैरे लिहून दबाव टाकणे, सल्ले, उलटसुटच शेरे मारणे, बिनकामाच्या आग्रही मागण्या करणे इ. तुमचे वर्तनही पूर्णपणे अयोग्य होते/आहे. मी एकमेकांचा आदर राखूनच चर्चा केली पण तुम्ही त्याचा गैरफायदा घेतला. काम केले नाही करुनही दिले नाही.

--संदेश हिवाळेचर्चा २२:३५, ५ एप्रिल २०२० (IST)Reply

मजकूर पडताळणे हे माझे काम/जबाबदारी नाही. येथे कोणीही इतरांना अमुक वेळेत हे व्हायला हवे, म्हणून कामाची गती वाढवा, जर काम करायचे आहे म्हणून केले असते तर.... वगैरे लिहून दबाव टाकणे, शेरे मारणे इ. वर्तन सर्वथा अयोग्य आहे.
हे काम तुमची जबाबदारी नसल्यास (नसावीच, विकिपीडिया कोणा एकाची जबाबदारी नाहीच) मजकूर केव्हा व कसा हलविला जाईल यावर तुम्हालाही हरकत नसावी.
हे काम कसे करावे याबद्दलच्या सूचनांबद्दलही धन्यवाद. यातील सोप्या सूचनांसाठी (उपपान करावे, इ.) इतरांवर अवलंबून न राहता तुम्हीच राबवाल ही अपेक्षा.
असे अनेक व अनेकपटींनी क्लिष्ट प्रकल्प राबविणाऱ्यांकडे अनेक उपाय असतात. त्यातील माझे उपाय मी वापरेनच.
तुम्ही एक उतारा पडताळला त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. त्यानंतरचे काम इतर करुन घेतील ही खात्री असावी.
अभय नातू (चर्चा) २१:२६, ५ एप्रिल २०२० (IST)Reply
@अभय नातू: मजकूर पडताळणे हे माझे काम/जबाबदारी नाही असे सुबोध कुलकर्णी यांनी स्पष्टपणे सांगितले असतानाही ते विभाग निश्चित कधी करतील आणि ते कधी पडताळील यावर बोलायलाच नको. आपले पडताळीचे काम आता अनिश्चित/ अमर्याद वेळेत पूर्ण होण्याच्या (की कधीच होणार नाही) मार्गावर येऊन ठेवले आहे. जर तुम्ही सुबोध कुलकर्णी यांच्या भरवश्यावर थांबलात तर लेख निर्माण कधीही पूर्ण होणार नाही. कुलकर्णी यांनी माझ्या मतांची थट्टा केली. हे काम साधे आहे पण त्यावर कुलकर्णी यांनी गोंधळ करुन टाकला. ज्या सामंजस्य हेतूने मी कुलकर्णी यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या पण ते निरर्थक सिद्ध झाले आहे. लेख पडताळ्यासाठी 'इच्छाशक्ती'ची गरज आहे, जी कुलकर्णी यांच्यात अजिबात दिसत नाही. त्यांना लेखात पुनर्लेखन करण्यात इंटरेस्ट नव्हता आणि सध्या लेख पडताळणीतही इंटरेस्ट नाही. लेख २ वर्ष पडून राहिला काय किंवा २० वर्ष पडून राहिला काय याचे त्यांना काहिही देणंघेणं नाही. त्यामुळे जर तुम्हाला खरेच मजकूर पडताळणी करायची असेल तर तुम्ही कुलकर्णी यांच्यावर अवलंबून राहू नये. तुम्ही स्वतः जबाबदारी घेऊन हळूहळू काम केले तरी लवकरच पूर्णात्वास येऊ शकते. हे सारे आता खूप असह्य होत आहे त्यामुळे येथून मी विराम घेत आहे. कधीतरी आपण हे काम पूर्णत्वास न्याल या अपेक्षेसह धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा २२:३५, ५ एप्रिल २०२० (IST)Reply
@Sandesh9822:
सुबोध कुलकर्णी व तुमच्यातील चर्चेतून तुम्ही मलाही त्याच तागडीत तोलता आहात असे वाटते आणि तुम्ही वड्याचे तेल वांग्यावर काढत आहात असेही वाटते.
मी या कामात हातभार लावण्याचे १२ तासांपूर्वी मान्य केले (व सुरू ही केले) आणि तुमचा रोख निराशावादी लगेचच झाला याचा खेद वाटतो.
या लेखात तसेच मराठी विकिपीडियावर तुमच्या योगदानाची गरज आहे. तुम्ही येथे काम करीत रहाल हा आग्रह आणि विनंती. वाटल्यास छोटासा विराम घ्यावा. अनेकदा उद्वेग आल्यावर मला अल्पविरामाचा उपयोग झालेला आहे.
अभय नातू (चर्चा) २२:५३, ५ एप्रिल २०२० (IST)Reply
@अभय नातू:
माझा तुमच्यावर कसलाही राग वगैरे नाहीच. आपण कुलकर्णी यांच्या मदतीने काम करणार आहात आणि कुलकर्णी यांनी तर कामाची पूर्ण जबाबदारीच झटकली आहे. यामुळे मी लेख कामाच्या भवितव्याविषयी चिंतातुर झालो व निराशवादी झालो.
तुम्ही कामात हातभार लावण्याचे कार्य सुरू केले त्याबद्दल खूप धन्यवाद.
हो, मला अल्पविरामाची गरज आहे. ती मी घेत आहे. धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा २३:१४, ५ एप्रिल २०२० (IST)Reply

@अभय नातू:, संदेश यांची भाषा असभ्य आहे. ते मुद्द्यावर चर्चा न करता नाहक, बेछूट आरोप करत आहेत. हा व्यक्तिगत हल्ला आहे. असे आपणासही वाटत नाही का? आपण प्रचालक म्हणून तटस्थपणे शहानिशा करून योग्य ती कारवाई कराल अशी अपेक्षा आहे. आधीच्याही चर्चा पहा. आपण असभ्य भाषेबद्दल वेळीच समज द्यायला हवी असे मला वाटते. सुबोध कुलकर्णी व तुमच्यातील चर्चेतून तुम्ही मलाही त्याच तागडीत तोलता आहात असे वाटते हे आपले विधानही तपासून पहावे. येथील कोणतीही कृती परस्पर करण्यास माझा आक्षेप आहे. आपण मजकूर पडताळणी सर्वासमक्ष करूनच हलविणे इष्ट आहे (मजकूर केव्हा व कसा हलविला जाईल यावर तुम्हालाही हरकत नसावी...?). प्रक्रिया वैधपणे होण्यासाठी कोणीही धीर धरायला हवा यावर आपण सहमत असालच.--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १२:३६, ६ एप्रिल २०२० (IST)Reply

@सुबोध कुलकर्णी:
मला येथे असभ्य भाषा दिसत नाही आहे. उदाहरणे दिल्यास उत्तम.
सुबोध कुलकर्णी व तुमच्यातील चर्चेतून तुम्ही मलाही त्याच तागडीत तोलता आहात असे वाटते हे आपले विधानही तपासून पहावे.
आता हे काय? संदेश आणि तुमच्या चर्चेनंतर माझ्याशी बोलताना संदेश यांनी मी तुमच्यासारखेच वागत असल्यासारखे ध्वनित केले याला हे विधान होते. मला वाटते तुम्ही जरा शांतपणे विचार करावा आणि प्रत्येक विधान तुमच्याविरुद्ध असल्याचे गृहित न धरता फक्त विषयाला धरुन असलेल्या चर्चेची शहानिशा करावी.
आपण मजकूर पडताळणी सर्वासमक्ष करूनच हलविणे इष्ट आहे (मजकूर केव्हा व कसा हलविला जाईल यावर तुम्हालाही हरकत नसावी...?). प्रक्रिया वैधपणे होण्यासाठी कोणीही धीर धरायला हवा यावर आपण सहमत असालच.
इतके दिवस हाच संदेश मी देत आहे परंतु मी भाकित केल्याप्रमाणे तारीख पे तारीख पडल्याचेच दिसत आहे. धीर धरणे आणि अडून बसणे यातील फरक तुम्हाला नक्कीच कळतो. तुम्हाला वेळेत जमत नसल्यास इतरांनी त्यांच्या बुद्धीनुसार बदल करुन ते हलवावे हेच इष्ट. नाहीतर कामे वर्षानुवर्षे थकित पडतील. अर्थात, घाई करण्यात हशील नाही आणि पुन्हा एकदा लिहितो की खूप वेळ आपण धीर धरलेला आहे. कामाची वेळ आलेली आहे.
तुम्ही वेळ मिळाल्यास बदल कराल आणि न मिळाल्यास ते होतील ते बघाल ही आशा आणि अपेक्षा.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) ००:५४, ९ एप्रिल २०२० (IST)Reply
@अभय नातू:, आपण कृपया वर सर्व जिथे माझ्या नावाचा उल्लेख आहे, तिथे एकदा आपले नाव घालून तटस्थपणे पहावे. अशा आरोप करणाऱ्या भाषेविषयी आपल्याला आक्षेपार्ह असे काही वाटत नाही हे खेदजनक आहे. पुन्हा मलाच स्पष्टीकरण मागत आहात. अशी भाषा प्रचालक म्हणून आपणास मान्य आहे का ते स्पष्ट नमूद करावे. तसेच एकमेकांना तोलण्याची भाषा योग्य आहे का या विकिवर याचाही खुलासा करावा. जी प्रक्रिया होईल ती पारदर्शकपणे व्हावी अशी आपल्याकडून अपेक्षा.--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १३:०६, १० एप्रिल २०२० (IST)Reply
पुन्हा एकदा मोघम बोलत आहात. नेमके सांगा. तुम्ही आरोप केलात, आरोप स्पष्ट करा. स्पष्टीकरण मागण्याला पूर्ण कारण आहे.
मी सध्या धूळपाटीवर काम करीत असल्याने असलेला थोडका वेळ मला शोधाशोध करण्यात घालवायचा नाही आहे. तु्हाला आक्षेप असेल तर तुम्ही शोधा, सांगा आणि लगेच प्रचालकांना गाऱ्हाणे घालण्याऐवजी थेट त्या सदस्याशी (सु)संवाद साधा.
आणि माझ्याबद्दलच्या भाषेचेच म्हणलात तर येथे असलेल्या भाषेपेक्षा अनेकपटींनी शिवराळ, असभ्य भाषेची मला येथील संपादकांनी सवय करुन दिलेली आहे. तुमच्या भावना नाजूक असतील तर त्या कोणत्या थराला नाजूक आहे याची मला कल्पना नाही आणि अशी कल्पना येणेही शक्य नाही, तरी काय ते स्पष्ट लिहा.
प्रचालक येथील प्रत्येक सदस्याच्या भाषेवर प्रत्येकवेळी लक्ष ठेवण्यास ते म्हणजे सदस्यांची आई नव्हे. शिव्याशाप सुरू झाल्यास (आणि ते लक्षात आणून दिल्यास) प्रचालक मध्ये पडून संवाद सुरळित करण्याचा प्रयत्न करतात आणि अनेकवेळा केलेलाही आहे.
तसेच एकमेकांना तोलण्याची भाषा योग्य आहे का या विकिवर याचाही खुलासा करावा.
अहो, एकाच तागडीत तोलणे हा मराठी वाक्प्रचार आहे. याचा अर्थ दोन विभिन्न व्यक्तींना एकच निकष लावून त्यावर एकच प्रतिक्रिया देणे, असा होतो. यात तु्हाला कसला खेद वाटतो कोण जाणे. संदेश आणि तुमच्यात खटका उडाला. मी यातून पुढे मार्ग काढण्यासाठी वक्तव्य केले असता संदेश माझ्यावरच उखडलेले (मला) दिसले. त्यामुळे मी त्यांना सांगितले की तुम्हाला आणि मला एकाच व्यक्तिमत्वाचे समजू नका.
आता हा इतका खुलासा करणे म्हणजे वेळ घालविणेच आहे परंतु तुम्ही अनेकदा तेच तेच पुढे करुन चर्चेची गाडी अडवून ठेवता आहात असे दिसते म्हणून हा प्रपंच. तुमच्या खेदाचे मला काही कारणच दिसत नाही. मी एक त्रयस्थ व्यक्तीला मी सुबोध कुलकर्णी नाही अशे सांगून माझ्याबद्दलचा गैरसमज दूर करण्यास सांगितले तर त्यावरुन तुम्हाला खेद वाटला? हे अजबच वाटते.
असो, तुमचा अमूल्य वेळ तुम्ही लेख सुधारण्यात घालवाल ही आशा आणि अपेक्षा.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) २०:४५, १० एप्रिल २०२० (IST)Reply
पुन्हा निरुपयोगी गोष्टींवर ही चर्चा चालू आहे. जर आपण हा लेख अधिक चांगले करण्यास योगदान देऊ शकत नाही तर कृपया ही चर्चा सोडा. हा लेख अधिक चांगले करण्यासाठी आम्ही येथे स्वयंसेवक आहोत आणि ही माहिती आपल्याला देण्यास मला अभिमान वाटते. तुमच्यामुळे इतरांच्या व प्रचालकांचा बहुमुल्य वेळ वाया जात आहे. काही गोष्टी कठोर भाषेत सांगावी लागते. जर मला वाटले की ही चर्चा अशी पुढे चालू राहिले तर मला याची तक्रार तुमच्या साहेबांकडे करावी लागेल. तर कृपया ही निरुपयोगी चर्चा इतेच थांबवा. वेळ दिल्याबद्दल धन्यवाद --Tiven2240 (चर्चा) २१:५१, १० एप्रिल २०२० (IST)Reply

Re-modification of this page

संपादन

Dear @अभय नातू: and others,

Finally we are again in the situation where there is no concrete discussion and all that is left is blame game. As per my findings and recommendations on this page modification it has been found that there is an issue of review of the sandbox. I don't know how it was decided that the sandbox will be under review by some editors and what is the rationale behind it. But as per facts and statistics B. R. Ambedkar page has a total of 1,767 edits since 2005 and the maximum of it's contribution from its stub to the full fledged encyclopaedic article is made by Marathi users Sandesh9822 and प्रसाद साळवे. Their shares to this article are 61.4% and 23.8% respectively of the total edits on this page. Comprising together almost 85% of the edits on this page. Since then after huge vandalism I had protected this page from editing and asked the revamp of the article in sandbox and it's being completed as per what decided that moment. If there are any issues pertaining to the text verifiability of the same please do feel free to point out.

Looking forward I believe that we here at Wikipedia believe in the spirit of crowdsourcing and assuming good faith in our editors. Our editors who have made maximum edits are ready to publish their draft and thereby I urge you to accept the draft and if there are any errors or mistakes I believe that in time they will be rectified by crowdsourcing like other articles on this wiki and in the whole wikisystem. Since this is an onset of Lockdown as well as soon the occasion of Ambedkar Jayanti I believe this as an opportunity to attract crowd to rectify the content in the article. There may be many experts and other editors who might be waiting for the opportunity to correct information but couldn't due to the protection.

Thereby I request you to kindly immediately lower protection of this page to semi protection. I am sure my fellow wikimedians will assist in combating vandalism. Input the draft or ask the editor in concern to input the draft and let's believe in the pure Wikipedia spirit and open its access for every individual to access free and open information.

Regards, --Tiven2240 (चर्चा) ०९:४५, ७ एप्रिल २०२० (IST) (Protecting Administrator of Ambedkar page on this wiki)Reply

@Tiven2240:
Thanks for your view. There are a couple of things I want to highlight.
I don't know how it was decided that the sandbox will be under review by some editors and what is the rationale behind it.
In the discussion, you can see that there was a resistance to moving the sandbox text into the article as it was deemed inaccurate, wrong, etc. When things got an an impasse, it was suggested that the text be reviewed and corrected, by people who thought it was wrong/inaccurate, thereby giving them an opportunity to voice their opinion and also to contribute towards making the article better. Having the authors review for correctness makes no sense as they wrote it in good faith.
However, there was never a restriction to anyone else reviewing or correcting the text in the spirit of correctness. I had stayed away from it, fearing accusations of partiality (it has happened before) or rushing things through.
From then on, there have been delays upon delays in this review to the point where the original authors have distanced themselves.
As a path forward, I have (reluctantly) decided to step in to review the article for correctness/references and changing writing style to be more encyclopedic.
Given the level of vandalism and visibility of this article, I do not feel comfortable lowering protection of this page just yet.
All wikimedians are more than welcome to review/correct sandbox text.
Thanks again.
अभय नातू (चर्चा) ०१:०२, ९ एप्रिल २०२० (IST)Reply
Noted, thanks for the clarification and I am glad to seeing you stepping in and doing it yourself for the betterment of this wiki. I will too assist you in this soon and I am sure we will together do it by the Easter eve. Rejoice. Regards. --Tiven2240 (चर्चा) १०:५६, ९ एप्रिल २०२० (IST)Reply

लेखात शिल्लक असलेल्या शुद्धलेखनाच्या चुका

संपादन
  • विरूद्ध --विरुद्ध हवे.
  • क्षेत्रात -- क्षेत्रांत हवे.
  • आंबेडकरांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके आणि चित्रणे संस्कृतीत केली गेली आहेत. -- म्हणजे काय? कुठली संस्कृती?
  • वडीलांशी -- वडिलांशी हवे.
  • करुन --- करून हवे.


दुवे दुरुस्ती

संपादन

@अभय नातू: काल आपण "राजकीय कारकीर्द/कार्य" विभाग लेखात जोडला, त्यातील काही दुवे साचे/कंस बिघडलेले आहेत, ते बदलावे, ही विनंती ( हे बदल )

  • वरील मजकूर टाकताना, त्यातील उपविभाग "कायदा व न्यायमंत्री" वगळला जाणार नाही याची काळजी घ्यावी.
  • विभागाचे शीर्षक "राजकीय कार्य" वरुन "राजकीय कारकीर्द" असे करावे.

--संदेश हिवाळेचर्चा ११:४२, २८ जून २०२० (IST)Reply

@अभय नातू: स्मरण.--संदेश हिवाळेचर्चा ०९:५५, २ जुलै २०२० (IST)Reply

किरकोळ त्रुटी

संपादन

@अभय नातू: पडताळणी झालेल्या विभागांत राहिलेल्या काही किरकोळ शाब्दिक त्रुटी दूर केल्या आहेत. कृपया, मूळ लेखात त्यांना पुनस्थापित करावे.

वैयक्तिक जीवनमध्ये काय बदल अपेक्षित आहेत? तुम्ही लिहिलेल्या उताऱ्यात वैयक्तिक जीवनापेक्षा त्यांच्या कुटुंबियांबद्दलचीच माहिती असल्यामुळे मथळा बदलला. -- अभय नातू (चर्चा) १७:०९, २१ जुलै २०२० (IST)Reply
@अभय नातू: वैयक्तिक जीवन मधे अनेक उपविभाग (भविष्यात) समाविष्ठ करण्याचा माझा मानस आहे. --संदेश हिवाळेचर्चा १८:४६, २१ जुलै २०२० (IST)Reply

ज यांनी खालील विभागांत शुद्धलेखन केले आहे, कृपया तेही मूळ लेखात हलवावे.

  • प्रस्तावना
  • सुरुवातीचे जीवन (संपूर्ण विभाग)
  • उच्च शिक्षण (यातील केवळ 'मुंबई विद्यापीठ')

--संदेश हिवाळेचर्चा १३:५७, २० जुलै २०२० (IST)Reply

@अभय नातू: महापरिनिर्वाणवयक्तिक जीवन ही संपादने पहावी, मी यात त्रुटी सुधारलेल्या आहेत. कृपया, यानुसार मुख्य लेखात बदल करावे.

उच्च शिक्षण विभागातील शेवटचा भाषाज्ञान उपविभागही 'वैयक्तिक जीवन' मधे हलवावा, विनंती. --संदेश हिवाळेचर्चा ०९:३४, २२ जुलै २०२० (IST)Reply

Protection

संपादन

I have lowered protection of the page from admin only to auto-confirmed users. We expect collaborative efforts to improve the contents of this page. If vandalism/edit warring/copyright infringement continues we will again protect the page without any notice and take serious action.

@Admins FYI --Tiven2240 (चर्चा) १६:२४, २ एप्रिल २०२१ (IST)Reply

Tiven2240, सर्वप्रथम लेखाची संरक्षण पातळी कमी केल्याबद्दल धन्यवाद. आणि दुसरे असे की, भविष्यात लेखात काही उत्पात किंवा कॉपीराइट उल्लंघन झाले तर ते दुरुस्त करायला हवे, नाही की लेख पूर्ण संरक्षित करायला हवा. कारण यामुळे सुधारणा करणे प्रचंड अवघड होऊन बसते. --संदेश हिवाळेचर्चा १७:०१, २ एप्रिल २०२१ (IST)Reply
  1. ^ "Bhimrao Ambedkar". c250.columbia.edu. 2018-03-16 रोजी पाहिले.
  2. ^ Worldwide Ambedkar Jayanti celebration from ccis.nic.in on 19th March 2015
"बाबासाहेब आंबेडकर/चर्चा ३" पानाकडे परत चला.