समाजसुधारक हा समाजाची सुधारणा करणारा व्यक्ती असते. ह्या व्यक्ती स्वतः पलीकडे जाऊन विविध अंगाने समाजाच्या विकासासाठी काम करतात. लोकांची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक स्थिती सुधारणे समाजसुधारकाचा उद्देश असतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जोतीराव गोविंदराव फुले, शाहू महाराज, महात्मा गांधी, विनायक दामोदर सावरकर, राजा राममोहन रॉय गोपाळ गणेश आगरकर इत्यादी उल्लेखनीय समाजसुधारक भारतात होऊन गेलेले आहेत.