भारतामधील बौद्ध धर्म

बौद्ध धर्म हा एक जागतिक धर्म आहे, जो मगधच्या प्राचीन साम्राज्याच्या (आताचे बिहार, भारत) सभोवती उभा आहे आणि सिद्धार्थ गौतम, "बुद्ध" ("जागृत व्यक्ती") यांच्या शिकवणींवर आधारित आहे. बुद्धांच्या जीवनकाळात सुरू हा बौद्ध धर्म मगधाबाहेर पसरला.

भारतीय बौद्ध
भारताच्या पवित्र बौद्ध स्थळ दीक्षाभूमी
एकूण लोकसंख्या

८४,४२,९७२ (०.७०%) - (इ.स. २०११)

लोकसंख्येचे प्रदेश
प्रमुख
महाराष्ट्र

इतर लक्षणीय लोकसंख्या
पश्चिम बंगाल  • मध्य प्रदेश  • उत्तर प्रदेश  • सिक्किम  • अरूणाचल प्रदेश  • त्रिपुरा  • जम्मू आणि काश्मिर

भाषा

मुख्यः- मराठी

इतर
हिंदी  • तेलुगू  • सिक्किमी  • तिबेटी
धर्म
बौद्ध धर्म (नवयान)
संबंधित वांशिक लोकसमूह
भारतीय लोक


बौद्ध मौर्य सम्राट अशोकांच्या साम्राज्याच्या काळात बौद्ध समाज दोन शाखांमध्ये विभागला गेला: महासंघिका आणि स्थवीरवाद, हे दोन्ही बौद्ध समाज भारतभर पसरले आणि अनेक उप-संप्रदायात विभागले गेले. आधुनिक काळामध्ये बौद्ध धर्माच्या दोन प्रमुख शाखा अस्तित्वात आहेत: श्रीलंका आणि दक्षिणपूर्व आशियातील थेरवाद आणि हिमालयीन आणि पूर्व आशियातील महायान.

प्राचीन भारतात सम्राट अशोक नंतर पुढे, बौद्ध धर्म आणि बौद्ध मठांच्या प्रथांना १२ व्या शतकादरम्यान सामान्य लोक आणि राजेशाही यांचा पाठिंबा प्राप्त झाला होता परंतु सामान्यतः इ.स. १ सहस्र वर्षामध्ये यात घट झाली होती, ज्यात त्यांच्या अनेक पद्धती आणि विचार हिंदू धर्मातील होत्या. १२ व्या शतकाच्या उत्तरार्धात इस्लामचे आगमन झाल्यानंतर हिमालयीन भाग आणि दक्षिण भारताव्यतिरिक्त बौद्ध धर्म भारतात जवळजवळ विलुप्त झाला.

भारताच्या बौद्ध लोकसंख्येचे जिल्हानिहाय प्रमाण (%)

हिमालयाच्या परिसरातील सिक्कीम, लडाख, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग पर्वतरांग आणि उच्च हिमाचल प्रदेशमधील लाहौल आणि स्पीति भागात बौद्ध धर्म हा मुख्य किंवा मोठा धर्म आहे. याव्यतिरिक्त बौद्ध अवशेष आंध्रप्रदेशात आढळतात, जे महायान बौद्ध धर्माचे मूळ आहे. गेल्या शंभर वर्षांपासून बौद्ध धर्माची भारतामध्ये पुनर्निर्मिती होत आहे, कारण बऱ्याच भारतीय बुद्धिमतांनी बौद्ध, तिबेटी निर्वासित लोकांचे स्थलांतर केले आणि लक्षावधी हिंदू दलितांनी बौद्ध धर्मात धर्मांतर केले. २०११ च्या जनगणनेनुसार, भारताच्या लोकसंख्येमध्ये ०.७% किंवा ८५ लाख बौद्ध व्यक्ती आहेत. इतर अहवालानुसार भारतीय लोकसंख्येत ५% ते ६% (६ ते ७ कोटी) बौद्ध आहे तर प्रसिद्ध भारतीय बौद्ध नेते व भिक्खु भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या मते, भारतात १० कोटी बौद्ध अनुयायी आहेत.

सिद्धार्थ गौतम - बुद्ध

संपादन
मुख्य लेख: गौतम बुद्ध

बुद्धांचा जन्म शाक्य राज्याच्या शुद्धोधन नावाच्या राजाकडे नेपाळमधील लुंबिनी येथील कपिलवस्तु मध्ये झाला. सामाना पद्धतीचे साधना आणि ध्यान केल्यानंतर, बुद्धांनी स्व-आनंद आणि आत्म-संवेदनांच्या कणांपासून दूर राहण्याचा मार्ग बौद्ध मध्यममार्ग शोधला.

सिद्धार्थ गौतम यांनी बोधगयामधील पिंपळ वृक्षाखाली बसून ज्ञान प्राप्त झाले, त्या पिंपळ वृक्षास बोधी वृक्ष म्हणून ओळखले जाते. तेव्हापासून गौतमला परिपूर्णपणे स्वयं जागृत करणारा असे ‘सम्यकसंबुद्ध’ म्हणून ओळखले जाते. बुद्धांनी मगधच्या शासक, सम्राट बिंबिसाराकडे संरक्षण प्राप्त केले. या सम्राटाने बौद्ध धर्माला वैयक्तिक विश्वास म्हणून स्वीकारले आणि अनेक बौद्ध विहाराची स्थापना करण्याची परवानगी दिली. अखेरीस संपूर्ण क्षेत्राचे पुनर्नामित बिहार म्हणून झाले.

बौद्ध चळवळी

संपादन

भारतामध्ये बौद्ध धर्माचे सशक्तीकरण

संपादन

धर्म गुरू

संपादन

भारतामध्ये बौद्ध धर्माचा ऱ्हास

संपादन

भारतामध्ये बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन

संपादन

बौद्ध धर्म हा इ.स पू. सहाव्या शतकापासून ते इ.स. ८व्या शतकापर्यंत भारतात प्रमुख धर्म बनून राहिलेला आहे. तर सम्राट अशोक यांच्या काळात बौद्ध धर्म अखंड भारताचा राजधर्म होता. परंतु कालांतराने देशी-विदेशी धर्मांच्या रक्तरंजित आणि हिंसक कार्यांशी सामना करता करता बौद्ध धर्म भारतात 12व्या शतकानंतर नाहिसा झाला परंतु हिमालयीन प्रदशांत हा धर्म तगून राहिला. २०व्या शतकात आधुनिक भारताचे निर्माते आणि महान बौद्ध विद्वान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखों अनुयायांसोबत बौद्ध धम्म स्विकारून बौद्ध धर्माचे भारतात पुनरुत्थान केले. बोधीसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रभावामुळे एका सर्वेक्षणानुसार मार्च १९५९ पर्यंत भारतात जवळजवळ १.५ ते २ कोटी दलितांनी बौद्ध धर्म ग्रहन केला होता. आज सुद्धा दरवर्षी लाखोंच्या संख्येने लोक बौद्ध धर्मात प्रवेश करतात.

लोकसंख्या

संपादन

२००१-११ दरम्यान, बौद्ध हे शीख आणि जैनाप्रमाणेच, हिंदूंपेक्षा खूप कमी दराने वाढले आहेत. भारतात बौद्धांचे दोन भिन्न वर्ग आहेत – नवयानी बौद्ध (८७%) व परंपरागत बौद्ध (१३%).

पहिला वर्ग, अरुणाचल प्रदेश, मिझोरम आणि काही इतर पूर्वोत्तर राज्यांमधील अनुसूचित जमाती; जम्मू आणि काश्मीर आणि उत्तर हिमाचल प्रदेशात; आणि, दार्जिलिंग आणि सिक्कीमचे लोक हा परंपरागत बौद्ध समुदायांचा लहान वर्ग आहे; इ.स. २०११ मध्ये एकूण ८४ लक्ष बौद्धांची गणना झाली त्यापैकी ११ लाख या वर्गात समाविष्ट केली जाऊ शकतात.

दुसरा वर्ग म्हणजे, इ.स. १९५१ नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रभावाखाली बौद्ध धर्मीयांचे धर्मपरिवर्तन झालेला नवयानी बौद्ध (नव-बौद्ध) या नावाचा सर्वात मोठा वर्ग आहे. या वर्गात सुमारे ७३ लाख बौद्ध समाविष्ट होतात, त्यापैकी अवघे ६५ लाख (९०% नवबौद्ध) महाराष्ट्रात आहेत, महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येत जवळजवळ ६% बौद्ध आहेत. उर्वरित सुमारे ९ लाख नव-बौद्ध मध्यप्रदेश, छत्तीसगढ, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि पंजाब, तसेच छोटे उत्तर राज्ये हरियाणा आणि दिल्ली येथे आहेत.

बौद्धांची भारतामधील स्थिती

संपादन

साचा:बौद्ध लोकसंख्या

जनगणना २०११ नुसार, १,००,००० पेक्षा अधिक बौद्धांची लोकसंख्या असलेली राज्ये []
राज्य बौद्ध लोकसंख्या राज्यातील प्रमाण (%) भारताच्या बौद्ध (%)
महाराष्ट्र ६५,३१,२०० ५.८१% ७७.३६%
पश्चिम बंगाल २,८२,८९८ ०.३१% ३.३५%
मध्य प्रदेश २,१६,०५२ ०.३०% २.५६%
उत्तर प्रदेश २,०६,२८५ ०.११% २.४४%
सिक्किम १,६७,२१६ २७.३९% १.९८%
अरुणाचल प्रदेश १,६२,८१५ ११.७७% १.९३%
त्रिपुरा १,२५,३८५ ३.४१% १.४९%
जम्मु-काश्मीर १,१२,५८४ ०.९०% १.३३%

२०११ च्या जनगणनेनुसार, भारताच्या केवळ सिक्कीम, (२७.३९%), अरुणाचल प्रदेश (११.७७%), मिझोरम (८.५१%), महाराष्ट्र (५.८१%), त्रिपुरा (३.४१%) व हिमाचल प्रदेश (१.१०%) या सहा राज्यात बौद्ध लोकसंख्येचे प्रमाण १% पेक्षा अधिक आहे.[]

बौद्ध लोकसंख्येची सरकारी आकडेवारी पेक्षा वास्तविक बौद्धांच्या लोकसंख्येहून ५ - ६ पटीने अधिक आहेत.[]

बौद्ध धर्मांतरे

संपादन

भारतात दरवर्षी शेकडो-हजारो लोक धर्मांतर करून बौद्ध धम्मात प्रवेश करतात. या धम्म दीक्षा सोहळ्याची सुरुवात १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर मध्ये ५,००,००० अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन केली होती. नवबौद्ध चळवळीनंतर महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यात अनेक सामुदायिक धर्मांतरे झाली आणि आजही ती मोठ्या प्रमाणावर होत आहेत.

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ http://www.censusindia.gov.in/
  2. ^ http://www.censusindia.gov.in/2011census/C-01.html/
  3. ^ [१] भारतीय बौद्धांनी भारताची बौद्ध जनगणना नाकारली

बाह्य दुवे

संपादन