प्रमाण तिबेटी (तिबेटी लिपी: བོད་སྐད ; वायली लिप्यंतर: Bod skad, भो का ; इंग्लिश: Standard Tibetan ;) ही तिबेटाची अधिकृत भाषा आहे[१]. मध्य तिबेटी भाषाकुळातील यू-त्सांग प्रादेशिक शाखेतील ल्हासा येथील बोलीभाषा प्रमाण तिबेटीसाठी आधार मानली जाते. यामुळे प्रमाण तिबेटीला काही वेळा मध्य तिबेटी भाषा (तिबेटी लिपी: དབུས་གཙང་སྐད ; वायली लिप्यंतर: Dbus-gtsang skad / Ü-tsang kä, यू-त्सांग का ;) या नावानेही उल्लेखले जाते. मात्र मध्य तिबेटी भाषा तिबेटी भाषाकुळाच्या अनेक शाखांपैकी एक शाखा असून खाम्स (तिबेटी लिपी: ཁམས་སྐད ; वायली लिप्यंतर; Khams skad / Kham kä, खाम का ;), आम्दो (तिबेटी लिपी: ཨ་མདོ་སྐད་ ; वायली लिप्यंतर; A-mdo skad / Am kä, आम का ;), लदाखी (तिबेटी लिपी: ལ་དྭགས་སྐད་ ; वायली लिप्यंतर; La-dwags skad / Tö kä, तो का ;)

तिबेटी
བོད་སྐད་

स्थानिक वापर तिबेट, नेपाळ, भारत
प्रदेश आशिया
लोकसंख्या ५० लाख ते १ कोटी
क्रम ७२
लिपी तिबेटी
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर तिबेट स्वायत्त प्रदेश
भाषा संकेत
ISO ६३९-१ bo
ISO ६३९-२ bod
ISO ६३९-३ bod[मृत दुवा]
धरमशाला, भारत येथील मॅक्लियडगंज भागातल्या तिबेटी भाषेतील प्रार्थना व स्तोत्रे कोरलेल्या शिळा

हेही पहासंपादन करा

संदर्भसंपादन करा

  1. ^ तिबेटीसारख्या स्थानिक भाषांना अधिकृत स्थान आहे. "वांशिक वायत्त प्रदेशांसाठी असलेल्या स्वराज्यविषयक नियमांच्या तरतुदींनुसार" ("वांशिक स्वायत्त प्रदेशांमध्ये स्वराज्याचा अधिकार काय आहे?" १२ ऑगस्ट, इ.स. २००९ रोजीचे अद्यतन). तिबेट स्वायत्त प्रदेशात, तिबेटी भाषेच्या वापरास (विवक्षित बोली उल्लेखली नाही, त्यामुळे सर्व बोल्या अपेक्षित असाव्यात) हान चिनी भाषेच्या तुलनेत प्राधान्य दिले आहे ("तिबेटातील लोकशाही सुधारणांची पन्नास वर्षे", चिनी शासनाचे अधिकृत संकेतस्थळ, १५ ऑक्टोबर, इ.स. २०१० रोजी पहिले).


बाह्य दुवेसंपादन करा