कोकण मराठी साहित्य परिषद

(कोमसाप या पानावरून पुनर्निर्देशित)

कोकण मराठी साहित्य परिषद (लघुरूप - कोमसाप). हिची स्थापना दिनांक २३ मार्च, १९९१ या दिवशी, ६४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी महाराष्ट्रातील रत्‍नागिरी येथे केली. रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, नवी मुंबई, ठाणे हे जिल्हे आणि मुंबई शहर व उपनगरे हे कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्यक्षेत्र आहे. आत्तापर्यंत (इ.स. २०१४) कोमसापने ५१ जिल्हा साहित्य संमेलने, ४ महिला साहित्य संमेलने आणि १५ मध्यवर्ती साहित्य संमेलने घेतली आहेत. ही संस्था अखिल भारतीय मराठी महामंडळाशी संलग्न नाही.

कोमसापच्या शाखा असलेली गावे : अंबरनाथ, कणकवली, कल्याण, गुहागर, जव्हार, डहाणू, पावस, भिवंडी, मंडणगड, महाड, माणगाव, मालगुंड, मुरबाड, मुलुंड, रत्‍नागिरी, राजापूर, रोहा, वांद्रे, वाशी, विक्रमगड, सावंतवाडी, वगैरे.

कोमसापतर्फे ’झपूर्झा’ हे मराठी द्वैमासिक प्रसिद्ध होते. हे कोकण मराठी साहित्य परिषदेचे मुखपत्र आहे.

अनेक प्रसिद्ध व्यक्ती कोमसापशी संबंधित आहेत/होत्या. : - विश्वस्त : अरुण नेरूरकर, सारस्वत ब‍ॅंकेचे कै. एकनाथ ठाकुर, न्यायमूर्ती राजाभाऊ गवांदे व डॉ. वि.म. शिंदे. संस्थापक व प्रमुख विश्वस्त मधु मंगेश कर्णिक, अध्यक्ष न्यायमूर्ती भास्कर शेट्ये आणि असंख्य कार्यकर्ते.

‘कोमसाप’च्या कारभाराला कलहाचा कलंक : संस्थेची मान्यता रद्द करण्याची सदस्यांची मागणी (१३-२-२०२०ची बातमी)

संपादन

मराठी साहित्यविश्वावर कोकणाचे नाव कोरण्याच्या उद्देशाने स्थापन झालेली कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) सध्या मनमानी आणि बेहिशेबी कारभार, अंतर्गत कलह, गैरव्यवस्थापन अशा वादांच्या वलयात गुरफटली असून या संस्थेची मान्यता रद्द करण्याच्या मागणीसाठी परिषदेच्या काही अधिकृत सदस्यांनी धर्मादाय आयुक्तांकडे धाव घेतली आहे.

काही मूठभर मंडळींचा एककल्ली कारभार सुरू असल्याचा आरोप करणारे निवेदनच धर्मादाय आयुक्तांना देण्यात आले आहे. या निव्वळ तांत्रिक त्रुटी असल्याचे संस्थेचे म्हणणे असले तरी आता हा वाद विकोपास गेल्याने, धर्मादाय आयुक्तांच्या न्यायालयातच याचा फैसला व्हावा, असा पवित्रा तक्रारदारांनी घेतला आहे.

मार्च १९९१ मध्ये या संस्थेची स्थापना करण्यात आली. कविवर्य केशवसुत यांच्या जन्मगावी, रत्नगिरीजवळ मालगुंड येथे केशवसुत स्मारकाची उभारणी हा ‘कोमसाप’च्या कामगिरीतील मानाचा तुरा ठरला. पण या स्मारकाचा कारभार हेच संस्थेतील वादाचे मूळ असल्याचे धर्मादाय आयुक्तांकडील तक्रारीवरून दिसते. २८ वर्षे पूर्ण होऊनही स्मारकाच्या कारभाराची नियमावलीच तयार करण्यात आलेली नाही किंवा त्यास सर्वसाधारण सभेची मान्यताही घेण्यात आलेली नाही. तसेच या स्मारकाच्या प्रशासकीय विश्वस्तपदी रमेश कीर यांची मनमानी पद्धतीने नियमबाह्य़ नियुक्ती करण्यात आली आहे, असा सभासदांचा आक्षेप आहे.

काही मूठभर मंडळींचा संस्थेत एककल्ली कारभार सुरू आहे. त्याचबरोबर गेल्या १२ वर्षांत अनेक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या या नियमबाह्य़ पद्धतीने केल्या गेल्या आहेत. संस्थेची हिशेब पत्रके धर्मादाय आयुक्तांकडे सादर करण्यात आली नसल्याने आर्थिक गैरव्यवहार सुरू असल्याचा संशय आक्षेपात व्यक्त करण्यात आला आहे.

गेल्या १२ वर्षांत अनेक पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या करण्यात आल्या, पण जुन्या पदाधिकाऱ्यांच्या जागी करण्यात आलेल्या या नियुक्त्यांना नियमानुसार धर्मादाय आयुक्तांची मान्यताच घेतली गेली नाही. गेल्या काही वर्षांत संस्थेच्या हिशेब पत्रकांना संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची मंजूरी घेण्यात आली नाही व हिशेब पत्रके धर्मादाय आयुक्तांकडे सादर करण्यात आलेली नसल्याने, संस्थेत आर्थिक गैरव्यवहार बोकाळल्याचा संशयही या निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे. स्मारकाच्या जागेत संस्थेचे संस्थापक मधु मंगेश कर्णिक यांनी जागोजागी स्वतचेच नाव कोरले असून तेथील साहित्य दालनाची मोठी जागा त्यांच्याच साहित्याने व्यापली आहे, असा आक्षेपही घेण्यात आला आहे.

अशा अनेक कारणांमुळे अंतर्गत वाद विकोपास गेल्याने संस्थेचे अध्यक्ष महेश केळुस्कर यांनी राजीनामा दिल्यावर नियमबाह्य़ रीतीने प्रभारी अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली असून संस्थेचा नवा अध्यक्ष कार्यकारिणीच्या सदस्यांमधूनच निवडला जावा, असे आदेश देण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

आरोप काय?

संपादन

मुख्यत: रमेश कीर आणि मधु मंगेश कर्णिक यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. अनेक नामवंतांनी ही संस्था नावारूपास आणण्यासाठी सर्वार्थाने प्रयत्न केले, पण त्यांच्या नावाच्या कोणत्याच खाणाखुणाही ठेवल्या गेल्या नाहीत, असे केळुस्कर यांचे म्हणणे आहे. कोकणातील साहित्यविषयक चळवळीस बळ देणे तसेच कोकणातील संस्कृतीस उठाव देणे हा संस्थेच्या स्थापनेचा उद्देश असताना, व्यक्तिकेंद्रित कारभारावरच भर देण्यात येत असून संस्थेची वाटचाल राजकीयीकरणाकडे सुरू असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. काही ठरावीकांव्यतिरिक्त कोणाही पदाधिकाऱ्यास संस्थेच्या कारभाराचा सुगावादेखील लागू दिला जात नाही, असाही त्यांचा आरोप आहे. दरम्यान, संस्थेच्या कारभारातील अनियमिततेविषयी तक्रारी करणारे आणि मान्यता रद्द करण्याची मागणी करणारे निवेदन धर्मादाय आयुक्तालयाकडे प्राप्त झाले असून त्यावर कार्यवाही सुरू आहे, असे धर्मादाय आयुक्तालयाच्या रत्‍नागिरी शाखेतील संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.

तांत्रिक त्रुटींची कबुली

संपादन

या संदर्भात संस्थेचे संस्थापक मधु मंगेश कर्णिक आणि विश्वस्त रमेश कीर यांच्याशी संपर्क साधला असता, कारभारात काही तांत्रिक त्रुटी असल्याची कबुली उभयतांनी दिली. संस्थेचे लेखापरीक्षण, पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांबाबतचे अहवाल आदी आक्षेप धर्मादाय आयुक्तांसमोर आहेत, असेही त्यांनी मान्य केले. संस्थात्मक कामे वेळच्या वेळी व्हायला हवी होती, ती झाली नाहीत, तसेच त्याचा वेळेवर पाठपुरावा झाला नाही हे खरे आहे असे कर्णिक व कीर यांनी सांगितले. संस्थेच्या कारभाराविषयी आक्षेप असू शकतात, व्यक्तिगत हेवेदावे व काही कमतरताही असू शकतात, पण कोकणातील वाचन-लेखन संस्कृती जपण्यासाठी प्रयत्नशील राहणे महत्त्वाचे आहे, असे कर्णिक यांचे मत आहे.

कोमसापची मध्यवर्ती साहित्य संमेलने

संपादन

जिल्हा साहित्य संमेलने

संपादन
 • कोकण मराठी साहित्य परिषदेचे पहिले महिला साहित्य संमेलन, २००६मध्ये आवास-अलिबाग येथे. संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर. या संमेलनाच्या आयोजनात रेखा रमेश नार्वेकर यांचा मोठा सक्रिय सहभाग होता.
 • दुसरे महिला साहित्य संमेलन रत्‍नागिरीला २००८ साली झाले. संमेलनाध्यक्षा वीणा गवाणकर.
 • तिसरे महिला साहित्य संमेलन २०१०साली (कोठे?). अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे.
 • चौथे महिला साहित्य संमेलन सावंतवाडी येथे ८-९-१० नोव्हेंबर २०१३ या काळात झाले. अचला जोशी संमेलनाध्यक्ष होत्या.
 • चिपळूणला कोमसापचे बालसाहित्य संमेलन झाले होते.
 • कोकण मराठी साहित्य परिषदेचे मुंबई जिल्हा संमेलन चेंबूर येथे ५ जून २०१० रोजी झाले. संमेलनाध्यक्षा : वसुंधरा पेंडसे नाईक
 • तिसरे ठाणे जिल्हा कोकण मराठी साहित्य संमेलन अंबरनाथच्या वडवली येथे ९ आणि १० जानेवारी २०१० रोजी झाले. संमेलनाध्यक्ष : रामदास फुटाणे
 • तिसरे रत्‍नागिरी जिल्हा कोकण मराठी साहित्य संमेलन २४-२५ एप्रिल २०१० खेड येथे झाले. संमेलनाध्यक्ष : डॉ. अनिल अवचट
 • कोमसापचे राष्ट्रीय कवी संमेलन १८-१९-२० ऑक्टोबर २०१३ या काळात मालगुंड येथे कवी केशवसुत स्मारकात झाले. या संमेलनाला राष्ट्रीय कवींची लक्षवेधी उपस्थिती होती. संमेलनात मराठी, कोकणी, सिंधी, गुजराती, हिंदी आणि उर्दू भाषिक कवी सहभागी झाले होते. त्यावेळी कविता रसिकांची मुलाखत, केशवसुतांच्या कवितांचे सादरीकरण, राष्ट्रीय कवींच्या मुलाखती आणि आठवणीतल्या कवितांचे सादरीकरण झाले.
 • कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे ८ ते १० नोव्हेंबर २०१३ या कालावधीत सावंतवाडी येथे चौथे महिला साहित्य संमेलन झाले. अध्यक्षा - अचला जोशी.
 • ३० एप्रिल २०१७ रोजी सकाळी १० वाजता वाशी येथे जिल्हा साहित्य संमेलन झाले. अध्यक्षस्थानी मॉरिशस मराठी मंडळाचे अध्यक्ष अर्जुन पुतळाजी होते.

शेकोटी साहित्य संमेलने

संपादन

कोकण मराठी परिषदेचा दुसरा महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणजेगोव्यात कोणारे “शेकोटी संमेलन’. ते पठडीतील संमेलन होऊ न देता, त्यात अधिकाधिक अनौपचारिकता आणावी असा आयोजकांचा हेतू असयो.. निर्मितीशील लेखकाला अनुकूल भूमी निर्माण करून देणे, साहित्यप्रेम वृद्धिंगत करणे, वरपांगी सजावटीला अवाजवी महत्त्व प्राप्त करू नये. ती साहित्य चळवळ व्हावी, तिच्यातील चैतन्य हरवता कामा नये हे साहित्य संमेलनातील मूलबीज होय. धारगळ येथील शांतादुर्गेच्या मंदिराच्या प्राकारात ज्या उत्साहपूर्ण आणि ऊर्जापूर्ण वातावरणात गेली अनेक वर्षे ही साहित्याची आनंदाची आणि विचार–अनुभवांच्या आदानप्रदानाची धुनी सातत्याने पेटत राहिली आहे.

साधारणपणे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हे संमेलन होते.

आत्तापर्यंत झालेली शेकोटी साहित्य संमेलने

संपादन
 • ८वे संमेलन ५-६ जानेवारी २०१३ रोजी.
 • कोकण मराठी परिषदेतर्फे धारगळ, (पेडणे) गोवा येथे २४-१-२०१४ रोजी ९वे शेकोटी साहित्य संमेलन झाले.
 • गोमंतक साहित्य परिषद आयोजित १०वे शेकोटी संमेलन गोवा/पणजी येथे ३, ४ जानेवारी २०१५ रोजी पार पडले. संमेलनाध्यक्ष गझलकार साबीर शोलापुरी होते.
 • १२वे संमेलन : बारावे शेकोटी संमेलन ७-८ जानेवारी २०१७ या काळात गोव्यात मिरामार येथील युथ हॉस्टेलमध्ये झाले.

कोकण मराठी साहित्य परिषदेची प्रकाशने

संपादन
 • झपूर्झा (मुखपत्र मासिक)
 • निवडक झपूर्झा (सन १९९५ ते २०१५ या काळात प्रसिद्ध झालेल्या निवडक लेखांचे संकलन; संपादिका - नमिता कीर)
कोंकण मराठी साहित्य परिषदेचे वाड्मयीन पुरस्कार

कोकणातील साहित्यिकाना कादंबरी, कथासंग्रह, कविता, चरित्र-आत्मचरित्र, समीक्षा, ललितगद्य, बालवाड्मय, संकीर्ण, वैचारिक, नाटक, एकांकिका या साहित्य प्रकारांना पुरस्कार दिले जातात. प्रथम क्रमांकांच्या पुरस्काराचे स्वरूप तीन हजार रुपये रोख, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह असे तर द्वितीय क्रमांकांच्या विशेष पुरस्कारांचे स्वरूप दोन हजार रुपये, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह असते. अ) पुरस्कारांची नावे : - १. कथा संग्रहाचा वि.सी. गुर्जर स्मृति पुरस्कार (रु.३,०००/- व सन्मानपत्र)
२. कथा संग्रहाचा विद्याधर भागवत स्मृति विशेष पुरस्कार (रु.२,०००/- व सन्मानपत्र)
३. कविता वाड्मय प्रकारचा आरती प्रभू स्मृति पुरस्कार (रु.३,००० / - व सन्मानपत्र)
४. कविता संग्रहासाठी वसंत सावंत स्मृति विशेष पुरस्कार (रु.२,०००/- व सन्मानपत्र)
५. चरित्र-आत्मचरित्रासाठीचा धनंजय कीर स्मृति पुरस्कार (रु.३,०००/- व सन्मानपत्र)
६. चरित्र-आत्मचरित्रासाठीचा अरुण आठवले स्मृति विशेष पुरस्कार (रु.२,०००/- व सन्मानपत्र)
७. ललित गद्यासाठीचा अनंत काणेकर स्मृति पुरस्कार (रु.३,०००/- व सन्मानपत्र)
८. ललित गद्यासाठीचा सौ.लक्ष्मीबाई आणि राजाभाऊ गवांदे पुरस्कार (रु.३,०००/- व सन्मानपत्र)
९.बाल वाड्मयासाठीचा प्र.श्री. नेरुरकर स्मृति पुरस्कार (रु.२,०००/- सन्मानपत्र)
१०.संकीर्ण वाड्मयासाठीचा वि.कृ. नेरुरकर स्मृति पुरस्कार (रु.२,०००/- सन्मानपत्र)
११.दृक्‌श्राव्य कला - सिनेमा नाटक या विषयासाठीचा भाई भगत पुरस्कार () आ) वाड्मयेतर पुरस्कार :- १. गुरुवर्य अ.आ. देसाई वाड्मयीन कार्यकर्ता पुरस्कार (रु.२,०००/- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र)
२. कै.राजा राजवाडे वाङ्‌मयीन कार्यकर्ती पुरस्कार (रु. १,०००/- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र)
३. ग्रामीण भागातील स्त्री लेखिकेसाठीचा सौ. नमिता कीर लक्षवेधी खास पुरस्कार (रु.२,०००/- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र)
४. संमेलन सारथी पुरस्कार (रु. १,०००/- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र)
५. वामनराव दाते उत्कृष्ट को.म.सा.प. शाखा पुरस्कार (रु.२,०००/- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र)
६. कै. चंद्रकांत लक्ष्मण सावंत लक्षवेधी पुरस्कार (रु.५ ,०००/- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र)
७. कै. सुलोचना मुरारी नार्वेकर लक्षवेधी पुरस्कार रु. १,०००/- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र
८. को.म.सा.प.विशेष प्रोत्साहन पुरस्कार इ) शैक्षणिक पारितोषिके- १. ज्ञानोपासक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पारितोषिक (रु.५ ,०००/- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र)
२. द्रष्टे समाजसुधारक र.धों. कर्वे पारितोषिक-१ (रु.५ ,०००/- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र)
३. द्रष्टे समाजसुधारक र.धो. कर्वे पारितोषिक-२ (रु.५ ,०००/- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र)
४. भाऊसाहेब वर्तक पारितोषिक (रु.५ ,०००/- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र)
५. श्री.बा. कारखानीस पारितोषिक (रु.५ ,०००/- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र)
ई) कोकणभूषण पुरस्कार :- कोमसापतर्फे दरवर्षी कोकणभूषण हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात येतो.

इ.स. २०११-१२साठीचे कोकण मराठी साहित्य परिषदेने जाहीर केलेले वाङ्‌मयीन पुरस्कार

संपादन
 • अनंत काणेकर स्मृति ललित गद्य पुरस्कार : सूर्यकांत मालुसरे यांच्या ’आधण आणि विसावण’ला
 • आरती प्रभू स्मृति काव्य पुरस्कार : सु्देश मालवणकर यांच्या ’कॅंप नंबर’ला
 • चरित्र-आत्मचरित्रासाठीचा धनंजय कीर स्मृति पुरस्कार : प्रभाकर पणशीकर यांच्या ’आठवणीतील मोती’ या पुस्तकाला
 • चरित्र-आत्मचरित्रासाठीचा श्रीकांत शेट्ये स्मृति विशेष पुरस्कार : राजेंद्रप्रसाद मसुरकर यांच्या ’चरित्रकार धनंजय कीर’ या पुस्तकाला
 • दृक्‌श्राव्य कला, सिनेमा या विषयावरील साहित्यासाठीचा भाई भगत स्मृति पुरस्कार : दिलीप ठाकुर यांच्या ’रेखा म्हणजे तारुण्य’ला
 • नाटक, एकांकिका वगैरेसाठींचा रमेश कीर पुरस्कार उषा परब यांच्या ’फुलपाखरू एक कीटक आहे’ या पुस्तकाला
 • प्र.श्री. नेरूरकर स्मृति बालवाङ्मय पुरस्कार : सूर्यकांत मालुसरे यांच्या ’शिवगाथा’ला
 • र.वा. दिघे स्मृति कादंबरी पुरस्कार : विनीता ऐनापुरे यांच्या ’वीणा’ या कादंबरीला
 • लक्ष्मीबाई आणि राजाभाऊ गवांदे ललित गद्य विशेष पुरस्कार : पंढरीनाथ रेडकर यांच्या ’हंबर’ या पुस्तकाला
 • वसंत सावंत कविता संग्रह विशेष पुरस्कार : लता गुठे यांच्या ’जीवनवेल’ला
 • विद्याधर भागवत स्मृति कथासंग्रह पुरस्कार : उदय जोशी यांच्या ’आगंतुक’ या संग्रहाला
 • वि.वा. हडप स्मृति कादंबरी पुरस्कार : डॉ. दत्ता पवार यांच्या ’चंदनाची चोळी’ला.
 • वि.सी. गुर्जर स्मृति काव्यसंग्रह पुरस्कार : गिरिजी कीर यांच्या ’गोष्ट सांगतेय ऐका’ला
 • वैचारिक साहित्यासाठीचा फादर स्टीफन सुवार्ता पुरस्कार : नीलिमा भावे यांच्या ’शिवकालीन स्त्रियांच्या अधिकारकक्षा’ला
 • संकीर्ण वाङ्मयासाठीचा वि.कृ. नेरूरकर स्मृति पुरस्कार : अचला जोशी यांच्या ’आश्रम नावाचं घर’ला
 • समीक्षेसाठीचा प्रभाकर पाध्ये स्मृति पुरस्कार : पु.द. कोडोलीकर यांच्या ’वेध : साहित्याचा संस्कृतीचा’ या पुस्तकाला

इ.स. २०१२-१३साठीचे कोकण मराठी साहित्य परिषदेने जाहीर केलेले वाङ्‌मयीन पुरस्कार

संपादन
 • वृंदा कांबळी यांच्या ’मागे वळून पाहताना’ या कादंबरीला
 • डो.अशोक ताम्हनकर यांच्या ’जेस्सी पांढरे हरण’ या कथासंग्रहाला
 • दत्तात्रय सैतवडेकर यांच्या ’सत्य संभ्रम’ या कथासंग्रहाला
 • प्रतिभा सराफ यांच्या ’माझे कोवळे’ या कविता संग्रहाला
 • आनंद सांडू यांच्या ’तुला स्मरले अचानक’ या कविता संग्रहाला
 • शशिशेखर शिंदे यांच्या ’महात्मा फुले यांची कविता-एक विचारमंथन’ या समीक्षाग्रंथाला
 • यशवंत पाध्ये यांच्या ’दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर’ या चरित्रग्रंथाला
 • डॉ. श्रीरंग कद्रेकर यांच्या ’लाल मातीत रंगलो मी’ या आत्मचरित्राला
 • बाळ बेंडखळे यांच्या ’ भुयार’ या पुस्तकाला
 • उमाकांत कीर यांच्या ’प्रसाधन’ या पुस्तकाला
 • ज्योती कपिले यांच्या ’रागोबा आणि वाघोबा’ या बालकविता संग्रहाला
 • डॉ. श्याम बाबर यांच्या ’मालूचा मन्गाणा’ या पुस्तकाला
 • डॉ. शुभा चिटणीस यांच्या ’लोकप्रिय चित्रतारका’ या पुस्तकाला
 • विजय साळवी लिखित ’टार्गेट या नाटकाला

इ.स. २०१४ साठीचे पुरस्कार

संपादन
 • कादंबरी- र. वा. दिघे पुरस्कार – मनोज नाईक साटम (अपरांत); वि. वा. हडप स्मृती विशेष पुरस्कार – स्वप्नगंधा कुलकर्णी (धामापूरचे तळे)
 • कथासंग्रह – वि. सौ. गुर्जर स्मृती पुरस्कार – प्रतिभा सराफ (सलग पाच दिवस); विद्याधर भागवत विशेष पुरस्कार – गजानन म्हात्रे (तर्कवितर्क)
 • कविता वाङ्मय – आरती प्रभू स्मृती पुरस्कार – पूजा मलुष्टे (साकुरा)
 • कवितासंग्रह – वसंत सावंत स्मृती विशेष पुरस्कार – अनघा तांबोळी (उजेडाचे कवडसे)
 • समीक्षा - प्रभाकर पाध्ये स्मृतिग्रंथ पुरस्कार – डॉ. सतीश कामत (दलित ग्रामीण साहित्य चिंतन आणि आस्वाद)
 • चरित्र आत्मचरित्र – धनंजय कीर स्मृती पुरस्कार – अचला जोशी (ज्ञान तपस्वी रुद्र); श्रीकांत शेटय़े विशेष पुरस्कार – संगीता धायगुडे (हुमान)
 • ललित गद्य- अनंत काणेकर स्मृती पुरस्कार उषा परब (उच्च्यूऽऽ माच्च्यूऽऽ); सौ. लक्ष्मीबाई व राजाभाऊ गवांदे स्मृती विशेष पुरस्कार – प्रशांत डिंगणकर (अनुक्रमणिका),
 • बालवाङ्मय - प्रा. श्री. नेरूकर स्मृती पुरस्कार – आर्या गावडे (धमाल मस्ती),
 • दृकश्राव्य कला, सिनेमा - भाई भगत स्मृती पुरस्कार - गौरी कुलकर्णी (प्रवास स्वरवंतांचा),
 • संकीर्ण वाङ्मय – वि. कृ. नेरूकर पुरस्कार – सदाशिव निंबाळकर (सुख स्वास्थ्यासाठी निसर्गजीवन); अरुण आठल्ये स्मृती पुरस्कार – तुकाराम नाईक (पत्रगाथा),
 • नाटक एकांकिका - रमेश कीर पुरस्कृत पुरस्कार – प्रा. मधु पाटील (कामस्पर्शिता-पाच एकांकिका)

इ.स. २०१५ साठी कोकण मराठी साहित्य परिषदेने जाहीर केलेले वाङ्‌मयीन पुरस्कार

संपादन

मुंबईत होणाऱ्या ‘कोमसाप’च्या तीन दिवसांच्या साहित्य संमेलनात २२ नोव्हेंबर २०१५ रोजी देण्यात येणारे पुरस्कार (पाच हजार रुपये व तीन हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे)

 • कादंबरी- र.वा. दिघे स्मृती पुरस्कार-अशोक समेळ (मी अश्वत्थामा चिरंजीव), वि.वा. हडप स्मृती विशेष पुरस्कार-प्रा. चंद्रकांत मढवी (उधळ्या)
 • कथासंग्रह – वि.सी. गुर्जर स्मृती पुरस्कार-स्टीफन परेरा (पोपटी स्वप्न), विद्याधर भागवत स्मृती विशेष पुरस्कार मनीष पाटील (माह्यावाल्या गोष्टी)
 • कविता- आरती प्रभू स्मृती पुरस्कार-शशिकांत तिरोडकर (शशिबिंब), वसंत सावंत स्मृती विशेष पुरस्कार-रेखा कोरे (वास्तवाच्या उंबरठ्यावर)
 • समीक्षा ग्रंथ- प्रभाकर पाध्ये स्मृती पुरस्कार-कोणाचीही निवड नाही. धनंजय कीर स्मृती विशेष पुरस्कार-मोहन गोरे (आनंदयात्रा), श्रीकांत शेट्ये स्मृती विशेष पुरस्कार-डॉ. भगवान कुलकर्णी (ऑनरेबली अ‍ॅक्विटेड)
 • ललित गद्य -अनंत काणेकर स्मृती पुरस्कार-नीला सत्यनारायण (टाकीचे घाव), लक्ष्मीबाई व राजाभाऊ गवांदे पुरस्कार-रेखा नार्वेकर (आनंदतरंग)
 • ’बालवाङ्मय- प्र.श्री. नेरुरकर स्मृती पुरस्कार-डॉ. विद्याधर करंदीकर (नाथ पै-असाही एक लोकनेता)

कोमसाप'चे २०१८-१९ चे वाङ्‌मयीन व वाङ्‌मयेतर पुरस्कार

संपादन
 • ज्येष्ठ समीक्षक व चरित्रकार डॉ. अनंत देशमुख यांना प्रदीर्घ साहित्य सेवेबद्दल ‘कोकण साहित्य भूषण’ पुरस्कार
 • डॉ. महेश केळुसकर यांना ‘कविता राजधानी पुरस्कार’ (रोख रुपये १० हजार, सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे)
 • खारेपाटणच्या डॉ. अनुजा जोशी यांना त्यांच्या काव्य संग्रहासाठी आरती प्रभू स्मृती पुरस्कार'
 • सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ झाराप येथील डॉ. प्रसाद देवधर व मालवण कोमसापचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांना वाङ्‌मयेतर पुरस्कार तर जाहीर झाले आहेत.

अन्य वाङ्‌मयीन पुरस्कार

संपादन

प्रथम क्रमाकांना रोख रुपये ५ हजार, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह व द्वितीय क्रमाकांना ३ हजार रुपये, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्कारांचे स्वरूप असते.

 • डॉ. अंजली मस्करेन्हस यांच्या 'आदिवासी लोककथा मीमांसा' या ग्रंथाला समीक्षा ग्रंथासाठीचा प्रभाकर पाध्ये स्मृती पुरस्कार.
 • डॉ. अनुजा जोशी यांना 'उन्हाचे घुमट खांद्यावर'साठी पहिल्या क्रमांकाचा आरती प्रभू पुरस्कार.
 • अरविंद हेब्बार यांना 'दरवळ'साठी दुसऱ्या क्रमांकाचा विद्याधर भागवत स्मृती पुरस्कार.
 • आर. एम. पाटील यांना 'आठवणीतील पानगळ : साठवणीतील गुलमोहोर' या पुस्तकाला ललित गद्यासाठी असलेला वितीय क्रमांकाचा लक्ष्मीबाई व राजाभाऊ गवांदे स्मृती पुरस्कार.
 • उमाकांत वाघ यांना 'वळख' या पुस्तकासाठी द्वितीय क्रमाकांचा श्रीकांत शेट्ये स्मृती पुरस्कार.
 • डॉ. किरण सावे यांच्या 'चार्वाक दर्शन प्रासंगिकता' या ग्रंथाला संकीर्ण वाङ्‌मयासाठीचा प्रथम क्रमाकाचा वि.कृ. नेरुरकर स्मृती पुरस्कार.
 • तनुजा उल्हास ढेरे यांना 'गोष्ट एका वळणावरची' या कादंबरीसाठी द्वितीय क्रमांकाचा वि.वा. हडप पुरस्कार.
 • प्रशांत डिंगणकर यांना 'दगड' काव्यसंग्रहासाठी द्वितीय क्रमांकाचा वसंत सावंत स्मृती पुरस्कार.
 • भा.ल. महाबळ यांना 'ओळख' कथासंग्रहासाठी पहिल्या क्रमाकाचा वि.सी. गुर्जर स्मृती पुरस्कार.
 • रेखा आदित्य जेगरकल यांना 'स्वाती, अक्षय आणि तुम्ही सारे' या पुस्तकासाठी बाल वाङ्‌मयासाठीचा प्र.श्री. नेरुरकर स्मृती पुरस्कार.
 • विकास वराडकर यांना 'बॅनरांजली' या पुस्तकासाठी 'कोमसाप'चा विशेष पुरस्कार यांना जाहीर झाला आहे..
 • विनया जंगले यांना 'मुक्या वेदना बोलक्या संवेदना' या पुस्तकासाठी ललित गद्यासाठीचा पहिल्या क्रमांकाचा अनंत काणेकर स्मृती पुरस्कार.
 • वैभव दळवी यांना 'समुद्रायन'साठी ) द्वितीय क्रमाकांचा अरुण आठल्ये स्मृती पुरस्कार.
 • शांतिलाल ननावरे यांना 'ही वाट दूर जाते' या नाटकाच्या लेखनासाठी नाटक-एकांकिकेसाठीचा रमेश कीर पुरस्कार.
 • शिल्पा सुर्वे यांना 'हिराबाई पेडणेकर' यांच्या चरित्रलेखनासाठी पहिल्या क्रमाकचा धनंजय कीर स्मृती पुरस्कार.

सन २०१८-१९ चे वाङ्‌मयेतर पुरस्कार

संपादन
 • अ. आ. देसाई स्मृती कोमसाप कार्यकर्ता पुरस्कार आचरे-मालवणचे सुरेश ठाकूर यांना. .
 • राजा राजवाडे स्मृती वाड्मयीन कार्यकर्ती पुरस्कार ठाण्याच्या आरती कुलकर्णी यांना.
 • कोमसापच्या डहाणू शाखेच्या उत्कृष्ट कोमसाप शाखा संमेलनासाठी ठाण्याच्या प्रा. दीपा ठाणेकर यांना सारथी पुरस्कार (वामनराव दाते स्मृती पुरस्कार)
 • डहाणूच्या विना माच्छी यांना नमिता कीर लक्षवेधी पुरस्कार.
 • पालघरच्या परिणीता घरत यांना सुलोचना मुरारी नार्वेकर स्मृती पुरस्कार.
 • प्रसाद देवधर ()
 • (पालघर), कै. भाऊसाहेब वर्तक प्रतिष्ठान पुरस्कार हरेश्वर दामोदर सावे (कुरगाव-तारापूर), बा. कारखानीस पुरस्कार , कवी उमाकांत कीर स्मृती काव्य पुरस्कार शिल्पा नाईक (दापोली), कोमसाप युवा कार्यकर्ता पुरस्कार सुरेखा कुरकुरे (विरार) यांना जाहीर करण्यात आले आहेत.

तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा मुंबई:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या

  मुंबईत नवे रुग्ण घटले; पुण्यात संसर्ग वाढला!
  राज्यातील करोना हॉटस्पॉट नसलेल्या भागांना 'हा' दिलासा
  Coronavirus Maharashtra Lockdown Live: मुंबईत आज १३५ करोनाग्रस्त; ६ मृत्यू, रुग्णसंख्या २७९८वर
  Coronavirus Update in Maharashtra Today: वर्तमानपत्रांच्या घरोघरी वितरणास बंदी; सरकारला कोर्टाची नोटीस
  'पालघर प्रकरणात अटक झालेले बहुतेक लोक भाजपचे'

Web Title konkan marathi sahitya parishad award

(मराठी बातम्या from Maharashtra Times , TIL Network) इतर बातम्या:कोमसाप पुरस्कार|कोकण साहित्य परिषद|कोकण सहहिता परिषद|Marathi literature|konkan sahitya parishad|konkan literature award|dr. mahesh keluskar कॉमेंट्स पहा (3)तुमची प्रतिक्रिया लिहा Vijay

पुरस्कार वापसीवाले पैसेही परत देतात का ? कोळशेवालं कोर्टाला विचारायला हवं ! उत्तर द्या. Pratap

लवकरात लवकर पुरस्कार वापसी करा आणि पैसे जवळ ठेवा उत्तर द्या. MAHASHIVA RAMAN

वेरी नाइस फनाद ते संत ई ती तेरेर् अरे ते पोएपो इन ते गमे तांत एन इट इस ते ओटके फो तेकडोट ओकमे ट.Cट हेरेक़ुरो फ तेहपोपो इणेते संत वे अँड ते तो ते वर्ल्ड इट उत्तर द्या.

मराठी साहित्य संमेलने